Home » कार्यक्रम वृत्त

उन्मत्तांना ताळ्यावर आणण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजेे : संग्राम प्रभूगांवकर

तिन्ही लोकी भ्रमण करणार्‍या देवर्षी नारद यांची भूमिका कलह निर्माण करण्याची नव्हती, तर उन्मत्त झालेल्यांना ताळयावर आणण्याची होती. पत्रकारांकडूनही अशाचप्रकारच्या अपेक्षा असून त्यांनीही समाजातील उन्मतांचे गर्वहरण करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी केले.

पत्रकारांइतकीच मोलाची कामगिरी पत्रलेखक करत असतात - दिनेश गुणे

पत्रलेखक हा समाजाचा आरसा आहे. पत्रकारापेक्षा समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आरक्षित असलेल्या वर्तमानपत्रातील जागेलाही तितकेच मूल्य आहे. वर्तमानपत्राला दुसर्‍या दिवशी रद्दीचं मूल्य येते. परंतु पत्रलेखकाने लिहिलेली पत्रांची कात्रणे मात्र एखाद्या छानसे कव्हर घातलेल्या वहीमध्ये संग्रहीत केली जातात.

नारदाची नीतीमूल्ये आजही सुसंगत - प्रफुल्ल केतकर

त्रैलोक्यात संचार करून वार्ता संकलन करणारी आणि समाजपयोगी विचारांचा प्रसार करणारी व्यवस्था ही प्राचीन काळी नारदीय व्यवस्था म्हणून ओळखली जात होती. आजच्या पत्रकारिता मूल्यांच्या संदर्भातून विचार केला तर नारदीय सूक्तांतील मतमतान्तर, दुःसंग त्याग, भ्रमण आणि समाजहिताची विचारधारा ही सूत्रे पत्रकारितेकरिता सार्वकालिक आधार आहेत

गुरूजींनी दाखविलेल्या मार्गाने चालणे, हीच खरी आदरांजली - डॉ. अशोक मोडक

केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी न जगता, समाजच परमेश्‍वर असतो. त्या परमेश्‍वराची पूजा करण्यासाठी जगा, हा गुरूजींचा उपदेश अंगिकारणे हीच गुरूजींना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ आमदार, सामाजिक व राजकीय विश्‍लेषक डॉ. अशोक मोडक यांनी केले.

पत्रलेखकांनी सोशल मिडियाचा अधिक वापर करावा

आजच्या आधुनिक काळात सोशल मिडिया हे माध्यम खूप प्रभावी ठरत आहे. त्यामुळे समाजाचे नेतृत्व करताना पत्रलेखकांनी नियतकालिकांबरोबरच ट्वीटर, फेसबूक, व्हॉट्स अॅप यांचा वापर अधिकाधिक करुन समाजात जनजागृती करावी, असे प्रतिपादन व्यवस्थापन तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश मोढ यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या वतीने महर्षी नारद जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात पत्रलेखन स्पर्धेत विजयी ठरलेल्या पत्रलेखकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Click to Load More.....
विषयसूची

कार्यक्रम वृत्त
  • उन्मत्तांना ताळ्यावर आणण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजेे : संग्राम प्रभूगांवकर
  • पत्रकारांइतकीच मोलाची कामगिरी पत्रलेखक करत असतात - दिनेश गुणे
  • नारदाची नीतीमूल्ये आजही सुसंगत - प्रफुल्ल केतकर
  • गुरूजींनी दाखविलेल्या मार्गाने चालणे, हीच खरी आदरांजली - डॉ. अशोक मोडक
  • पत्रलेखकांनी सोशल मिडियाचा अधिक वापर करावा
  • पत्रकारितेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे
  • ‘राजकारणाकडे पाहण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलतोय’
  • 'अॅज आय सी इट' लेखसंग्रहाचे प्रकाशन
  • विश्व संवाद केंद्र संकेतस्थळाचे लोकार्पण
  • '१२५ कोटी पावलांचा अर्थ "