कारगिल विजय दिवस
कारगिल विजय दिन म्हणून २६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता होय. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. इ० स० १९९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करांने रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. भारतीय सरकाराने घुसखोरांना हुसकावण्यासाठी ‘ऑपरेशन विजय’ या नावाखाली कार्यवाही चालू केली. भारतीय वायुसेनेकडून ही ‘ऑपरेशन सफेद सागर सुरू झाले. या ऑपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची नेआण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने पार पाडली.
भारताने इ.स. १९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पर्यंत अनेक महत्त्वच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या. युद्धात ५२७ भारतीय सैनिक शहीद झाले तर अनेक जख्मी झाले. हा युद्ध ६० दिवसापर्यंत चालला होता आणि सुमारे ५० हजार सैनिकांनी यात सहभाग केला होता.
देशातील सैनिकांना आदर करण्याचा हा दिवस असती. भारतीय लष्करातील सैनिकांना कारगिल युद्धात दर्शवलेल्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी देशाच पंतप्रधान, संरक्षण मंत्री व इतर अधिकारी अमर जवान स्तंभाला भेट देतात, त्यांच्या स्मरण करतात व त्यांना श्रध्दांजली देतात.देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आपल्या मातृभूमिच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या नायकांचा देशाला अभिमान आहे.