ठाणे, दि. ५ मार्च : सावरकर दर्शन प्रतिष्ठान व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने “हिंदुत्व (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रमा” चे आयोजन करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय निवासी अभ्यासवर्ग १९ ते २१ मार्च २०२१ पर्यंत, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, केशवशृष्टी उत्तन, भाईंदर येथे घेतला जाणार आहे. उपक्रमाचे हे यंदाचे तेरावे वर्ष आहे.
अभ्यासक्रमात भारतीय कम्युनिस्ट, इस्लाम व ख्रिस्ती समाज (स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भूमिका), हिंदुत्व आणि राष्ट्रवाद (स्वा. सावरकरांची भूमिका), हिंदुत्व आणि राष्ट्रवाद (रा.स्व.संघाची भूमिका), लोकजीवनातील हिंदुत्व, भारतीय उपखंडातला राष्ट्रवादाचा विकास, राष्ट्रवादापुढची आव्हाने या विषयांचा समावेश असणार आहे. राष्ट्रवादाचा अभ्यास असणारे ज्येष्ठ तज्ज्ञ व अनुभवी कार्यकर्ते या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
अभ्यासक्रमाचे शुल्क ७०० रुपये असून ते दि. १० मार्च २०२१ पूर्वी ऑनलाईन भरावे. नोंदणीची अंतिम तारीख १३ मार्च २०२१ आहे. (Registration Link : //iidl.org.in/hindutva/) निवडक पन्नास जणांनाच प्रवेश देण्यात येणार असून अधिक माहितीसाठी उत्तम पवार (8108024609) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.