News

समतायुक्त शोषणविरहीत समरस समाज निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत: डॉ. मोहनजी भागवत

पू. सरसंघचालकांच्या उपस्थितीत देवगिरी प्रांताची प्रांत समन्वय बैठक संपन्न.

संभाजीनगर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत यांच्या संभाजीनगरातील पाच दिवसीय कार्यक्रमाच्या आजच्या चौथ्या दिवशी दि. १४ नोव्हेंबर, रविवार रोजी देवगिरी प्रांताची प्रांत समन्वय बैठक संपन्न . पू. सरसंघचालकांनी देवगिरी प्रांतातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यां सोबत आज संघटनात्मक विषयावर संवाद साधला व मार्गदर्शन केले. उपस्थित कार्यकर्त्यांना पर्यावरण, समरसता, गोसेवा आणि कुटुंब प्रबोधन या विषयांवर मार्गदर्शन केले.

पू. सरसंघचालक म्हणाले, “भोगवादापासून दूर राहण्यासाठी संयमांचा संस्कार झाला पाहिजे. विविध संघटनांच्या सामूहिक व्यवहारातून सामाजिक परिवर्तन घडून यावे, असा आपल्याला अधिक प्रयत्न करावा लागेल. विकास व पर्यावरण दोन्हीही आवश्यक आहेत, पण त्यासाठी दोघांचे संतुलन सांभाळणारे तंत्रज्ञान आणलं पाहिजे. ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि अक्षय ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होईल. तसेच, गौ-ऊर्जेचे तंत्र विकसित करावे लागेल मग ते स्थापित होईल.”

कुटुंब प्रबोधन याविषयावर मार्गदर्शन करताना पूजनीय सरसंघचालक म्हणाले की, कुटुंब सदस्यांमध्ये सुसंवाद वाढला पाहिजे. घरात भाषा,भूषा,भोजन, भजन, भवन,भ्रमण यांच्या माध्यमातून परिवारात संस्कार घडले पाहिजेत. समाजातील सर्व जातीवर्गातील कुटुंबाकडे आपलं सहज जाण येणं असायला हवं आणि कौटुंबिक मित्रता निर्माण करावी
आपल्या विविध संघटनांमध्ये या विषयांवर प्रशिक्षणाचा सांगोपांग विचार झाला पाहिजे, असेही पू. सरसंघचालक यांनी नमूद केले.

आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस पू. सरसंघचालकांनी केले अभिवादन

आज सकाळी १० वाजता क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून पू. सरसंघचालकांनी अभिवादन केले व बैठकीस सुरुवात झाली. प्रास्ताविक मध्ये क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रकार्याचे स्मरण केले. क्रांतिगुरु लहुजी वस्ताद यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहुजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडूनच मिळाले होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी अतिशय पराक्रमी पुरुष होते. युद्धकलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे. वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे राघोजी त्याकाळी प्रसिद्ध होते. राघोजी साळवे यांनी एकदा वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन राजदरबारी सादर केलं व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते अशी माहिती यावेळी दिली. तसेच गुरुतेगबहादूर यांचे ४०० वे प्रकाशवर्ष साजरी करण्यासाठी आव्हान केले.

  • विश्व संवाद केंद्र, देवगिरी
Back to top button