HinduismOpinion

वैज्ञानिक आणि नैसर्गिक नियमांवर आधारित भारतीय कालगणनेचा प्रथम दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा

चैत्र शुद्ध प्रतिपदेशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटना जोडलेल्या आहेत, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक, धर्मराज युधिष्ठिर यांचा राज्याभिषेक, विक्रमादित्याच्या विक्रम संवतास प्रारंभ, सम्राट शालिवाहनाच्या शक कालगणनेस प्रारंभ, स्वामी दयानंद यांच्या माध्यमातून आर्य समाजाची स्थापना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म.

आंतरराष्ट्रीय उन्मादात ३१ डिसेंबरच्या रात्री मजामस्ती करत नव्या वर्षाचे स्वागत करण्याच्या नादात आपण आपल्या भारताचा गौरवशाली इतिहास व सांस्कृतिक वारसा विसरत चाललो आहोत, दुर्लक्षित करत चाललो आहोत. नववर्षाची पार्श्वभूमी आजच्या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे. 

आजमितीस जगभरात ७०पेक्षा अधिक कालगणना पद्धती अस्तित्वात आहेत. त्यांच्याशी संबंधित देशांमध्ये नववर्षाचा दिवस आपापल्या परंपरांनुसार सांस्कृतिक आणि धार्मिक रीतीरिवाज आणि मान्यतांनुसार साजरा केला जातो. परंतु या साऱ्या ब्रह्मांडाला व्यापणारे कालतत्त्व या कालगणनांचा आधार नसून व्यक्ती, घटना, वर्ग, संप्रदाय अथवा देशांचे वैशिष्ट्य त्यांचा आधार आहेत.

इसवी सनाचा प्रारंभ येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या घटनेवर आधारित आहे. पण त्यांचा जन्म आणि मृत्यू अद्याप अज्ञात आहे. इसवी सनाचे मूळ रोमन संवत आहे. इसवी सन पूर्व ७५३ मध्ये रोमन साम्राज्यात हे सुरू करण्यात आले. त्यावेळी त्या संवतात ३०४ दिवस आणि १० महिने होते. जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने अस्तित्वात नव्हते. इसवी सन पूर्व ५६मध्ये रोमन सम्राट ज्युलिअस सीझर ने ४५५ दिवसांचे वर्ष मानले. त्यानंतर ते ३६५ दिवसांचे करण्यात आले. 

ज्युलिअस सीझरने आपल्या नावावरून जुलै महिनाही तयार केला आणि आपल्या नातवाच्या ऑगस्टसच्या नावावरून ऑगस्ट महिना तयार केला. महिन्यांनंतर त्याने दिवसांची संख्याही निश्चित केली. त्यानुसार इसवी सनात ३६५ दिवस आणि १२ महिने तयार झाले. पण यात फरक दिसू लागले. पृथ्वीला सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस, सहा तास, ९ मिनिटे आणि १ सेकंद लागतात. त्यामुळे इसवी सन १५८३मध्ये यात अठरा दिवसांचा फरक पडला. 

ख्रिश्चन धर्मगुरू पोप ग्रेगरी यांनी ४ ऑक्टोबर हा दिवस १५ ऑक्टोबर केला आणि दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा असेल असा आदेश दिला. ४०० वर्षांनी यात एक दिवस जोडून तो ३० दिवसांचा करण्यात आला. याच कालगणनेला ग्रेगरिअन कालगणना म्हटले जाते जे संपूर्ण जगाने स्वीकारले. 

ख्रिश्चन संवत पूर्वी २५ मार्च रोजी सुरू होत असे. परंतु १८व्या शतकापासून ते १ जानेवारी पासून साजरे केले जाऊ लागले हे ही लक्षात घ्यायला हवे. या दिनदर्शिकेत जानेवारी ते जून हे महिने रोमन देवी-देवतांच्या नावावर आधारित आहेत. जुलै आणि ऑगस्टचा संबंध ज्यूलिअस सीझर आणि त्याचा नातू ऑगस्टस याच्याशी होता. त्याचप्रमाणे सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यांची नावे रोमन संवतच्या महिन्याच्या संख्येवर आधारित आहे. याचा क्रमशः अर्थ आहे ७,८,९ आणि १०. यातूनच इसवी सनाची अर्थहीनता उघडी पडते आणि ख्रिश्चन जगताची अशास्त्रीयता प्रकट होते.

याउलट भारतात महिन्यांची नावे ही निसर्गावर आधारित आहेत. चित्रा नक्षत्राची पौर्णिमा असते तो चैत्र, विशाखा नक्षत्राची पौर्णिमा असेल तो वैशाख, ज्येष्ठाचा ज्येष्ठ, श्रवणाचा श्रावण, उत्तरा भाद्रपदाचा भाद्रपद, कृतिकाचा कार्तिक, मृगाचा मार्गशीर्ष, पुष्याचा पौष, मघाचा माघ आणि उत्तरा फाल्गुन नक्षत्राची पौर्णिमा फाल्गुन अशी महिन्यांची नावे आहेत. 

अशाच पद्धतीने भारतात ३५४ दिवसांनंतर ३६५ दिवस, सहा तास, नऊ मिनिटे आणि अकरा सेकंदांचे अंतर दूर करण्यासाठी दोन वर्ष आठ मास १६ दिवसांनंतर अधिक मास वा पुरुषोत्तम मासाची व्यवस्था करून कालगणनेतील नैसर्गिक शुद्धता आणि वैज्ञानिकता कायम ठेवली आहे. 

उपरोक्त तथ्यांचा विचार करता आपण सर्व भारतीयांनी पूर्णतः वैज्ञानिक आणि नैसर्गिक नियमांवर आधारित युगांपासून चालत आलेल्या भारतीय कालगणनेचा प्रयोग केला पाहिजे. या कालगणनेचा प्रथम दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. ब्रह्मदेवाने सृष्टीची रचनाच या दिवशी केलेली असल्याने हा दिवस आपणां भारतवासियांसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठीच पूजनीय आहे. 

चैत्र शुद्ध प्रतिपदेशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटना जोडलेल्या आहेत, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक, धर्मराज युधिष्ठिर यांचा राज्याभिषेक, विक्रमादित्याच्या विक्रम संवतास प्रारंभ, सम्राट शालिवाहनाच्या शक कालगणनेस प्रारंभ, स्वामी दयानंद यांच्या माध्यमातून आर्य समाजाची स्थापना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म.

इकडचे तुकडे तिकडे जोडून, कपोलकल्पित सिद्धान्त आणि वडाची साल पिंपळाला लावत तयार करण्यात आलेल्या इसवी सनाच्या आधारावर नवीन वर्ष साजरे करणे एकवेळ समजून घेता येईल. परंतु, त्यासाठी आपण भारतीय ही परंपरांचे भान विसरून त्यामागे का लागतो हे काही समजून घेता येणार नाही. 

युरोपीय ख्रिश्चन साम्राज्याच्या प्रभावकाळात ही कालगणना आपल्यावर थोपवण्यात आली. त्यावेळच्या मानसिक गुलामगिरीतून आपण ख्रिश्चन वर्ष साजरे करत आलो आहोत ही आपल्यासाठी लज्जास्पद बाब नाही का. चला या सगळ्याचा त्याग करून आपले भारतीय वर्ष आनंदाने साजरे करू या. ख्रिश्चन नववर्षाचा प्रारंभ नाच-गाणे, उच्छृंखलपणा, रात्रभर हॉटेलांमध्ये दारूच्या नशेत धमाल करण्याने होतो. भारतीय नववर्षाचा प्रारंभ गुढीपाडव्याने, नवरात्र पूजनाने आणि विविध व्रतवैकल्यांनी होतो हा फरकही लक्षात घेण्याजोगा आहे.

  • नरेंद्र सहगल

**

Back to top button