छत्रपती शिवाजी जयंती विशेष माहिती श्रृंखला – 6
छत्रसाल हा बुंदेलखंडाचा युवराज.छत्रपती शिवाजीमहाराजांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी बुंदेलखंडात स्वतंत्र राज्यच स्थापन केले.इसवी सन 1672 च्या पावसाळ्यात चंपतराय बुंदेल्याचा हा मुलगा छत्रसाल शिवरायांना भेटायला आला. तो राजांना म्हणाला “मी मुघलांची चाकरी केली; पण मला त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे तो म्हणाला “तुर्कांचा आणि आपला कधी मिलाफ झाला आहे का?मला तुमच्याकडे नोकरी द्या”
शिवरायांनी छत्रसालाला उपदेश केला “तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी आहात.तुम्ही आपली मायभूमी स्वतंत्र करा.मुघलांना मारुन काढा.अंत: करणात ब्रजराज श्रीकृष्णांना आठवा आणि हाती तलवार घ्या!मी माझी तलवार तुम्हाला देतो असे म्हणत शिवरायांनी आपली तलवार छत्रसालाला दिली.छत्रसाल परत गेला आणि त्याने आपली भूमी स्वतंत्र केली.ही शिवरायांचीच प्रेरणा होती.
छत्रसाल यांच्या समकालीन कवी लाल यांनी “छत्रप्रकास” या ग्रंथाची निर्मिती केली आहे,त्यात छत्रपती शिवराय ,त्यांचा पराक्रम यांचा गौरव केलेला आहे. त्यात लिहीलय “हिंदु आणि मुसलमान हे दोन धर्म आहेत.त्यांच्यात नेहमीपासून वैर चालत आले आहे,ज्याप्रमाणे देव – दानवांप्रमाणे हे वैर आहे.जेव्हापासुन मुसलमान पातशाह दिल्लीच्या तख्तावर बसला आहे,तेव्हापासून हिंदुंच्या मनाला ठेच लागली आहे. हिंदुंच्या तीर्थक्षेत्रावर खूप कर लावला आहे.वेदांना भींतीत दाबले गेले आहे.हिंदुच्या प्रत्येक घरावर जझिया कर लावला गेला आहे.मुसलमानांना जे चांगले वाटत आहे,तेच ते करत आहेत. सगळे राजपुत त्यांच्या चरणाशी पडले आहेत. केवळ एकच शिवराज अर्थात शिवाजीमहाराज आहेत,जे आपल्या मर्जीनुसार वागत आहेत आणि मुसलमानांच्याविरुध्द ते युध्द करत आहेत.
(संदर्भ – छत्रप्रकास काव्य, अध्याय 11 दोहा क्रमांक-2)
औरंगजेबाच्या राज्यातील हिंदुची दयनीय अवस्था आणि छत्रपती शिवाजीमहाराजांचा पराक्रम याची ओळख “छत्रप्रकास” काव्यातुन होते.
छत्रसाल यांनी बुंदेलखंडात मोठा पराक्रम केला. छ.शिवाजीमहाराजांनंतरही त्यांचा मराठेशाहीशी घनिष्ठ संबंध राहिलेला होता. थोरले बाजीराव पेशवे यांना तर ते आपले मानसपुत्र मानत असत.