पूरग्रस्त गणेशमूर्तीकाराला रा.स्व.संघ जनकल्याण समितीचा मदतीचा हात
राजापूर, दि. १६ ऑगस्ट : कोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण कोकणात पुरमय परिस्थिती निर्माण झाली होती. राजापूर तालुक्यातील मौजे मूर सुतारवाडी या गावात राहणारे प्रसाद प्रकाश सुतार यांनी शाडूच्या मातीपासून तयार केलेले ६० ते ७० गणेशमूर्ती या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या दक्षिण रत्नागिरीच्या वतीने नुकसानग्रस्त प्रसाद सुतार यांना जनकल्याण समितीचे अध्यक्ष गोविंदभाई पटेल यांच्या हस्ते २० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
जामदा नदीचे पाणी घरात घुसल्याने येथील गावातील अनेकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. त्यापैकी एक प्रसाद सुतार यांनी शाडूच्या मातीपासून गणपती तयार करुन कारखान्यात ठेवले होते. अतिवृष्टी झाली त्या रात्री जामदा नदीने रौद्र रूप धारण केल्याने पुराचे पाणी गणपती कारखान्यात घुसले. यामुळे तयार केलेल्या ६० ते ७० गणेशमूर्ती आणि शाडू मातीसह प्रसाद सुतार यांचे अतोनात नुकसान झाले. तसेच फर्निचर साठी ठेवलेले लाकडी सामान वाहून गेले.