भाडोत्री सेना
Beggar has no choice- शहाबाज शरीफ
कोसळणारा प्रचंड पाऊस,होत असलेली अपरिमित हानी,१५०० निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी अंत, जवळपास २० बिलियन डॉलरचे झालेले नुकसान आणि आधीच भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने आता आपले सैनिक भाड्याने पाठवण्याचा निर्णय घेतला असून आर्थिक मदतीच्या बदल्यात पाकिस्तानी लष्कर कतारमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार आहे.सीमेवर किंवा आपल्याच बलुचिस्तान प्रांतामध्ये निष्पाप नागरिकांवर गोळ्या चालवणारे आता परदेशातील नागरिकांना सॅल्यूट ठोकणार आहेत.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने फिफा विश्वचषक-२०२२ मध्ये सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपले सैनिक कतारला भाड्याने पाठवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.अहवालानुसार, कतारने संकटात सापडलेल्या पाकिस्तानला २ अब्ज डॉलर्सच्या आर्थिक गुंतवणुकीचे आश्वासन दिले आहे, ज्याच्या ओझ्याखाली पाकिस्तानला आपले सैन्य भाड्याने पाठवणे भाग पडले आहे.
कतार पाकिस्तानला अनेक प्रकारे मदत करत आहे आणि तेलाच्या दलालीमुळे श्रीमंत राष्ट्र बनलेल्या कतारने पाकिस्तानची निधीची कमतरता कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहाय्यासाठी $२ अब्ज देण्याचे वचन दिले आहे,त्यानंतर पाकिस्तानने २०२२च्या फिफा विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सहमती दर्शवली आहे. खेळाडू म्हणून नाही तर सुरक्षा रक्षक म्हणून.कतारने यापूर्वीही अशीच ऑफर तुर्कस्तानला दिली होती, पण तुर्कस्तानने कतारची ही ऑफर लगेचच फेटाळून लावली, कारण एखाद्या देशाचे लष्कर हे त्या देशाच्या सार्वभौमत्वाशी निगडीत असते आणि त्या देशातील सैनिकांच्या भावना आणि निष्ठा या त्या देशाप्रति समर्पित असतात. फक्त पैशासाठी सैनिकांचा लिलाव पाकिस्तानच करू शकतों.
पाकिस्तानात या निर्णयाला प्रचंड विरोध
सरकारच्या या निर्णयाचा देशभरातून विरोध होत असताना पाकिस्तान सरकारला आपले सैनिक कतारमध्ये भाड्याने देण्यासाठी आपल्या कायद्यात अनेक सुधारणा कराव्या लागल्या आहेत.या कार्यक्रमासाठी कतारमध्ये पाकिस्तानी सशस्त्र दलांच्या तैनातीबद्दल सार्वजनिक प्रतिक्रिया प्रचंड नकारात्मकता आहे.विश्वचषकासारख्या कामांसाठी सरकारने लष्कराची नेमणूक केल्याबद्दल लोकांनी टीका केली आहे.ट्विटरवर पाकिस्तानी जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून लोक याला लाजिरवाणे म्हणत आहेत.अनेकांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी लष्कराने आपल्या वेबसाइटवर ‘पाकिस्तान आर्मी इज ऑन रेंट’ असा कॉलम बनवावा अशी ऑफर दिली आहे.त्याच वेळी, एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे की, देशाचे रक्षण करणार्या सैनिकांना आता भाडोत्री कामावर पाठवले जाईल, ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. हे एक प्रकारे पाकिस्तानी सैन्याला विकले जात आहे.पण पाकिस्तानी नागरिकांनी हे डोसक्यात घेतले पाहिजेत की ‘गरजवंताला अक्कल नसते.’
कतार आणि पाकिस्तान सशस्त्र दल यांच्यातील कराराला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिल्यानंतर पाकिस्तान सरकारनेही पाकिस्तान सरकारला मान्यता दिली, ज्यामुळे दोहा येथे होणा-या जगातील सर्वात मोठ्या आणि हाय-प्रोफाइल फुटबॉल स्पर्धेत सैन्याला सुरक्षा प्रदान करण्यात मदत होईल.या घडामोडींमुळे कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्या निमंत्रणावरून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कतारच्या दोन दिवसीय दौऱ्याचा आयोजन करण्यात आले आहे.एप्रिल २०२२ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर शरीफ यांचा हा पहिला कतार दौरा असेल.
29 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) बोर्डाच्या बैठकीपूर्वी अरब देशांकडून पाकिस्तानला मदत केवळ कतारच नाही तर इतर मित्र अरब देशांनीही पाकिस्तानला निधी देण्याचे वचन दिले आहे. एकूणच, पाकिस्तानने ४ अब्ज डॉलर्सचा निधी आतापर्यंत मिळवला आहे,पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून १ अब्ज डॉलरचे तेल,वित्तपुरवठा आणि तेवढीच रक्कम संयुक्त अरब अमिरातीकडून गुंतवणूक म्हणून मिळणार आहे.स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर मुर्तझा सय्यद यांनी माध्यमांना सांगितले की, पुढील १२ महिन्यांत सर्व निधी मिळण्याची अपेक्षा आहे. मिळणारा निधी हा शेवटी चीनच्याच घशात जाणार आहे.चीनची मैत्री किती धोकादायक असू शकते हे जगाने आता मान्य केले आहे. श्रीलंका, बांगलादेश,नेपाळ, मालदीव, आणि आता पाकिस्तान.भारताला आता अत्यंत सजग रहावे लागेल.अतिरेकी कारवाया संपूर्ण जगात वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचा भाडोत्री सैनिक कतारला पाठवणे हा निर्णय अत्यंत आत्मघातकी आहे. त्याचे दूरगामी परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील यात काही शंका नाही. भविष्य काळात पैश्यासाठी पाकिस्तान आपल्या सैन्याकडून सौदी राजघराण्याचे संडास देखील साफ करून घेण्यास मागे- पुढे पाहणार नाही.