… अखेर भक्तीच्या शक्तीला यश
जालना जिल्ह्यातील जांब (jammb) समर्थ गावातील राम मंदिरातील मुर्ती चाेरी प्रकरणात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कर्नाटक राज्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.दोन संशयितांकडून ६ मूर्ती ताब्यात घेण्यात आल्या आहेत.प्रदिर्घ काळानंतर मूर्ती चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मोठं यश आले आहे.
घनसावनगी तालुक्यातील जांब समर्थ गावातील रामदास स्वामी (samarth ramdas swami ) यांच्या पूर्वजांनी पंच धातूच्या सुमारे ७५० वर्षपूर्वी स्थापन केलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या आणि हनुमान, सीता, भरत शत्रुघ्न, आदींच्या जवळपास १३ मूर्ती गेल्या दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेल्या होत्या. या प्राचीन मूर्तीचा कुठल्याच प्रकारे ठाव ठिकाणा लागत नसल्याने भविकांकडून या मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा लागावा म्हणून आंदोलन देखील करण्यात आले होते.
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. मात्र ठोस पुरावा मिळत नसल्याने पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली होती. पोलिसांकडून राज्यभरात ठिकठिकाणी विशेष पथके तयार करून हा तपास सुरू होता. या प्राचीन पंचधातूंच्या मूर्ती चोरी प्रकरणात आंतराष्ट्रीय टोळीचा हात असण्याची शक्यता ही वर्तविली जात होती. म्हणूनच देशातील ६६ विमानतळ, पोर्ट, बंदरे या ठिकाणी असलेल्या यंत्रणेला ही दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमकडून राज्यातील मूर्ती चोरीच्या इतर घटनांचा ही अभ्यास करुन या गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयन्त सुरू होता.
या मूर्ती म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि आपला वारसा आपण नाही जपणार तर कोण जपणार ?
एकदा का या मूर्ती आपल्या देशाबाहेर गेल्या की त्या परत भारतात आणणे म्हणजे भ्रामरी प्राणायामच आहे.आधी मूर्ती कोणत्या देशात आहेत त्या शोधा, मग तेथील सरकार सोबत माथापच्ची करा आणि या कराराला अनेक वर्षे लागतात. यात अनेक आंतरराष्ट्रीय टोळ्या देखील कार्यरत आहेत, त्यामुळे चोरीचा तपास करणे जिकरीचे ठरते. प्रत्येक देशाचे कायदे वेगळे,यंत्रणा वेगळी त्यातून मार्गक्रमण करताना प्रचंड दमछाक होते.
ग्रामस्थांनी दाखवलेल्या संयमाचे,धीरोदात्तपणाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.त्याच बरोबर पोलिसांनी आणि राज्य सरकारने दाखवलेल्या संवेदनशिलतेमुळे या पुढे अश्या घटनांना पायबंद होण्यास मदतच होईल.
म्हणतात ना :- म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण…काळ सोकावतो..