गुरु: साक्षात् परब्रह्म!
‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ असा ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो, ज्यांच्या लेखणीपासून जगातील कुठलाही विषय अस्पर्श राहू शकला नाही, त्या व्यासमुनींच्या स्मरणार्थ आषाढातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून अत्यंत प्राचीन काळापासून साजरी केली जाते. गुरूशिवाय विद्येची प्रगती होत नाही.जी विद्या मुक्तीकडे,अमृतत्वाकडे नेते तीच खरी विद्या. ती गुरूकडूनच प्राप्त करून घ्यायची असते.
गुरुपौर्णिमा हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.
आचार्य चाणक्य हे एक महान व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपल्या विद्वत्ता आणि कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय इतिहासाची दिशा बदलून टाकली. गुरु चाणक्य हे कुशल राजकारणी आणि उत्तम अर्थतज्ज्ञ म्हणून जगप्रसिद्ध आहेत. आपला वीर शिष्य चंद्रगुप्त मौर्य याला राज्याचे गादीवर बसवून त्याने दाखवलेल्या विलक्षण प्रतिभेची संपूर्ण जगाला ओळख आहे.
यह तन विष की बेलरी, गुरु अमृत की खान।
शीश दियो जो गुरु मिले, तो भी सस्ता जान।।
स्वामी विवेकानंदांना लहानपणापासूनच ईश्वरप्राप्तीची इच्छा होती. गुरु परमहंसांचा आशीर्वाद मिळाल्यावरच त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली. गुरूंच्या कृपेनेच आत्मसाक्षात्कार शक्य झाला.
https://www.facebook.com/VSKKokan/videos/3196703857209562/?extid=NS-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C-GK2C
प्रत्येक क्षेत्रात अध्यात्मिक, शिक्षण, खेळ, साहित्य एक गुरू आहे. थोर पुरुष म्हणाले आहेत की तुम्हाला जर यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला एक चांगला गुरु मिळाला पाहिजे. शिक्षणाशिवाय यश मिळवणे कठीण आहे जे व्यर्थ आहे.“गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो” यासह अनेक ओळी गुरुच्या वैभवाचे वर्णन करण्यासाठी पुरेसे आहेत, परंतु वास्तव म्हणजे गुरुची महिमा आणि कृपा असीम आहेत.
देशाचे भविष्य घडविणारे गुरु हेच आहेत, विद्यार्थांना देशसेवेसाठी प्रेरित करण्याचे काम गुरुंच्या हाती आहे.भारताला विश्वगुरु पदा पर्यंत पोहचवण्याचे कार्य गुरूंच्या आशीर्वादा शिवाय अशक्य आहे.