News

वसुबारस

आपली भारतीय संस्कृती विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. उच्च आदर्शांचे पूजन, उत्तमाचा आदर, सहकार्यांविषयी प्रेम, समाजासाठी समर्पण, कृतज्ञता ही श्रेष्ठ जीवनमूल्ये प्राचीन काळापासून जतन केली आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये परोपकारार्थ समर्पितांना आदराने मातेचे स्थान देऊन गौरवान्वित करण्यात आले आहे. नद्यांना लोकमाता, दिव्य औषधींना वनस्पती माता, भूमी ही भूमाता व गायीला गोमाता म्हणून संबोधिले जाते. भारताच्या अनादि काळापासून चालत आलेल्या महान संस्कृतीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र, भगवान परशुराम, सर्वच ऋषिमुनी व समस्त भक्तांच्या भावजगताचे सम्राट भगवान श्रीकृष्ण यांचे गोमातेवरील प्रेम सुप्रसिद्ध आहे. सर्व प्रकारच्या धनांमध्ये पशूधन हे श्रेष्ठ मानण्यात आले आहे. त्यातील गोधनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

मातृस्वरुप, कामधेनु व 33 कोटी देवदेवतांचे अधिष्ठान अशी ही गोमाता आहे. अत्यंत उपयुक्त असणार्‍या गोमातेला कामधेनु म्हणणे यथार्थ आहे. कारण गोमातेच्या प्रत्येक अवयवाचे व तिच्यापासून मिळणार्या प्रत्येक द्रव्याचे श्रेष्ठत्व वेदांपासून ते सध्याच्या पाश्चात्य वैद्यकीय पुस्तकांमधूनही सांगण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत गोमातेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे सृष्टी निर्मितीचा प्रक्रियेपासून मानवा बरोबर प्रत्येक युगामध्ये गाय त्याच्या बरोबर त्याचे पोषण करण्याकरता संवर्धन करण्याकरता व प्रकृतीचे संतुलन करण्याकरता नेहमी बरोबर आहे त्यामुळे युगपरीवर्तना नंतर गायीने आपल्या स्वरूपात युगाप्रमाणे बदल स्वीकारला आहे व अखिल विश्वाला तारक म्हणूनच आपली भूमिका ती अबोल पणे बजावत आहे असे श्रद्धायुक्त अंतःकरणाने तिची सेवा केल्यानंतर आपल्या अंतरंगात भाव दर्शन होते अशा मातृस्वरूप असलेल्या गोमातेचे व तिच्या नूतन जन्मलेल्या वत्साचे पूजन दीपोत्सव पर्वाच्या दुसर्‍या दिवशी करण्याची आपली सनातन परंपरा आहे.


पूर्वी घरोघरी गाय असल्याने व शहरांमध्ये ही गोशाळा, गोठे असल्याने त्या ठिकाणी जाऊन कौटुंबिक पद्धतीने गो पूजन होत असे. बदलत्या जागतिकीकरणाच्या वेगात व झालेल्या शहरीकरणामुळे शहरापासून पर्यायाने लोकांपासून गाय दूर झाली. त्याचा प्रभाव एका पिढीतून दुसर्या पिढीवर होत गेला आणि गाईचे महत्त्व समाजाच्या मनातून कमी कमी होत गेले. त्यामुळे व्याख्याने ,प्रबोधन, प्रशिक्षण वर्ग या माध्यमातून भारतीय गोवंशाच्या गायींचे महत्व समाजात पुन्हा प्रस्थापित करणे अत्यावश्यक आहे.


सर्व देवमयी है गो असे स्कंदपुराणात उद्धृत झाले आहे तेहेतीस कोटी देव-देवतांच्या पृथ्वीवरील आश्रयाचे एकमेव स्थान भारतीय गायीचे शरीर हेच आहे,त्यामुळे देवस्वरूप मातृस्वरूप, पृथ्वीस्वरूप असलेली भारतीय वंशाची गाय ही आपली माता आहे ही श्रद्धा आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात रुजली पाहिजे.
ऋग्वेदातील गोविज्ञान आपल्याला स्पष्टपणे सांगते की सृष्टीच्या पंचमहाभूतांचे संतुलन गाईच्या अस्तित्वाने होत राहते,त्यामुळे तिचे संरक्षण, संवर्धन आणि पालन हे सेवा रूपाने करणे अत्यंत गरजेचे आहे.
दीपावलीच्या या आनंद उत्सवाच्या वेळी अगदी प्रथम सवत्स गायीचे पूजन करून आपली कृतज्ञता व्यक्त करायची असते. म्हणून वसुबारस या दिवशी गाईचे पूजन करणे आपली प्रथा आहे चला तर मग आनंदाने उत्साहाने गो वसुबारस हा सामाजिक उत्सव म्हणून साजरा करूया.


आपल्या परिचितांना,कुटुंबातील सदस्यांना निवासस्थानातील सहकार्‍यांना भारतीय वंशाच्या गायीचे महत्त्व आणि महात्म्य समजून सांगू या आणि तिचे पूजन अंतःकरणपूर्वक करूया.
आपल्याला शक्य असेल तर जवळच्या गोशाळेत जाऊन प्रत्यक्ष पूजन करावे जर तसे संभव होत नसेल तर गो प्रतिमेचे पूजन सार्वजनिक रित्या करून आपण आपला भाव प्रगट करावा आणि गो नमनाचे खालील श्लोक म्हणावे.
नमो गोभ्यः श्रीमतीभ्य सौरभेयीभ्य एव च । नमो ब्रह्मसुताभ्यश्चभ्यः पवित्राभ्यो नमो नमः ॥
सर्वकामदुधे देवि सर्वतीर्थाभिषेचिनि । पावनी सुरभिश्रेष्ठे देवि तुभ्यं नमो नमः ॥

रोगनिवारणााठी भारतीय वंशाच्या गायीचे दूध, दही, ताक, लोणी, शुद्ध तूप, गोमूत्र व गोमय(शेण) यांचा वापर औषधीय स्वरुपात करुन मनुष्याचे स्वास्थ्य रक्षण करता येते. योगशास्त्रानुसार भारतीय गोवंशात आढळणारे वशिंड म्हणजे पाठीवरील उंचवटा हे सूर्यकेतु व चंद्रकेतु नाडीचे संगमस्थान आहे. वेदांमध्ये सूर्यनारायणाच्या किरणांना गौ असेही म्हणतात. सूर्यकिरणात ज्योती, आयु व गौ ह्या तीन प्रकृती आहेत. याचमुळे वनस्पती व जीवजगताला पुरेशी ऊर्जा मिळत राहते. भारतीय गोवंशाच्या वशिंडातील सूर्यकेतू नाडीच्या अस्तित्वाने गोप्रकृतीच्या किरण शोषले जातात व त्या ऊर्जेचा प्रभाव गोमय, गोमूत्र, गोदुग्ध या मूळ गव्यांवर पडतो. अशी गव्ये ऊर्जावान, तेज प्रदान करणारी व बलवर्धक आहेत. भारतीय गोवंशापासून प्राप्त होणारी गव्ये (गोमय म्हणजे शेण, गोमूत्र आणि दूध) म्हणजे मानवी शरिरात उद्भवणार्या अनेक प्रकारच्या रोगांवर उत्तम विकल्प आहे.


गोमयामध्ये उपयुक्त 22 गुणतत्त्वे, गोमूत्रात शरीरसंतुलनासाठी उपयुक्त 24 गुणतत्त्वे आणि दुधामध्ये 18 पोषणमूल्ये आहेत, असा महत्त्वपूर्ण उल्लेख प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतो. मुळातच अत्यंत औषधी गुणधर्म असलेली ही गव्ये इतर औषधी वनस्पतींशी संयोग पावल्यानंतर व्याधींवर अधिक परिणामकारकरित्या कार्य करतात.


मानवी शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. शरीरातील या पंचतत्त्वांच्या असंतुलनाने अनेक रोग उद्भवतात. भारतीय गोवंशापासून मिळणार्या गव्य आणि उपगव्य यांच्या नियमित सेवनाने शरीरातील पंचतत्त्वांचे संतुलन दीर्घकाळ राखता येते.


अमृतं क्षीर भोजनम् ।- शरीर बलवर्धनासाठी भारतीय गोवंशापासून मिळणारे दूध- सर्व औषधी सार असे संबोधिले आहे. आजीवन सात्म्य म्हणजे जन्मलेल्या तान्ह्या बाळापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना सहज पचणारे, शरीरातील 18 पोषणमूल्यांची पूर्तता करणारे एकच प्राकृतिक औषध! भ्रम, मद, दारिद्-य, शुष्कता, भूक, जीर्णज्वर व रक्तपित्ताच्या रोगावर औषध म्हणून कार्य करते.

तक्र शक्रस्य दुर्लभ ।- भारतीय गोवंशाच्या गायीच्या दुधापासून तयार केलेले ताक पचण्यास हलके, जठराग्निद्दीपक, वातनाशक, मूत्रपिंड व मूत्राशय निगडित आजारांवर अत्यंत प्रभावशाली

घृतं प्राश्य विशुद्धति ।- भारतीय गोवंशाच्या गायीच्या दुधापासून तयार केलेले तूप ग्रहणशक्ती, बुद्धी व स्मृतिवर्धक, विष व ज्वरनाशक.  विविध औषधांच्या संयोगाने अनेक कार्य करणारे एकमेव औषध.  
गोमूत्र धन्वंतरी । - गोमूत्र रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. रक्त शुद्ध करते. अतिरिक्त मेद घटविते. अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल व अँटी ऑक्सिडंट असते.

पंचगव्य महारसायन ।- गोमय रस, गोमूत्र, गोदुग्ध, ताक व घृत यांच्या विविध प्रमाणांतील मिश्रणांनी तयार होणार्या औषधास पंचगव्य महारसायन म्हणतात.

देशविदेशातील विविध स्तरातील व्यक्तिंनी पंचगव्य चिकित्सेचा विलक्षण अनुभव घेतला आहे. दुर्धर, वेदनादायी, कायमचे पंगुत्व निर्माण करणार्‍या, असाध्य वाटणार्‍या व्याधींतून पूर्ण बरे होऊन रोगाचे समूळ निवारणही होऊन आता ते सर्व आरोग्यपूर्ण, आनंदी जीवन जगत आहेत.

आपण उत्साहाने गो पूजनाचे कार्यक्रम करताना गोमातेच्या प्रकृतीच्या हितासाठी खालील गोष्टी टाळाव्यात.

1.कुठल्याही प्राण्यांची पचनशक्ती हे शिजवलेले भाजलेले अन्नपचन होण्याच्या दृष्टीने तयार झालेले नाही त्यामुळे पूजनाच्या निमित्ताने प्रत्येक जण श्रद्धेने गोमातेला पुरणपोळी चा नैवेद्य दाखवतात अचानक आलेल्या अशा अन्नपदार्थांमुळे गायीच्या शरीरातील पचन तंत्र बिघडते आणि पोटात अतिरिक्त वायू निर्माण होऊन त्रास होतो म्हणून जो घास आपल्याला गाईला द्यायचा आहे ते धान्य रुपात द्यावा.

2.गाय आणि वासरू यांच्यात विलक्षण नाते असते आपण आपल्या आनंदासाठी वासराची अथवा गाईच्या जवळ जात असताना सावधपणे वासराला व गाईला स्पर्श करावा आणि आपल्यापासून त्यांना त्रास होणार नाही याची जरूर खबरदारी घ्यावी

3.दिवसभर गाय अथवा वासरू दुसर्‍या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणचे वातावरण आजूबाजूचा परिसर हा भिन्न असल्याने त्यांची मानसिकता बिथरली जाऊ शकते म्हणून गाय आणि वासरू यांचे सावधपणे पूजन करावे.

  1. गो पूजनाची वेळ हे सायंकाळी गोरज मुहूर्तावर असते त्यामुळे शक्यतो सायंकाळी सहा ते सात या वेळातच गोपूजन करावे व लगेच गाय आणि वासरू यांना सुरक्षित पणे गोशाळेत न्यावे.
  2. वसुबारसेच्या निमित्ताने आपण केलेले पूजन स्मरणात ठेवून किमान आठवड्यातून एकदा तरी गो दर्शनासाठी गोशाळेत जरूर जावे व गोमातेबरोबर सहवास करावा व शक्य ती सेवाही करावी.
    ॥ श्रीसुरभ्ये नमः ॥ ॥ श्रीसुरभ्ये नमः ॥ ॥ श्रीसुरभ्ये नमः ॥ ****

गव्यसिद्ध डॉ. आमोद केळकर
एम. डी. पंचगव्य,
सचिव, पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन (पंजीकृत
अधिक माहितीसाठी संपर्क- 9011 64 8383/ 9834 82 7171

लेखाचे सर्व हक्क लेखकाचे स्वाधीन.

Back to top button