ठळक बातम्या

कौशल्य विकासाबाबत १५ संस्थांशी सामंजस्य करार

मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.

भारतीय जवानांकडून पाकिस्तानच्या 'बॅट'चा 'खेळ खल्लास', घुसखोराला कंठस्नान

सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानकडून पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मात्र सतर्क जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

शिवाजी महाराजांच्या भूमीवर कुठलेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण नाही - नरेंद्र मोदी

शिवाजी महाराजांच्या भूमीवर कुठलेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण नाही, असा विश्वास शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात संबोधित करताना व्यक्त केला.

अफगाणिस्तान दहशतवादमुक्त आणि सुरक्षित रहावा ही आमची इच्छा : पंतप्रधान

२०१६ मध्ये मी तेहरानचा दौरा केला होता. मात्र, आपण भारतात येऊन आपले द्वीपक्षीय संबंध आणखी घट्ट आणि मजबूत केले आहेत. आपण आम्हाला चाबहार बंदराच्या विकासात नेतृत्व प्रदान केल्याने मी आपले आभार मानतो. ईरान आणि भारताचा शेजारी देश असणाऱ्या अफगाणिस्तानला दोन्ही देशांना दहशतवादमुक्त होताना पहायचे आहे, असेही यावेळी मोदी म्हणाले.

जेकब झुमा यांचा राजीनामा

स्वत:च्या पार्टीतील सदस्यांकडून आलेल्या प्रचंड दबावापुढे नमते घेत दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी आज गुरुवारी अखेर पदाचा राजीनामा दिला.

देऊबांचा राजीनामा; ओली पुन्हा पंतप्रधान

संसदीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेपाळी काँगे्रसचा दारुण पराभव झाल्याच्या तब्बल दोन महिन्यानंतर पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी आज गुरुवारी पदाचा राजीनामा दिला.

कावेरी वाद: नदीवर राज्यांचा अधिकार नाही: सुप्रीम कोर्ट

कावेरी पाणीवाटपावरुन सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी निकाल दिला आहे. नदीवर कोणत्याच राज्याचा अधिकार नाही असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने कावेरी नदीतून तामिळनाडूला मिळणाऱ्या पाण्यात कपात केली आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचा वाटा वाढवण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम आता केंद्र सरकारचे असल्याचे कोर्टाने सांगितले.

उमेदवारांनी कुटुंबाचे उत्पन्न जाहीर करण्याचा न्यायालयाचा आदेश

भ्रष्टाचारविरोधात लढणाऱ्या 'लोक प्रहारी' या सेवाभावी संस्थेने याबाबत एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

'राम मंदिरासाठी मौलाना नदवींनी लाच मागितली'

अयोध्या: अयोध्येत राम मंदिर उभारणीला पाठिंबा देणारे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे माजी सदस्य मौलाना सलमान हसन नदवी यांनी वादग्रस्त जागेवरील मशिदीचे हक्क सोडण्यासाठी जमीन, कोट्यवधी रुपये आणि राज्यसभेची खासदारकी मागितली होती, असा आरोप अयोध्या सद्भावना समन्वय महासमितीचे अध्यक्ष अमरनाथ मिश्रा यांनी केला आहे.

भारत-पाकमध्ये युद्धाची शक्यता!

वॉशिंग्टन : पीटीआय जम्मू-काश्मीरमधील सीमेवर पाकिस्तानकडून आगळीक सुरू असल्याने भारत-पाकमधील संबंधात कमालीचा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने कुरापती न थांबविल्यास भारताकडूनही पाकला अद्दल घडविली जाऊ शकते, प्रसंगी दोन्ही देशात युद्धही उद्भवू शकते, असा स्पष्ट इशारा अमेरिकन गुप्तचर संस्थेने दिला आहे.

 • भारताचे तत्वज्ञान सहिष्णुता या संकल्पनेच्या वरचे - डॉ. मनमोहन वैद्य
 • ‘वार्ताप्रसार’ पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन कार्यशाळा
 • उन्मत्तांना ताळ्यावर आणण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजेे : संग्राम प्रभूगांवकर
 • पत्रकारांइतकीच मोलाची कामगिरी पत्रलेखक करत असतात - दिनेश गुणे
 • ‘नमस्ते शलॉम’ मासिकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
 • वंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी जोशी
 • विश्‍व संवाद केंद्र, मुंबईचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि लेखक मुझफ्फर हुसेन अनंतात विलिन
 • “मिशन साहसी’ चा मुख्य उद्देश विद्यार्थिनींना धाडसी व आत्मविश्‍वासी बनविणे’: आशिष चौहान
 • हिंदुत्वाचा मुस्लिम भाष्यकार
 • फुटलेल्या काचा, तुटलेली मने
 • डोळयांत पाणी का येते?
 • काश्मीरमधील पूरस्थितीतील सेवा कार्य
 • निसर्गमित्र संस्थेची कचऱ्यातून धननिर्मिती
 • विश्वविक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांची अडीच एकरमध्ये रांगोळी !
 • कोतवडे येथे गांडूळ खतातून समृद्ध शेती व समृद्धीही
 • नदी स्वच्छ करण्यात महिलांचा पुढाकार
 
दिन विशेष
 
तुमचे मत
"पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती" मुळे भारतातील हुशार विद्यार्थ्यांना परदेशी जाण्यापासून रोखण्यास मदत होईल का?
होय
नाही
माहित नाही