शरणार्थी रोहिंग्या एक आंतरराष्ट्रीय समस्या:
युरोपचा प्रॉब्लेम जगाचा प्रॉब्लेम असतो पण जगाचा प्रॉब्लेम यूरोपचा प्रॉब्लेम नसतो हेच खरे.
‘रोहिंग्या’ हा प्रश्न आज जगातल्या २४ देशांमध्ये निर्माण झाला आहे.म्यानमार मधील रोहींग्यांच्या उद्रेकाने आणि अपराधिक मानसिकतेमुळे शांतप्रिय बौद्ध भिख्खू देखील शस्त्र घेऊन उभे राहिले आहेत. त्यामुळे या देशातील अंतर्गत शांततेवर विपरीत परिणाम होत आहे.हिंसक रोहिंग्या मुस्लिम आणि स्थानिक मुस्लिम हा देखील नवा संघर्ष निर्माण झाला आहे. कोरोनामुळे उध्दभवलेल्या आर्थिक,सामाजिक प्रश्न सोडवताना दमछाक होते आहे त्यातून हे शरणार्थी घोंगडे कोणीही पांघरायला तयार नाही. युनायटेड नेशन्सना फक्त रशिया -युक्रेन यांचातला संघर्ष दिसतो,कारण प्रश्न [ख्रिश्चन] यूरोपचा आहे.आशिया आणि त्यातून साऊथ आशियात काय सुरु आहे याचे कोणालाच सोयर सुतक नाही.
कोण आहेत हे रोहिंग्या
ब्रह्मदेशातील (आजचा म्यानमार)रखाइन प्रांतात गेली अनेक वर्षांपासून राहत असलेली जमात, ‘रोहिंग्या’ या नावाने ओळखली जाते.१८८६ मध्ये ब्रिटिशांनी ब्रह्मदेश जिंकला व भारतीय साम्राजाचा एक प्रांत म्हणून पूर्व बंगालला जोडला. तेव्हापासून बंगाल आणि ब्रह्मदेश यांच्यात व्यापार व्यवसाय वा नोकरी धंदा अशा विविध पातळ्यांवर धार्मिक सरमिसळ झाली.रखाइन प्रांत भौगोलिकदृष्ट्या बांगलादेशाच्या सीमेजवळ आहे. ३६ हजार ७६२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या रखाइनची लोकसंख्या जवळपास २१ लाख आहे. म्यानमारमधील २०१४च्या जनगणनेनुसार, रखाइनमधील सुमारे दहा लाख लोकसंख्येचा समावेश जनगणनेत करण्यात आला नाही. जनगणनेत समावेश नसलेले दहा लाख रोहिंग्या मुस्लिम आहेत. लोकसंख्येत ९० टक्क्याहून अधिक असलेल्या बौद्ध धर्मीयांनी अल्पसंख्य असलेल्या रोहिंग्यांचा त्यांच्या भूमीवरील हक्क नाकारण्याचे धोरण सुरुवातीपासूनच स्वीकारले होते.
रखाइन प्रांतात रोहिंग्या, हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक राहतात. हिंदू संख्येने अगदीच अल्प आहेत. परंतु फक्त रोहिंग्या-बौद्ध, असाच संघर्ष सतत सुरू आहे. रोहिंग्याच्या वाढत्या प्रभावाला वेळीच न रोखल्यास, पूर्व बंगाल सारखे आपले अस्तित्व संपून जाईल, अशी भीती स्थानिक बौद्धांना आहे.
मुळातच भारतात असलेले चिथावणीखोर आणि रोहिंग्या यांची एक सामायिक युती भारताच्या आंतरिक सुरक्षेसाठी हा फार मोठा धोका आहे. भारतीय सैनिकांवर केलेले हल्ले, त्रिपुरा आणि मिझोरम येथे स्थानिकांना केलेली मारहाण आणि जाळपोळ , हे त्याचे पुरावे आहेत. लॉकडाऊनच्या काळात हैदराबाद येथे स्थानिक विरुद्ध रोहिंग्या असा झालेला संघर्ष आपण अनुभवला आहे.१४ ऑगस्ट २०२० रोजी जम्मू मध्ये स्थानिक विरुद्ध रोहिंग्या असा संघर्ष झालेला आहे. याचा ताण स्थानिक प्रशासन ,पोलिस यंत्रणेवर वारंवार येत आहे.
रॉयटर या प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ,देशत्याग केलेल्यांची एकूण संख्या आठ लाखांपासून ११ लाखांच्या घरात आहे असा या वृत्तसंस्थेचा अंदाज आहे. एकटय़ा बांगलादेशात नोंद झालेल्या रोहिंग्या निर्वासितांची संख्या ३२ हजार आहे तर नोंदणी न झालेल्या पण सरकारी छावण्यांत राहणाऱ्या निर्वासितांची संख्या दोन लाखांच्या घरात आहे. भारतात ४० हजार निर्वासित रोहिंग्या राहत आहेत. ही सर्वमान्य संख्या आहे. याशिवाय मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांत आश्रय घेतलेल्या रोहिंग्यांची संख्या काही हजारांच्या घरांत आहे.या प्रश्नावर जागतिक समुदायाला म्यानमारवर योग्य प्रकारे दबाव टाकता आला नाही.
मुस्लिम रोहिंग्या कोणत्याही स्थितीत परत गेलेच पाहिजेत, हेच धोरण सरकार आणि समाजाचे असले पाहिजे.रोहिंग्यांच्या लोकसंख्या वाढीचा प्रचंड वेग भयंकर धोकादायक आहे, त्यातून अनेक प्रश्न आणि फक्त प्रश्नच निर्माण होतील. आणि सगळ्यात महत्वाचे अल्प का होईना पण हिंदू रोहींग्या आहेत त्यांना मात्र भारताची नागरिकता मिळालीच पाहिजे.
संपूर्ण जगामध्ये ५४ इस्लामिक देश आहेत,परंतु त्यापैकी कोणीही शरणार्थी रोहिंग्यांनां आपल्यात सामावू इच्छित नाही. इस्लामचा कळवळा असलेले तुर्की आणि पाकिस्तान मूग गिळून बसले आहेत. सौदी, यूएई सारखे श्रीमंत देश देखील यांना आपले म्हणण्यास तयार नाही. मग भारताने तरी याना का पोसावे ?
जागतिक समुदायाने रोहिंग्यांच्या प्रश्नावर म्यानमारवर दबाव टाकून म्यानमारमधला रोहिंग्या प्रश्न सोडविला पाहिजे. विस्थापित झालेल्या रोहिंग्यांशी विविध जागतिक दहशतवादी संघटना संधान साधत असल्याचे अनेक अहवाल समोर आले आहे. त्यामुळे रोहिंग्या प्रश्न वेळीच योग्य प्रकारे सोडविला गेला पाहिजे. अन्यथा, रोहिंग्या प्रश्न जगासमोर अत्यंत उग्रपणे समोर येईल आणि त्याच्या झळा भारताला आणि सर्व जगाला बसतील.
https://edition.cnn.com/2022/07/22/asia/myanmar-rohingya-genocide-world-court-intl-hnk/index.html