IAEA च्या पिचवर पाकिस्तान क्लीन बोल्ड…
ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा मिसफायर विशेष चिंतेचे कारण नाही: IAEA CHIEF
९ मार्च रोजी अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते.
आंतरराष्ट्रीय आण्विक वॉचडॉग IAEA ने म्हटले आहे की त्यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या अलीकडील चुकीचे फायरिंग “विशेष चिंतेचे” नाही आणि या घटनेने भारतातील अण्वस्त्रे किंवा सामग्रीच्या सुरक्षिततेवर कोणत्याही प्रकारे प्रश्न उपस्थित करता येणार नाही.आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे महासंचालक राफेल मारियानो ग्रोसी यांनी इंडियन एक्सप्रेसला COP27 हवामान बदल संमेलनात दिलेल्या मुलाखतीत सांगितले की या घटनेला धोका म्हणून पाहिले गेले नाही आणि या विषयावर भारत सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याची गरज वाटत नाही.
९ मार्च रोजी, अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र चुकून डागले गेले आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले.त्यात कोणतेही स्फोटक भरलेले नव्हते,त्यामुळे कोणताही स्फोट,नुकसान झाले नाही.या वर्षी ऑगस्टमध्ये, न्यायालयीन चौकशीनंतर, भारतीय हवाई दलाच्या तीन अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती.
“आम्ही सतत जगभरातील सर्व परिस्थितींकडे लक्ष ठेवून असतो आणि IAEA च्या अत्यंत महत्त्वाच्या सदस्य राष्ट्राला समस्या आल्यास आम्ही त्यात लक्ष घालतो. पण (ब्रह्मोस घटना) आमच्यासाठी कोणत्याही विशिष्ट चिंतेचा मुद्दा कधीच नव्हता,” ग्रोसी म्हणाले.त्यांनी सांगितले की त्यांनी भारतातील अणुऊर्जेचे भविष्य उज्ज्वल आहे, विशेषत: नवीन तंत्रज्ञानासाठी, आणि अणुऊर्जा निर्मितीमध्ये विस्ताराची अपेक्षा आहे.
या ब्राम्होस अपघाताबद्दल पाकिस्तान ने भारताविरोधात IAEA कडे तक्रार केली होती, परंतु IAEA ही तक्रार पूर्णपणे फेटाळून लावली आहे.भारत हा जबाबदार अण्वस्त्रधरी देश आहे असे IAEA ने म्हटले आहे.
कोणतंही कारण नसताना अण्वस्त्र बाळगणारा पाकिस्तान जगातला सर्वात धोकादायक देश – जो बायडन
पाकिस्तानचे आण्विक धोरण फक्त भारतकेंद्री आहे. यातून, पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचा साठा वाढवितानाच,लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा विकास करण्यात येत आहे आणि त्यातून भारताच्या संपूर्ण भूभागावर हल्ला करण्याची क्षमता विकसित करण्याचा नापाक प्रयत्न आहे.
अण्वस्त्रांचा वापर कधी, कसा, कुठे करायचा याबाबत पाकिस्तानचे काहीही धोरण नाही. हे केवळ तेथील लष्करप्रमुख किंवा सर्वोच्च राजकीय नेतृत्वाच्या मनावर(कधी कधी) अवलंबून आहे. ज्या प्रमाणे भारताचे अण्वस्त्रांबाबत ‘नो फर्स्ट यूज’ हे धोरण आहे, तसे पाकिस्तानचे नाही. पाकिस्तान स्वतः प्रथम अण्वस्त्र हल्ला करू शकतो,१९९९ मधेच पाकिस्तानने ‘नो फर्स्ट यूज’ धोरण नाकारले होते.
पाकिस्तानने आता खरोखर मनन ,आत्मचिंतन,आत्मपरीक्षण करावे,आता आम्ही तुमचे नाव देखील उच्चारात नाही.भारताच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत आपल्याला विश्वगुरू व्हावयाचे आहे अश्या नापाक चिखलात पाय रुतवून बसणे आता आपण सोडून दिले आहे. “मायबाप” चीनच्या खांद्यावर बसून आम्हाला डोळे दाखवणे आता बंद करावे.बिना स्फोटकांच्या ब्राम्होस मिसाइलने तुमच्या तोंडचे पाणी पळवले होते, हे सदैव लक्षात ठेवावे. काही आगळीक केल्यास पुढच्यावेळी ब्राम्होस बिना स्फोटकांचे नसेल इतकं निश्चित…