संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धा
मुंबई, दि. १४ ऑक्टोबर : समरसता अध्ययन केंद्र या संस्थेच्या वतीने २६ नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून संविधान दिन साजरा केला जात आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संविधानातील समता सूत्र व अधिवक्ता (वकील) यांच्यासाठी संविधानाची उद्देशिका एक आकलन असे दोन विषय स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. निबंधाची शब्द मर्यादा एक हजार असून तीन विजेत्यांना रोख रकमेचे पारितोषिक व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
निबंध पाठवण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२१ आहे. स्पर्धकांनी आपले निबंध समीर कांबळे.१-ए,जगदिश सोसायटी, एन.के.टी.कॉलेज समोर, वाघेला चहा डेपोच्यामागे,खारकर आळी,ठाणे (प.) ४००६०१ या पत्त्यावर किंवा samvidhan2021@gmail.com या इमेलवर पाठवावे. अधिक माहिती साठी समीर कांबळे(८१०८८८९७३३) किंवा माया पोतदार (7875063812) यांच्याशी संपर्क साधावा.