२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय अमेरिकन नागरिकांची पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने…
२००८ मध्ये २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त,अमेरिकेतील भारतीय (NRI)समूहाने न्यूयॉर्कमधील पाकिस्तानी वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने केली. ह्यूस्टन, शिकागो येथील पाकिस्तान वाणिज्य दूतावास आणि न्यू जर्सी येथील पाकिस्तान कम्युनिटी सेंटरसमोरही निदर्शने झाली आहेत.
भारतीय नागरिक हा भारतीयच असतो मग तो जगात कुठेही असो.. आणि कोणताच भारतीय २६/११ मुंबई (MUMBAI)दहशतवादी हल्ल्याला विसरू शकत नाही. समारोसमोर लढण्याची हिम्मत,कुवत नसलेल्या पाकिस्ताने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता.
२६ नोव्हेंबर २००८ कधीही न विसरता येणारा दिवस…एक अशी काळरात्र जिने या शहराच्या सुरक्षेसाठी धडपडणा-या अनेक वीरांना गीळंकृत केलं, कायमच घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई त्या हल्ल्याने काही तास स्तब्ध झाली. आज १४ वर्षांनंतरही त्या दिवसाची शांतता मुंबईकरांच्या मनात घर करून राहिली आहे.या दिवशी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या त्या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण जग सुन्न झालं. बलाढ्य भारतावर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला.
अमेरिकन भारतीय म्हणजे कोण ?
अमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक किंवा इंडियन अमेरिकन हे अमेरिकेचे नागरिक असलेले आणि भारतीय पूर्वज असलेल्या लोकांना दिलेले नाव आहे. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येचा साधारण १% असलेला हा गट चीनी अमेरिकन आणि फिलिपिनो अमेरिकन यांच्या मागोमाग तिसऱ्या क्रमांकाचा मोठा समूह आहे.
पाकिस्तानने १४ वर्षे उलटून गेली तरी कोणतीही कार्यवाही केलेली नाही.या हल्ल्याचे मास्टर माईंड हाफिज सईद,साजिद मीर,जकी-उर-रहमान लखवी या संयुक्त राष्ट्राने आतंकवादी जाहीर केलेले पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरतात,त्यांच्यावर कारवाही करायला पाक सरकार देखील घाबरते.भारताने सगळे पुरावे पाकिस्तानला दिले, सुरवातीचे ७ डोजियर पाकिस्तानने नाकारले पण ८ वें डोजियर मात्र पाक नाकारू शकले नाही कारण त्या मध्ये सॅटेलाइट संभाषण होते. आतंकवादी मुंबईत येताना त्यांनी कराची पासून ३७ वेळा लोकेशन चेक केले होते.लष्कर-ए-तैयबाने आपली ताकत जगाला दाखवून देण्यासाठीच हा भीषण हल्ला isi च्या मदतीने आखला होता.या भीषण आणि क्रूर हल्ल्यामुळे पाकिस्तान जगाच्या नकाशावर अगदी उघडा आणि एकटा पडला, जागतिक जनमत पाकच्या विरोधात गेले.
दहशतवादी पाकिस्तानाविरोधात अमेरिकन भारतीय नागरिकांनी उस्फूतपणे एकत्र येत न्यूयॉर्कमधील पाकिस्तानी वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने केली आहेत.तसेच अमेरिकेतील अनेक पाकिस्तानी वाणिज्य दूतावासाबाहेर देखील अश्याच प्रकारची निदर्शने झाली आहेत.या क्रूर हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या शूर वीरांची आणि या हल्ल्यात हकनाक बळी पडलेल्या सर्व निष्पाप जीवांची आठवण झाली तरी प्रत्येक भारतीय हळहळतो! मग जगाच्या पाठीवर कुठेही असो….
ही नुसती प्रदर्शने नाहीत तर या भ्याड अतिरेकी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या बहादुर जवानांचे व पोलिसांचे स्मरण आहे. मेजर उन्नीकृष्णन,तुकाराम ओंबळे यासारख्या वीर पुरुषांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. भारतीय कुठेही असो त्याची नाळ या मातीशी जोडलेली आहे. आतंकवाद हा सबंध मानवतेचा शत्रू आहे आणि पाकिस्तान आतंकवाद एक्स्पोर्ट ( निर्यात ) करणारा देश आहे.
तुकाराम ओंबळे आणि त्यांच्या तुकडीतील राष्ट्रपती पदक विजेते मंगेश नाईकांनी कसाबला जिवंत पकडले म्हणून नाहीतर या देशातील देशद्रोह्यांनी, पुरोगाम्यांनी याला देखील भगवा आतंकवाद म्हणण्यास कमी केले नसते…
आज पाकिस्तानने अशी विध्वंसक,क्रूर आगळीक करून दाखवावी, हा नवा,समर्थ भारत पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून मिटवल्याशिवाय राहणार नाही.
भारतमातेसाठी प्राणार्पण करणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही ऋणी आहोत…