News

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे निधन

नवी दिल्ली, दि. १८ नोव्हेंबर :  गोव्याच्या(GOA) माजी राज्यपाल(GOVERNOR) आणि भाजपच्या(BJP) दिग्गज नेत्या मृदुला सिन्हा (वय ७७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.  कुशाग्र राजकारणी आणि हरहुन्नरी साहित्यिक अशी त्यांची ख्याती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस(DEVENDRA ) यांच्यासह अनेक नेत्यांनी सिन्हांना आदरांजली वाहिली आहे.  

मृदुला सिन्हा(MRUDULA SINHA) सुरुवातीपासूनच जनसंघाशी जोडलेल्या होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना होत असे. मृदुला सिन्हा यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केल्या जात आहेत. मृदुला सिन्हा यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९४२ रोजी बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये झाला. ऑगस्ट २०१४ पर्यंत त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य होत्या.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या प्रचारादरम्यान सिन्हा भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी होत्या. २५ ऑगस्ट २०१४ रोजी गोव्याच्या राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. २३ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मृदुला सिन्हांनी राज्यपालपद भूषवले.

मृदुला सिन्हा यांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीव्यतिरिक्त लोक परंपरेविषयी त्यांचे लेखनही प्रसिद्ध आहे.  

Back to top button