
कल्याण, दि. ३० एप्रिल : मध्यरेल्वेच्या वांगणी स्टेशनवर एका लहानग्याचा जीव वाचविणाऱ्या वीर मयुर शेळके यांचा सन्मान भारतीय रेल्वे मजदूर संघ, कल्याण शाखेतर्फे करण्यात आला. आपले अतुलनीय प्रसंगावधान आणि धाडसाचा परिचय देणाऱ्या मयूर शेळके यांचे हे कार्य समाजाला प्रेरित करणारे असेच आहे. त्यांच्या या धाडसाचे कौतुक करण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री मंगेश देशपांडे तसेच त्यांचे सहकारी रत्नाकर वागज,अशोक वडवळकर,केशव कुमार,जितेंद्र सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या लहानग्याला वाचवण्यात आले तो साहील शिरसाट आणि त्याची आई सरिताताई शिरसाट याही यावेळी उपस्थित होत्या