५ हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणाऱ्या अग्नी ५ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
नवी दिल्ली : ५ हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणाऱ्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. अग्नी-५ ची क्षमता आणि अचूकता ही अन्य क्षेपणास्त्राच्या तुलनेत अधिक आहे.
अग्नीची हल्ला करण्याची क्षमता जास्त असून तब्बल पाच हजार किलोमीटरपर्यंत अचून लक्ष्य वेधू शकते. या क्षेपणास्त्राच्या चाचणीबाबत चीनने चिंता व्यक्त केली होती. अग्नी ५ मध्ये लेव्हल ३ इंधन इंजिन आहे.
अग्नी ५ हे दिड टनाएवढा दारुगोळा किंवा अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. अग्नी पाचमुळे याआधीच संपूर्ण चीन हा मारक टप्प्यात आला आहे. जगात मोजक्या देशांकडे एवढ्या दूरपर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत, त्यामध्ये भारताचाही समावेश आहे.
देशाकडे ‘अग्नी’ या प्रकारातील विविध मारक पल्ला असलेली ५ प्रकारची क्षेपणास्त्रे सेवेत आहेत. अग्नी १ क्षेपणास्त्राची मारक क्षमता ७०० किलोमीटर आहे. तर अग्नी २ चा पल्ला २०००-३०००, अग्नी ३ चा पल्ला ३५००, अग्नी ४ चा पल्ला ४००० आणि अग्नी ५ चा पल्ला ५००० किलोमीटर पेक्षा जास्त आहे.
**