News

वनांचल समृद्धी अभियान

वसा फॉउंडेशनचा निर्धार वन आणि वनवासी होणार समृद्ध..

“वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें” ह्या उक्तीला आपले जीवन ध्येय मानून अखंड कार्य करणाऱ्या माय ग्रीन सोसायटी आणि वसा फॉउंडेशनने “वनांचल समृद्धी अभियान” सुरु केले आहे. त्यातून वन,वनवासी आणि पर्यावरण यांचे संरक्षण,संवर्धन व विकास असा तिहेरी लाभ होणार आहे.

माय ग्रीन सोसायटी

माय ग्रीन सोसायटीचा(my green society ) असा विश्वास आहे की, आपला कार्बन फूटप्रिंट कमी करणे हा पुढे जाण्याचा मार्ग आहे. २०७० पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याच्या देशाच्या ध्येयाशी ही संस्था वचनबद्ध आहे.

२०१९ पर्यंत भारतीयाचे कार्बन फूटप्रिंट सरासरी १.८४ टन होते. तथापि, भारताची अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या जसजशी वाढत जाईल तसतसा आपला पर्यावरणीय प्रभावही वाढेल. त्यामुळे माय ग्रीन सोसायटीला हे सुनिश्चित करायचे आहे की प्रत्येक भारतीयाला पर्यावरणीय बदलांची, त्याच्या प्रभावाची जाणीव होईल आणि ते त्यांचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी प्रयत्नशील होतील. त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून माय ग्रीन सोसायटी सरकारी संस्था, ‘वसा‘ फॉउंडेशन, इतर स्वयंसेवी संस्था आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांसोबत मार्गक्रमण करीत आहे.यावर्षीच्या वर वर्णन केलेल्या वसा फाउंडेशनच्या सहकार्याने राबवलेल्या प्रकल्पाला माय ग्रीन सोसायटीने आर्थिक पाठबळ पुरवले तर वसा फाउंडेशनने ही रोपटी लावण्यासाठी तसेच जोपासण्यासाठी वनवासी बांधवांचे मनुष्यबळ उभे केले. या दोन्ही संस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

जाणून घेऊया, वनांचल समृद्धी अभियान

वनवासी बांधवाना समृध्द, स्वयंपूर्ण करण्याची वाट खूप कठीण आहे. हे आव्हान ओळखून ‘वसा‘ (VASA Foundation)या स्वयंसेवी संस्थेने सामूहिकतेतून समृध्दीकडे वाटचाल करीत आहे. ‘वसा’ म्हणजे वनांचल समृध्दी अभियान. (Vananchal Samruddhi Abhiyan).

सर्वप्रथम फळझाडांची रोपटी वनवासी बंधूना दिली जातात, त्यांना झाडाची योग्य पद्धतीने निगा राखावी,काळजी घ्यावी.या मध्ये आवळा, महुआ, चिंच, बांबू , सीताफळ, जामुन, बेहडा, कडुनिंब, आंबा, बेरी, साग, खैर , इतर अश्या उत्त्पन्न देण्याऱ्या झाडांची रोपटी दिली जातात.या फळझाडांपासून जे उत्पन्न येईल त्यावर आपला चरितार्थ चालवावा. इतका साधा पण दूरगामी परिणाम असणारा संकल्प घेऊन नोव्हेंबर २०१९ मध्ये नाशिक येथे वसा फॉउंडेशनची सुरवात झाली.
महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमध्ये वसा फॉउंडेशन कार्यरत आहे, जवळपास १४ तालुक्यातील २१ गावात वसा फौंडेशनने आपला ठसा उमटवला आहे. या वर्षी विक्रमी ३३००० वृक्ष लागवड केली आहे.

वनवासी बांधव कष्टाळू, प्रामाणिक, काटक असून त्याच्याकडे वनसंपत्तीचं अचूक ज्ञान आहे. त्याच्याजवळ लौकिक शिक्षण नसलं, तरी वनवासी जीवनाची, संस्कृतीची आणि वनसंवर्धनाची बौध्दिक संपदा त्याच्याकडे आहे. हे सगळं असूनही आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आमच्या या बांधवांना समृध्द, स्वयंपूर्ण आणि स्वाभिमानांचं जीवन जगता आलेलं नाही हे तितकच खरंय.

विविध स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती सामाजिक बांधिलकीने आज वनवासी बांधवांसाठी ठीकठिकाणी आपल्यापरीने कार्यरत आहेत. वनवासी कल्याण आश्रम ही संस्था तर अनेक वर्षांपासून संबंध देशभर कार्य करीत आहे. या सर्व संस्था, व्यक्ती आणि संघटनांनी वनवासी समाजातील अधंश्रध्दा, स्थलांतर, धर्मांतर, आरोग्य, शिक्षण, संस्कृती याबाबत देखील उल्लेखनीय कार्य केलेलं आहे.

वसाचं कार्य म्हणजे वनवासींचे वनहक्क, जीवविविधता, रोजगार, स्वयंपूर्णतेतून स्वायत्तता, सामूहिकतेतून समृध्दी, वनवासी पाडा आणि शासन व्यवस्था यातील सक्षम दुवा अशा विशिष्ट प्रकारचं कार्य आहे. खऱ्या अर्थाने वनवासी बांधव समृध्द व्हायचा असेल, वन- जंगल संपत्तीचं संवर्धन, संरक्षण करायचं असेल, वनवासींची बौध्दिक संपदा, त्यांची कौशल्यं यातून निर्मिती, विपणन या गोष्टी साध्य करायच्या असतील, तर त्यासाठी वनवासींमध्ये जागृती करणं, त्यांना साक्षर करणं, आणि शासकीय योजनांच्या लाभाची गंगा त्यांच्या पाडयापर्यंत आणणं हेच वसाचं उद्दिष्ट आहे.

“स्वयंमेव मृगेंद्रता” असणारा मूळ वनवासी समाज पुन्हा एकदा समृध्द, वैभवशाली, स्वयंपूर्ण आणि आर्थिक सांस्कृतिकदृष्टया संपन्न करणं या ध्यासाने ‘वसा’ने या क्षेत्रात खूप दमदार पाऊल टाकलं आहे

चला आपण देखील सहभागी होऊया आणि भारत राष्ट्राला परमवैभवावर नेऊया …

https://mygreensociety.org/

Back to top button