शहरी माओवादाचे वास्तव

शहरी माओवाद्याला त्याच्या नक्षली कॉमरेड्स नी वाहिली आदरांजली…
विरा साथीदार चा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. माओवाद्यांनी त्यांच्या #झंकार मासिकात वीरा साथीदार वर लेख लिहला आहे. व आदरांजली वाहिली आहे.
“झंकार” या मुखपत्रातील लेखात वीरा साथीदार हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य आणि जहाल नक्षलवादी #मिलिंद_तेलतुंबडे याचा राजकीय मित्र असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नक्षल चळवळीतील सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन क्रांतीचे बिगुल फुंकले पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे.

हा वीरा साथीदार कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या एक दिवस अगोदर आयोजित पुण्यात झालेल्या #एल्गार_परिषदेला हजर होता. व शहरी कारवायांमध्ये सक्रिय होता. विशेष म्हणजे हा वीरा स्वतःला आंबेडकरी दाखवत असे. ह्या कम्युनिस्ट माओवाद्यांनी आंबेडकरी चळवळ ही बदनाम केली आहे. विविध सामजिक चळवळींनी सावध राहिले पाहिजे.
शहरी माओवादी कोम्रेड्स चा मृत्यू झाल्यानंतर माओवादी पक्ष त्याला आदरांजली वाहत असताना नेहमीच दिसते..या अगोदर श्रीधर श्रीनिवासन याला ही अशा प्रकारे माओवाद्यांनी #लाल_सलाम ठोकला होता.

‘झंकार’ मासिकातील या लेखानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षल विरोधी अभियानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. झंकार मासिकातील या लेखामुळे शहरी नक्षलवादाचा खरा चेहरा समोर असल्याचे पोलिसांनी म्हटले. आम्ही आधीपासूनच शहरी नक्षलवादाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचे प्रयत्न करत असून #वीरा_साथीदार त्यापैकीच एक असे मत नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक ( DIG) संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.
Abp माझा बातमीची लिंक खाली दिली आहे