Home » प्रकाशणे
भाषा निवडा :

युवा विशेषांक २०१५

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विश्व संवाद केंद्र तर्फे ‘युवा विशेषांक’ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविला जातो. तरुणाईशी संबंधित अनेक विषय या निमित्ताने हाताळले जातात. सर्वसामान्य तरुणांच्या मनात राजकारण याविषयी अनेक पूर्वग्रह आहेत. हे पुर्वग्रह त्यांनी का बाळगावेत? या प्रश्नाचे उत्तर शोधणारा आणि नव्या संधींचा वेध घेणारा ‘राजकारणातील तरुणाई’ हा विशेषांक आहे. राजकारण या क्षेत्रातील प्रतिभावंत व यशस्वी युवा नेत्यांचा, विद्यार्थी चळवळीतील धडपड्या चेहर्यांच्या, जनसंपर्क, जाहिरात, कार्यक्रम व्यवस्थापन, राजकीय सल्लागार या सगळ्याच माध्यमातून राजकारणात वावरणार्यांच्या अंतरंगाचा वेध, त्यांचा संघर्षमय प्रवास, स्वप्ने आणि धोरणे यांचा सविस्तर आढावा घेऊन राजकारणातील काही आदर्शांना तरुणांसमोर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या विशेषांकात करण्यात आला आहे.

राष्ट्रजागर - १

विश्व संवाद केंद्राने साल २००१-२००२ मध्ये मुंबईतील वृत्तपत्रांत जवळपास ७० ते ८० लेख विविध निमित्ताने पाठविले होते. ते लेख मुंबईतल्या विविध प्रमुख दैनिकांत प्रसिद्धही झाले होते. त्या त्या विषयातील तज्ञ, अभ्यासकांनी लिहिलेले हे सर्वे लेख वाचनीय असल्यामुळे राष्ट्रजागर -१ या पुस्तिकेमध्ये प्रामुख्याने हिंदुत्व - रा.स्व.संघ, सोमनाथ मंदिर शिलान्यास, अखंड भारत, वाढता दहशतवाद अशा विषयांचा समावेश आहे.

शासन प्रशासन - न्यायासन


राजनीतीच्या शास्त्रात अनेक प्रकारच्या शासनपद्धती वेळोवेळी विकसित झाल्या आहेत. परंतु शासन प्रशासन आणि न्यायासन हे तिन्ही अंग प्रत्येक प्रकारच्या शासन पद्धतीमध्य कायम विध्यमान असल्याचे दिसून येते. आपल्या भारतीय संविधानामध्ये सरकारच्या या तीन अंगाचे दायित्व सांगितले आहे ते कोणत्या कसोटीवर उतरले आहे ? किंवा नाही? या तिन्ही अंगामध्ये संतुलन किंवा ताळमेळ आहे अथवा नाही या आणि अशा अनेक बाबींबाबत परिपूर्ण माहिती देण्यासाठी विश्व संवाद केंद्राद्वारे ८ मे २००१ साली या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. हा ग्रंथ मराठी तसेच इंग्लिश भाषेतही हि उपलब्ध आहे.

आपदा, नियोजन एवं प्रबन्धन

. कोणत्याही कठीण प्रसंगी माणुसकीच्या भावनेने समाजाचे रक्षण करणे तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सर्वतोपरी एकजूट होऊन काम करत असतात. आलेले संकट हे नैसर्गिक असो अथवा मानवनिर्मित असो, त्यामध्ये सापडलेल्या निष्पापांची रक्षा तसेच त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता संघाचे स्वयंसेवक अग्रेसर असतात. हि सर्व कामे ते मनापासून आणि समाजाचे घटक म्हणून आपण या समाजाला काही देणे लागतो. या उद्दात्त हेतूने करत असतात. आपत्कालीन वेळी आलेल्या अनुभवांचे सार एकत्र करून त्याला शास्त्रिय मदतीने एकत्रित बद्ध केल्यास त्याचा खूप उपयोग होऊ शकतो हा विचार मनात आल्यामुळे आपदा : नियोजन और प्रबंधन या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

सरहद को प्रणाम

फिन्सने "सरहद को प्रणाम - २०१२' नावाच्या अभिनव उपक्रमाचे १९ ते २३ नोव्हेंबर 2012 या काळात आयोजन केले होते.या उपक्रमात तरुणांना आलेले अनुभव 'सरहद को प्रणाम' या पुस्तकामध्ये विस्तृतपणे रेखाटण्यात आले आहेत.
Click to Load More.....
विषयसूची

प्रकाशणे
  • युवा विशेषांक २०१५
  • राष्ट्रजागर - १
  • शासन प्रशासन - न्यायासन
  • आपदा, नियोजन एवं प्रबन्धन
  • सरहद को प्रणाम
  • पाणी
  • पत्रकारिता कल आज और कल
  • पत्रसामर्थ्य
  • जनगणना इस्लाम और परिवार नियोजन
  • तरुणाई