
बीड, दि. १४ मे : आपल्या सहजसोप्या शैलीतून कीर्तनाद्वारे प्रबोधन करणारे तसेच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार – प्रसार करणारे वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार हभप बाबासाहेब महाराज इंगळे यांचे आज निधन झाले.
वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार, तब्बल ४० दशके कीर्तनाच्या माध्यमातून संत साहित्याचा महाराष्ट्रात प्रचार आणि प्रसार विनोदीशैलीतून केला. एवढेच नाही तर वडवणी तालुक्यातल्या चिंचवडगाव इथल्या परमार्थ आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी गोर गरिबांच्या मुला मुलींचे लग्न अत्यल्प दरात लावून दिले. विविध साहित्य निर्माण करून त्याद्वारे महाराजांनी ग्रामीण भागात प्रबोधन केले.
बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे.