डाव्यांचे बायबल : रूल्स फॉर रेडिकल्स
अमेरिकेतील डाव्यांमध्ये 1950 आणि 1960 च्या दशकांत एक मोठे नाव होते “सॉल अॅलिन्स्की”. हा अॅलिन्स्की कार्ल मार्क्ससारखा सिद्धांतवादी नव्हता. त्याने डाव्यांचा कोणताही सिद्धांत मांडला नाही, परंतु त्याची ओळख त्याच्या तंत्रासाठी आहे. अलिन्स्कीने आपल्या प्रयोग आणि अनुभवांमधून 50 आणि 60 च्या दशकांमध्येडाव्या चळवळी आणि संघर्षाची तंत्रे विकसित केली. 1971 मध्ये त्याने आपल्या सर्व अनुभवांचे सार एका पुस्तकात मांडले आणि आजही ते डाव्यांच्या डावपेचांचे बायबल मानले जाते – “रूल्स फॉर रेडिकल्स”.
डाव्यांचे सर्वात महत्त्वाचे पुस्तक कम्युनिस्ट मॅनिफेस्टो किंवा दास कॅपिटल नाही, तर ते आहे रूल्स फॉर रॅडिकल्स. जगातील 2 टक्के डाव्यांनीसुद्धा कम्युनिस्ट जाहीरनामा वाचलेला नसेल, रूल्स फॉर रॅडिकल्स प्रत्येक डाव्या चळवळीचा आणि डावपेचांचा कणा आहे. डाव्या चळवळीतील अॅलिन्स्कीचे महत्त्व आपण यावरून समजू शकतो की अध्यक्ष बराक ओबामा आणि पूर्वीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन हे एकेकाळी अॅलिन्स्कीचे शिष्य होते.
अलिन्स्कीचे 13 नियम आहेत. ते कोणतेही नैतिक सिद्धांत नाहीत तर निव्वळ डावपेच आहेत आणि ते ते केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नाहीत. तुम्हीसुद्धा ते वाचून जाणू शकता की किती नियम स्वतंत्र भारतातील उचापतखोरांनी वापरलेले आहेत.
नियम क्रमांक 1.
सामर्थ्य म्हणजे फक्त आपल्याकडे असलेले सामर्थ्यच नाही तर आअपल्या शत्रूला आपल्याकडे जे आहे असं वाटतं तेसुद्धा सामर्थ्य असते.
आपण पाहू शकतो की या डाव्यांनी कुठेही निवडणुका जिंकलेल्या नाहीत , जनता कुठेही त्यांच्या पाठीशी नाही, तरीही जनता आपल्या पाठीशी आहे आणि ते जे काही करीत आहेत त्याला जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे, हा भ्रम त्यांनी कायम ठेवला आहे.
नियम क्रमांक 2.
आपल्या अनुभवक्षेत्राच्या ( Expertise ) बाहेर जाऊन कधीही काही करू नका. तुम्हाला जाणवेल की डावी मंडळी आपल्या काही विशिष्ट मुद्द्यांवर आणि विशिष्ट भाषेत बोलतात.
नियम क्रमांक 3.
जेव्हा शक्य असेल तेव्हा आपल्या शत्रूला त्याच्या अनुभवक्षेत्राच्या मर्यादेबाहेर ओढून आणा. नेहमी काळजी, अनिश्चितता आणि सुरक्षितता कायम राखण्याचा प्रयत्न करा.
डावे आपणास नेहमीच त्यांच्या मुद्द्यांकडे खेचत नेतील. आपण त्यांच्या मुद्यावर आलात तर हा त्यांचा विजय आहे. म्हणूनच मी म्हणत असतो, कोणत्याही डाव्याशी वादविवादात कधीही प्रश्नांची उत्तरे देऊ नका – ही त्यांची तुम्हाला त्यांच्या मुद्द्याकडे खेचण्याची युक्ती असते. एकदा हे तुम्हाला कळाले की त्यांना त्यांच्या मुद्द्यांवर हरविण्याचा मोह होणार नाही.
नियम क्रमांक 4.
विरोधकांना त्यांचे स्वतःचे नियम पाळण्यास भाग पाडा.
एखादा प्रत्येक पत्राचे उत्तर देण्याचा नियम पाळत असेल तर त्याला 30000 पत्र पाठवा. कारण कोणताही माणूस आपला प्रत्येक नियम व्यावहारिक पातळीवर पाळू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही हे सिद्ध करता की तो स्वत:च्याच नियमांचे पालन करीत नाही, तेव्हा आपण मुळात त्याच्या विश्वासार्हतेची आणि प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करता. तुम्हाला आढळेल की डावे लोक नेहमी चांगल्याला चांगले, सहिष्णुला अधि सहिष्णु होण्यास भाग पाडतात. हिंदू सहिष्णु आहेत म्हणून ते तुमच्या सहनशीलतेची इतकी कसोटी पाहतील की तुमची सहनशीलताच संपून जाईल आणि मग ते म्हणू शकतील, की बघा, असहिष्णुता किती वाढली आहे.
नियम क्रमांक 5.
उपहास हे सर्वात मोठे शस्त्र आहे
याला कोणतेही उत्तर नाही, ते आपल्या विरोधाला निःशस्त्र करून टाकते. एखादी व्यक्ती टीकेला उत्तर देऊ शकते, उपहासाला नव्हे. डावे आपल्या ठराविक शत्रूची चेष्टा करतात हे आपण बर्याचदा पाहतो. त्यांच्यावर व्हॉट्सअॅप मेसेज, जोक्स, मेमे चालवतात व कविता विनोद करतात आणि नेटवर व्हायरल होतात. मात्र ही दुधारी तलवार आहे कारण आज देशात जर कोणी सर्वात हास्यास्पद पात्र असे तर तो आपला प्रिय पप्पू आहे.
नियम क्रमांक 6.
चांगली रणनीती म्हणजे जी आपल्या लोकांना आनंद देते.
अशाने लोक अत्यंत सक्रिय होतात आणि ते स्वतः नवीन डावपेचांचा विचार करतात.
नियम क्रमांक 7.
जेव्हा एखादा डावपेच रेंगाळतो तेव्हा लोक कंटाळतात. जुनी बातमी होणे टाळा.
नियम क्रमांक 8.
नेहमी दबाव कायम ठेवा. शत्रूने एका प्रकारचा प्रतिसाद तयार करताच त्याच्यावर दुसर्या बाजूने हल्ला करा.
हेच तर सध्या घडत आहे. एक प्रकरण थंड होत नाही तोच दुसरे प्रकरण उकरून काढण्यात येते. या बाबतीत डाव्यांच्या ऊर्जेला दाद द्यावी लागले. हे खेळणे ड्यूरासेलच्या बॅटरीवर चालते.
तुम्ही पहा, डाव्यांचा एक गट येतो तो काही दिवस चालतो, नंतर तो थंड होतो. हे उत्स्फूर्तपणे होत नाही. हे त्यांच्या याच नियमाचे पालन आहे. आधी काही दिवस देशातील कानाकोपऱ्यात गोमांसावरून हिंसाचाराच्या बातम्या आल्या. नंतर काय झाले? त्या का थांबल्या? मग काही दिवस चर्चवर हल्ले झाले. काही दिवस सतत बलात्काराच्या बातम्या येत राहिल्या. एकामागून एक दलितांवर हिंसाचाराचा पूर येतो. काही दिवसांपूर्वी एकाएकी सवर्णांवर अॅट्रॉसिटी अॅक्टखाली खटले दाखल होतात. त्यांच्या मुद्द्यांचे हंगाम चालतात. जशी काही गल्लीतली कुत्री एकदाच पाच-सात पिलांना जन्म देते आणि सगळ्या गल्लीत तुम्हाला पिल्लं-पिल्लं दिसायला लागतात. डाव्यांची कुत्रीद्धा एकाच वेळेस बातम्यांच्या पिलांना जन्म देते.
नियम क्रमांक 9.
धोका बहुतेकदा जेवढा जास्त असतो, त्यापेक्षा धोक्याची भीती जास्त असते आणि ती पसरवण्यात त्यांची प्रचार यंत्रणा नेहमीच सक्रिय यशस्वी असते.
नियम क्रमांक 10.
सतत दबाव कायम ठेवण्याची प्रक्रिया हाच डावपेचांचा मुख्य मुद्दा आहे. याच दबावाखाली शत्रू प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि त्यांच्या प्रतिक्रियांमधून राजकीय संधी निर्माण होतात.
नियम क्रमांक 11.
एखाद्या नकारात्मक गोष्टीचा जास्त फैलाव केला तर त्यातूनसुद्धा सकारात्मक मुद्दे उद्भवतात आणि त्यांचासुद्धा फायदा घेता येतो. शत्रू तुमच्याविरुद्ध हिंसक झाला तर त्यातून तुम्हाला सहानुभूती मिळू शकते. त्याच हेतूने ते हिंसा करतात आणि आपल्याला हिंसा करण्यास उद्युक्त करतात, यात काही आश्चर्य नाही.
नियम क्रमांक 12.
यशस्वी हल्ल्याचे मूल्य आहे एक सकारात्मक पर्याय.
शत्रूला या मुद्द्यावर कुरघोडी करू देऊ नका कि ज्या समस्येची तु्म्ही तक्रार करत आहात तिच्या उत्तरावाचून तुम्ही पकडले जाल.
या मुद्द्याकडे लक्ष द्या. मात्र अॅलिन्स्कीचा हा सल्ला डाव्यांनी ऐकला नाही. ते आपल्याला कधीही कोणत्याही समस्येचे उत्तर सांगताना दिसणार नाहीत. मात्र अॅलिन्स्कीने हा नियम सुचविला आहे की ही गोष्ट पकडली जाता कामा नये. परंतु या नियमातही डाव्यांच्या विचारात मूलभूत मुद्दाशत्रूवर हल्ला करणे आणि समस्येचा प्रसार हा आहे…उत्तराचा विचार हा वादविवादाचा केवळ एक मुद्दा आहे, त्यांच्या मूळ योजनेचा भाग नाही. डाव्यांना समस्येचे निराकरण करण्याचे साधन समजू नका. डावे म्हणजे ज्यांना उत्तराचीच समस्य असते ते.
नियम क्रमांक 13. (हा सर्वात महत्वाचा नियम आहे)
आपले लक्ष्य निवडा, त्याला गोठवा, त्याला व्यक्तीरूप द्या आणि धुळीत मिसळा… आपला हल्ला व्यक्तिकेंद्रित ठेवा.
त्याच्या समर्थनाचे सर्व मार्ग बंद करा आणि त्याला कोणत्याही कोपऱ्यातून सहानुभूती मिळू देऊ नका. व्यक्तीवर हल्ला करा, संस्थेवर नको. वैयक्तिक हल्ला अधिक परिणाम करतो.
या डावपेचाचे तर आपल्याला शेकडो उदाहरणे मिळतील. त्यांची संपूर्ण प्रणाली एका वेळी एका व्यक्तीवर हल्ला करते, एखाद्या पक्ष किंवा संस्थेवर नाही. उदाहरणार्थ, त्यांना एखाद्या भाजपा नेत्याच्या वक्तव्यावर गोंधळ घालायचा असे तर ते संपूर्ण पक्षावर हल्ला करत नाहीत. मीडिया दाखवतो की ‘गिरिराजसिंग यांचे वादग्रस्त वक्तव्य’ आणि काही काळाने पक्षाला वाटू लागते की एका व्यक्तीसाठी संपूर्ण पक्षाची बदनामी हो रही है. मग संपूर्ण पक्ष डॅमेज कंट्रोलसाठी त्या व्यक्तीला वेगळी करते. हे लांडगे आपल्या सावजाला त्याच्या कळपापासून वेगळे करून त्यांची लांडगेतोड करतात. हे वैयक्तिक हल्ल्यांचे धोरण आपण संपूर्ण जगात पाहू शकता, मग ते भारतात मोदींवर असोत किंवा अमेरिकेत ट्रम्पवर असो.
रूल्स फॉर रेडिकल्स हे गेल्या 40-50 वर्षांपासून डाव्यांच्या डावपेचांचा कणा राहिले आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हे पुस्तक ल्यूसिफर म्हणजे सैतानाला अर्पित केले आहे आणि ते खरोखरच सैतानाचे मॅन्युअल आहे. हा नैतिक अनैतिकतेचा प्रश्न नाही, ही निव्वळ रणनीती आहे. ती समजून घेणे आणि तिचा अभ्यास करणे हे निषिद्ध नाही कारण शत्रूला जाणून घेणे ही युद्धाच्या तयारीची पहिली पायरी आहे.
**