महामार्ग आणि रेल्वेमार्ग निर्मितीत अमुलाग्र क्रांती
‘बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज इंडिया’ने जारी केला अहवाल
६५ वर्षांत झाले त्याहून दुप्पट काम २०१५ ते २०२५ पर्यंत होणार
“भारत सरकारचे महत्वाकांक्षी प्रकल्प, महामार्ग, द्रुतगती मार्ग, रेल्वे बांधणी अतिशय वेगाने पूर्ण होत असून त्यामुळे जगातील बड्या देशांनाही आश्चर्य वाटत आहे. कारण, महामार्ग आणि रेल्वे जाळे विस्तारात क्रांतिकारी काम झाले आहे. द्रुतगती महामार्गाच्या दररोजच्या बांधणीने जागतिक विक्रम केला आहे. ‘बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज इंडिया’ने यासंदर्भात एक अहवाल तयार केला असून राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्गा निर्मिती व विस्तारीकरणाची आकडेवारी दिली आहे. त्यावरुन विकासमार्गावर वेगाने पुढे जात असलेल्या भारताच्या उज्वल भविष्याप्रति भारत सरकारची कटिबद्धताच दिसून येते.
१९५० ते २०१५ दरम्यान म्हणजे ६५ वर्षांमध्ये जितक्या राष्ट्रीय महामार्गांची आणि रेल्वेमार्गांची उभारणी झाली, त्यापेक्षा अधिक २०२५ साली संपणाऱ्या दशकादरम्यान बांधणी होईल,’ असे अहवालात म्हटले आहे. “
राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गाच्या उभारणीशी संबंधित दिलेल्या आकडेवारीनुसार २०२५ सालापर्यंत राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी १.८ लाख किमीपर्यंत
पोहोचण्याचा अंदाज आहे,रेल्वेमार्गांची निर्मिती १.२ किमीपर्यंत होण्याची अपेक्षा आहे.सन १९५० पर्यंत चार हजार किमी राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती झाली होती ती 2015 साली वाढून ७७ हजार किमी झाली.तथापि २०२५ सालापर्यंत ती १.८ किमीपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे.म्हणजे दहा वर्षांच्या कालावधीत महामार्गांची एकूण लांबी दुपटीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
रेल्वे मार्गाच्या विस्तारावरही सदर अहवालात माहिती दिलेली आहे.त्यानुसार १९५० साली देशात फक्त दहा हजार किमी रेल्वेमार्ग होते, ते २०१५ पर्यंत ६३ हजार किमीपर्यंत पोहोचले आणि २०२५ पर्यंत ते दीड लाख किमीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर १९९५ पर्यंत देशातील बंदरांची क्षमता केवळ ७७७ ‘एमटीपीए’ होती, ती २०१५ मध्ये वाढून १ हजार,९११ ‘एमटीपीए’ झाली आणि, २०२५ सालापर्यंत ती तीन हजार ‘एमटीपीए’ होण्याची अपेक्षा आहे.
राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीत देशाच्या रक्षा रणनीतिलाही लक्षात घेतले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास लढाऊ विमान उतरवता येईल, अशाप्रकारे अनेक राष्ट्रीय महामार्गांची बांधणी करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये भारत-पाकिस्तानमधील असे आंतरराष्ट्रीय सीमेपासून ४० किमीवर भारतीय भागात ‘भारतामाला’योजनेंतर्गत लढाऊ विमानांच्या कारवाया केल्या जाऊ शकतील, अशा राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याआधी उत्तर प्रदेशात अशाप्रकारचे महामार्ग तयार करण्यात आले आहे. द्रुतगती महामार्गांना विमान उतरणे आणि उड्डाण करण्यायोग्य तयार केले आहे. पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान स्वतः हर्क्युलस विमानाने गेले होते. या द्रुतगती महामार्गावर सुखोई, मिराज लढाऊ विमानांनी सराव केला होता.
केंद्रीय रस्ते आणि परिवहममंत्री यांनी देशाला विकासाची झेप घ्यायची असेल तर राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वेगाने विस्तार पाहिजे, असे म्हटले होते. देशातील राष्ट्रीय महामार्गांवरुन जवळपास ७० टक्के माल आणि ९० टक्के प्रवासी वाहतूक होते, यामुळे व्यापार, स्टार्टअप आणि उद्योगधंद्यांच्या विकासाला संधी मिळते असे नमूद केले.