News

अपनोके ही खून के प्यासे … माओवादी

गडचिरोली जिल्ह्यातील गर्देवाडा येथे आज सकाळी माओवाद्यांकडून आपल्याच दलामधील सक्रिय माओवाद्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. जंगलात मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.गर्देवाडा-मर्दकुही रस्त्यावर गर्देवाडा गावापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर दिलीप उर्फ नितेश गज्जू हिचामी याचा मृतदेह जंगलात आढळून आला. दिलीप हा सक्रिय माओवादी असल्याची माहिती आहे. त्याची हत्या माओवाद्यांनी केल्याचे उघड झाले आहे. माओवाद्यांनी हत्येनंतर मृतकच्या छातीवर एक चिठ्ठी चिकटवली आहे. त्यानुसार मृतक हा झुरे गावातील असून दल प्रोफाइल नुसार कंपनी ०४ मधून टिपगड LOS मध्ये सक्रिय होता. मृतक माओवादी दिलीप हिमाची हा २०१२ पासून नक्षल चळवळीत सक्रिय असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणे कडे आहे. दिलीप हिमाची या आधी नक्षल कमांडर पवन हिमाची याचा सुरक्षारक्षक देखील राहिला आहे.मागच्या काही काळात शीघ्रकृतीदलाने केलेल्या एन्काऊंटरनंतर माओवादी विचलित झाले आहे. या घटनेनंतर असे लक्षात येते की माओवाद्यांचा आपल्याच दलम मधील दुसऱ्या माओवाद्यांवर विश्वास राहिलेला नसल्याचे नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख (DIG) संदीप पाटील यांनी सांगितले.

या घटनेनंतर स्वतःला कॉम्रेड म्हणवणारे आता मेणबत्त्या पेटवणार नाहीत,ट्विट करणार नाहीत.

माओवाद्यांनी आपल्याच एका सहकार्याला ठार मारले आहे.काय म्हणावे आता याला? पोलिसांना मारण्याची धमक नाही, वनवासी उभे करत नाही याचाच राग येऊन बहुदा हे प्रकरण घडले असावे.कोणाला मारू शकत नाही म्हणून स्वतःलाच संपवायला माओवादी निघाले असतील तर याहून दुसरी सुखद वार्ता नाही.खरेतर जगात पहिल्यांदा लोकशाहीमार्गाने डाव्यांचं सरकार केरळ मध्ये निवडून आले होते, पण डाव्यांनी आपल्याला मिळालेल्या मतांचा किंवा लोकशाहीचा कधीही मान राखला नाही.माओवाद्यांना आपल्या विचारधारेचा विरोध कधीच सहन होत नाही,आता पर्यंत किती मुडदे पाडले,किती जवान हुतात्मा झाले याची तर गणतीच नाही.या फाससिस्ट (fascist) आणि हुकूमशाहीने, स्टालिनवृत्तीने फक्त संशयावरून २ कोटी लोकांना मारले होते, हे आपण विसरून चालणार नाही.

माओवादी(maovadi) म्हणजे नेमके कोण ?

स्वतंत्र भारतात कामगार आणि विद्यार्थी यांच्यातील अस्वस्थता लाल क्रांतीसाठी अनुकूल ठरेल म्हणून लाल माकडांनी येथे पक्ष स्थापन केला मग ते सरकारी जागांवर जाऊन बसले. शिक्षण क्षेत्रात घुसले. काही माकडे थेट तत्कालीन सरकारमध्ये जाऊन सत्तेच्या माध्यमातून डावा अजेंडा राबवू लागले आणि जेव्हा लोकशाहीच्या चौकटीत डाळ शिजेना तेव्हा यातील एक गटाने फुटून हिंसक मार्ग स्वीकारला. लोकांच्या दृष्टीने हे जरी दोन गट होते तरी ही धूळफेक होती. आम्ही लोकशाही व्यवस्थेत राहून ती खिळखिळी करतो तुम्ही बाहेरून वनवासी बंधूंना हाताशी धरून युद्ध पुकारा असे ठरलेले धोरण होते. परिणाम एकच साधायचा होता तो म्हणजे लाल क्रांती (भारत राष्ट्राचा विध्वंस).

वनवासी बंधू हे मुळात लढाऊ ! रामायण काळापासून वनात राहणारा हा आमचा बंधू एक आदर्श समाज जीवन जगत होता. त्यांनी निर्माण केलेले संस्कृती आणि जीवन मूल्य ही आदर्श होती. इंग्रजांच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने सशस्त्र लढ्याला सुरुवात या आमच्या बंधूंनीच केली. इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध जे दमन चक्र वापरले त्यात जे कायदे केले ते कायदे दुर्दैवाने आज ही अस्तित्वात आहेत. शहरातील सरकार नावाची गोष्ट ही तुमची शत्रू आहे हे इंग्रजांच्यामुळे निर्माण झालेली भावना ज्यांनी जाणीवपूर्वक तशीच ठेवत मिशनरी आणि डाव्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तो असंतोष वापरला.या लाल माकडांचा सत्तेसाठी उपयोग करून देशात अनागोंदी माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आमच्या राष्ट्रीय आणि सामाजिक जीवनात हा माओवादी, लेनिनवादी लाल कॅन्सर कधी बरा होणार ? हा लाल रक्तरंजित आजाराचा इतिहास तुकड्यात बघून चालणार नाही. या रोगाची गाठ वनवासी क्षेत्रात दिसत असेल, रक्त सांडणारी जखम तेथे असली तरी याचे हात पाय शहरात, केरळ, बंगाल,त्रिपुरा ,आसाम येथे पण आहेत. या आजाराचा संसर्ग JNU त आहे, जाधवपूर युनिव्हर्सिटीत मध्ये आहे, अगदी कोरेगाव भीमा मध्ये ही ह्या लाल संसर्गाने डोके वर काढले आहे. त्यामुळे यावर उपाय पण एकात्मिक शोधावा लागेल. कॅन्सरला मलमपट्टी नाही पूर्ण ऑपरेशनच करावे लागेल आणि सरकार, पोलीस किंवा सैन्य हे पूर्ण करू शकणार नाही त्यासाठी जनतेला पुढे यावे लागेल. वनवासी बंधुनी त्यांना झिडकारण्यास सुरुवात केलीच आहे आता आम्ही शहरवासी याना कधी झिडकारणार ? हा खरा प्रश्न आहे !

जंगली आणि शहरी नक्षलवाद्यांचा अंतच निरपराध नागरिकांना,त्यांच्या सहकाऱ्यांना आणि जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल !

https://marathi.abplive.com/news/gadchiroli/killing-of-maoist-by-maoist-incidents-in-gadchiroli-district-1118812

Back to top button