Opinion

दिल्ली ते मुंबई इलेकट्रीक महामार्ग बांधणार!

नितीन गडकरींची घोषणा

दिल्ली ते मुंबई इलेकट्रीक महामार्ग बांधण्याची घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. भारतातील महामार्गांवरील प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. मुंबईची लोकल सेवा जशी पूर्णपणे विजेवर चालते तशा, या महामार्गावर विजेवर चालणाऱ्या ट्रॉलीबसेस चालवण्यात येतील त्याच पद्धतीने पुढे जाऊन या मार्गावर अशा पद्धतीने ट्रॉलीट्रक्स सुद्धा चालवण्याची सोय लवकरच केली जाईल अशीही घोषणा गडकरींनी यावेळी केली.

गडकरींनी देशातील सर्व अवजड वाहनधारकांना त्यांनी आपल्या गाड्या या जास्तीतजास्त मिथेनॉल, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन या कमीत कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनावर चालवाव्यात असे आवाहनही केले. “देशात दळणवळणावरती होणार खर्च कमी केला आणि त्याला जर कमी प्रदूषणकारी पर्याय उपलब्ध करून दिला तर देशाच्या विकासात मोठाच हातभार लागेल आणि देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा अडथळा दूर करता येईल.”

इलेक्ट्रिक महामार्ग म्हणजे काय?

इलेक्ट्रिक हायवेसंदर्भात सांगायचं झालं ही संकल्पना काहीशी ट्रेन किंवा मेट्रोसारखी आहे. ज्याप्रकारे विजेवर चालणाऱ्या ट्रेनच्या इंजिनवर म्हणजेच छतावर असणारा पेंट्राग्राफच्या मदतीने ऊर्जा वापरुन ट्रेन चालवल्या जातात तसाच काहीसा प्रकार इलेक्ट्रिक हायवेवर असतो.

उपलब्ध रस्त्यांवर विद्युतवाहिन्यांचं जाळं निर्माण करण्याबरोबरच सध्या उपलब्ध असणाऱ्या वाहनांची रचना आणि तंत्रज्ञानामध्ये मोठा बदल करावा लागेल. भारतामध्ये खरोखरच इलेक्ट्रिक हायवे निर्माण झाले तर प्रदुषणाच्या समस्येवरही मोठ्याप्रमाणात नियंत्रण मिळवता येईल.

Back to top button