पंचगव्य दिव्यांनी साजरी करू पर्यावरणस्नेही दिवाळी

‘गोमय वसते लक्ष्मी’, ‘गोमूत्र (GOMUTRA)धन्वंतरी’ असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यातही ते देशी गायींचे (COW)असणे अत्यंत आवश्यक. देशी गायी जगल्या तर जग रोगमुक्त राहील हे आज जगभरातील संशोधकांनी मान्य केले आहे. गोउत्पादनांच्या आधारे कर्करोगावरही मात करता येऊ शकते हे ही सिद्ध झाले आहे, सचिन शेठ सांगत होते. हे महत्त्व ओळखून स्वतःच आग्रहपूर्वक देशी गायी सांभाळण्याचे व त्यापासून विनाकेमिकल गोउत्पादने तयार करण्याचे काम रत्नागिरीतील मंडणगड येथील सचिन शेठ करीत आहेत. सध्या सर्वत्र दिवाळीचे वातावरण आहे. त्यानिमित्ताने ओळख करून घेऊया त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या पर्यावरणस्नेही व आरोग्यपूर्ण अशा पंचगव्य दिव्यांची.

पंचगव्य दिवे म्हणजे काय?
पंचगव्य (PANCHGAVYA) दिव्यांची माहिती मिळवण्यापूर्वी पंचगव्य म्हणजे काय हे समजून घेऊ. गायीचे दूध, (MILK) दही, तूप,GHEE गोमय आणि गोमूत्र म्हणजे पंचगव्य. हे दिवे कसे तयार केले याबद्दल सचिन शेठ सांगतात, या दिव्यांत मुख्य घटक असतो तो गोमय अर्थात शेण आणि गोमूत्र. यात दूध, थोडे दही आणि किंचित शुद्ध तूप मिसळले जाते. दिवा तयार करताना मिश्रणाला चिकटपणा यावा यासाठी थोडी तांदळाची पिठी मिसळली जाते व सर्वसाधारण मातीच्या पणत्या तयार केल्या जातात तसे हे दिवे तयार केले जातात. त्यात अत्यंत गुणकारी असा भीमसेनी कापूर मिसळला जातो. वाळवून विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातात. नेहमीच्या दिव्याप्रमाणे तीळतेलाची वा शुद्ध तुपाची वात यात लावता येते. विशेष म्हणजे ही गोमय पणती वात आणि तेल संपले तरी नंतर धुपाप्रमाणे शांत जळत राहाते. पंचगव्य असल्यामुळे आणि त्यात कोणतेही रासायनिक मिश्रण नसल्याने या दिव्याने वातावरण शुद्ध होते. कीटक, डासांचा त्रास कमी होतो. दिवा पूर्ण जळून गेल्यानंतर तयार होणारी राख ही खत म्हणून झाडाझुडपांत घालता येते वा किचन गार्डनसाठी वापरता येते. शेठ यांच्याकडे हे दिवे अत्यंत नाममात्र किमतीत उपलब्ध आहेत.

देशी गायी – उत्तम आरोग्यासाठी
देशी गायी सांभाळण्याची व गोउत्पादनांची कल्पना कशी सुचली असे विचारले असता सचिन शेठ म्हणाले, आज कोकणासह सगळीकडे देशी गायींचा तुटवडा आहे. जर्सी वा जर्सी-देशींचे संकरित वाण आढळून येते. दुग्धोत्पादन कमी असल्याने पशुपालन करणाऱ्यांचाही देशी गायींवर भर कमी असतो हे माझ्या लक्षात आले. पण आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर देशी गायी बाळगल्या, वाढवल्या पाहिजेत. पण मग ती सुरुवात स्वतःपासूनच का करू नये या विचारातूनच मंडणगडमध्ये आमची शेठ गोशाळा उभी राहिली. आज माध्याकडे जवळपास २७-२८ गायी आहे. याच गायींपासून निर्माण होणाऱ्या पंचगव्याचा वापर करून आरोग्योपयोगी उत्पादने का तयार करू नयेत या कल्पनेतून पुढे अयोध्या ऍग्रो व ऑरगॅनिक उत्पादन अंतर्गत पंचगव्य उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच यंदा साकारले गेले पंचगव्य दिवे. या दिव्यांसह शेठ यांच्याकडे गोमय साबण, हँड सॅनिटाझर, फ्लोअर क्लीनर, गोमूत्र अर्क, गोमूत्र घनवटी, देशी गायींचे तूप अशी अनेक उत्पादने तयार केली जातात. यासह अन्य काही आयुर्वेदिक उत्पादनेही तयार केली जातात. उत्तम आरोग्यासाठी अशा उत्पादनांचा अधिकाधिक वापर केला गेला पाहिजे असे शेठ आवर्जून सांगतात. पंचगव्य दिवे व अन्य गोउत्पादनांसाठी संपर्क – ९४२११३५५५२

**