केशवसृष्टी पुरस्कार वितरण सोहळ्याचे १३ नोव्हेंबर रोजी आयोजन
मुंबई, दि. ११ नोव्हेंबर : समाजातील दुर्बल व्यक्तींच्या किंवा समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी नि:स्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा / संस्थांचा गुणगौरव करण्यासाठी परिचित असलेल्या केशवसृष्टी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वा. या वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा विलेपार्ले येथील राजपुरिया सभागृहात संपन्न होणार आहे. केशवसृष्टीचा यंदाचा १२ वा पुरस्कार वितरण सोहळा आहे.
यावर्षीचे या कार्यक्रमाचे मानकरी चाळीसगांव येथील मिनाक्षी निकम यांच्या दिव्यांग, विधवा, परितक्त्या, निराधार महिलांचे पुनर्वसन करुन त्यांना स्वाभिमानाचे जीवन देणाऱ्या ‘स्वयंदिप’ या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. सोहळ्याचे प्रमुख अतिथी दीपस्तंभ मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दै. महाराष्ट्र टाईम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
एक लाख रुपयाचा धनादेश , मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.