News

पाकिस्तानची एफ-१६ विमाने अमेरिका अद्ययावत करणार !

अमेरिकेची मदत पाकिस्तानी हवाईदलाला वाचवू शकेल का ?

एफ-१६ (F-16) या लढाऊ विमानाची सध्या खूप चर्चा होत आहे. अमेरिकेने (USA) पाकिस्तानला एफ-१६ लढाऊ विमानांच्या ताफ्यात सुधारणा करण्यासाठी ४५० दशलक्ष डॉलर्स मंजूर केले आहेत. पाकिस्तानला भविष्यात दहशतवादविरोधी धोक्यांचा सामना करता यावा यासाठी ही मदत देण्यात आल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात येतंय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अशा स्वरुपाची मदत बंद केली होती. आता हा निर्णय बिडेन प्रशासनानं मागे घेतला आहे. अमेरिकेच्या या मदतीनं पाकिस्तानची ताकद किती वाढेल आणि भारताच्या सुरक्षेला काही धोका आहे का? असे अनेक प्रश्न डोकं वर काढतायेत. धोरणात्मक बाबींचा विचार करता भारतानं अमेरिकेवर जोरदार आक्षेप घेतला आहे. दुसरीकडं, ताकदीच्या बाबतीत भारत या क्षेत्रात पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. ७१ च्या युद्धात पाकिस्तानकडं अनेक लढाऊ विमाने होती पण ती सर्व भारतासमोर अपयशी ठरली. भारताची ताकद,राष्ट्रप्रेम आणि इच्छाशक्ती आता अनेक पटींनी वाढली आहे, अशा परिस्थितीत पाकिस्तानला एफ-१६ मध्ये सुधारणा करुनही काय साध्य होणार.

१९७१ च्या लढाईत भारतानं पाकिस्तानी हवाई दलाला धूळ चारली होती

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारत प्रत्येक बाबतीत पाकिस्तानाहून सरस ठरला होता. या युद्धात भारतीय वायुसेनेनं आपले शौर्य दाखवले होतं, ज्याची जगानं नोंद घेतली होती. मिग-२१ लढाऊ विमानांच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं होतं. मिग-२१ हल्ल्यात पाकिस्तानची १३ लढाऊ विमाने उद्ध्वस्त झाली. त्याच वेळी, युद्धादरम्यान केवळ एक मिग २१ नष्ट झालं. मिग- २१ एसनं पाकिस्तानी हवाई दलातील सात एफ-१०४ ए स्टार फायटर्स, दोन एफ- ६ ( मिग- १९ ), एक मिराज आयआयआय ईपी, दोन एफ- ८६ सेबर्स आणि एक सी – १३० बी हर्क्युलस या विमानांना पाडलं. एवढंच नाही तर पाकिस्तानचे रणगाडे आणि इतर लष्करी तळही उद्ध्वस्त करण्यात मोठे यश मिळवलं. मिग २१ च्या प्राणघातक हल्ल्यामुळं पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. १६ डिसेंबर १९७१ ला पाकिस्ताननं भारतासमोर शरणागती पत्करली. पाकिस्तानकडं असलेल्या लढाऊ विमानांचा योग्य वापर करू शकला नाही. भारतीय हवाई दलातील शूर वैमानिकांच्या पराक्रमासमोर पाकिस्तानची लढाऊ विमानं निरर्थक ठरली.

पाकिस्तानला कितीही अत्याधूनिक शस्त्रात्रे दिली तरी ते वापरायचे कसे हेच माहित नसेल तर,त्या शस्त्रात्रांचा उपयोग तो काय ! त्यांची अवस्था पॅटर्न टॅंक सारखीच होणार हे निश्चित.

१९८३ ला पहिल्यांदा मिळालं एफ- १६ विमान

गेल्या काही काळापर्यंत एफ-१६ हे पाकिस्तानचे (PAKISTAN) सर्वात शक्तिशाली विमान मानले जात होते. १९८३ मध्ये पाकिस्तानला अमेरिकेकडून पहिले एफ-१६ विमान मिळालं. अमेरिकेकडून हे विमान खरेदी केल्यानंतर त्याची संख्या हळूहळू वाढत गेली. तेव्हापासून ही विमाने पाकिस्तानी लष्कराचा भाग राहिली आहेत. हे पहिल्यांदा यूएस एअर फोर्ससाठी बनवले गेले. या विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते ३६० अंश दृष्टी ठेवू शकते. हे विमान लेझर गाईड बॉम्बचाही सहज वापर करू शकते. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानने एफ-१६ विमाने भारतीय सीमेवर तैनात केली आहेत.

आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान विमानांची काळजी घेऊ शकेल ?

अमेरिकेच्या मदतीनं पाकिस्तान आता एफ-१६ चे आरोग्य सुधारणार आहे. हे तेच लढाऊ विमान आहे जे विंग कमांडर अभिनंदन यांनी उधवस्त केलं होतं. भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ बायसननं पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-१६ विमान पाडलं. मात्र, पाकिस्तानने याचा इन्कार केला. सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती कशी आहे, हे कुणापासून लपलेलं नाही. आता तो त्याच्याकडे असलेल्या विमानाची योग्य प्रकारे देखभाल करू शकेल अशी इतकी ही आर्थिक क्षमता त्यांच्याकडे नाही. हे लढाऊ विमान पाकिस्तानात येऊन जवळपास चार दशके होणार आहेत.पाकिस्तानलाही ही लढाऊ विमाने स्वत: सांभाळता येत नाहीत. आता त्याला अमेरिकेची मदत मिळाली आहे, तर कदाचित त्यामुळं एफ-१६ मध्ये थोडा श्वास घेऊ शकेल. मात्र, हा पैसा तो यासाठी किती वापरणार, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.

राफेल आल्यानंतर भारतासमोर पाकिस्तान कुठेही उभा राहिला नाही. भारतीय वायुसेना ही जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली वायुसेना आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढले आहे, तर पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था गटांगळ्या खाताना दिसते आहे.

वाढते कर्ज,प्रचंड महागाई, आंतरिक अशांतता,चिनी हस्तक्षेप,ओला दुष्काळ… अशी अनेक संकटे पाकिस्तानची वाट पाहत आहे. त्यात त्यांनी भारताला डिवचू नये अन्यथा त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील याची जाणीव पाकिस्तानला आलीच असेल तर ठीक, नाहीतर भारतीय सेना पाकिस्तान नावाचा देश जगाच्या नकाशावरून हटवल्याशिवाय राहणार नाही.

‘ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी’

Back to top button