NaxalismNews

घबाड गांधी ते कबाड गांधी

फ्रॅक्चर्ड…अर्बन नक्सल

हे ढोंगी साहित्यिक पुरस्कार परत करतात पण बक्षिसाची रक्कम मात्र परत करत नाही.

महाराष्ट्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ् मय पुरस्कारावर साहित्य क्षेत्रातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे.देश विघातक नक्षलवादी विचारसरणीचे उदात्तीकरण करणाऱ्या लेखक कोबाड गांधींच्या (Urban Naxal ) पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर साहित्य क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यावर राज्य सरकारने भूमिका जाहीर केली आहे.नक्षलवादी विचारसरणीचे उदात्तीकरण करणाऱ्या कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाचा अनुवाद “तुरुंगातील आठवणी व चिंतन “ या पुस्तकाला पुरस्कार देण्यात आल्याने साहित्य क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली होती.त्यावर राज्य सरकारने आपली भूमिका जाहीर केली असून भाषा वाङ्मय विभागाच्या ‘वादग्रस्त पुरस्कार’ सरकारने मागे घेतला आहे.

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादाला देण्यात आलेला पुरस्कार रद्द झाल्याने निर्माण झालेल्या वादाचे पडसाद मराठी साहित्य वर्तुळात उमटले.भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,ललित विभागातील पुस्तक निवड समितीसाठी काम पाहिलेले लेखक अवधूत परळकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य विनोद शिरसाठ यांनी बुधवारी संबंधित समितीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.साहित्यिक प्रज्ञा दया पवार, शरद बाविस्कर, आनंद करंदीकर, कवयित्री नीरजा यांनी सरकारी समित्यांचे राजीनामे दिले; तर काहींनी देखील पुरस्कार परत केले आहेत.

वा छान काय दरिद्री मानसिकता आहे ही ! आता आठवला का तुम्हाला अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला,आणीबाणीच्या वेळेस तुमची जीभ का वळवली नाही, आणि आज तुम्हीच कुठल्या तोंडाने अघोषित आणीबाणीच्या बाता करत आहेत ?

कोबाड गांधी म्हणजे कोण ?
 
कोबाड गांधी हे नक्षलवादी (देश विघातक) चळवळीतील नेते आहेत. कोबाड गांधींचा जन्म १९५१ साली गर्भ श्रीमंत पारसी कुटुंबात झाला. देहरादून येथील शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लंडन येथून चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स पूर्ण केल्यानंतर काही काळ इंग्लंडच्या विविध कंपन्यांमध्येही ते कार्यरत होते.
 
कोबाड गांधी कानू सन्याल यांच्यानंतर नक्षलवादी गटांना वैचारिक खतपाणी देणारा नेता म्हणूनही त्याच्यावर आरोप झाला. आपलं संपर्ण आयुष्य माओवादी विचारांना समर्पित व्हावं, असं त्याला वाटत होतं. कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरोचे सदस्यत्व सुद्धा त्यांनी भूषविले. त्यानंतर देशात नक्षलवादी जाळे पसरवण्याच्या आरोपाखाली कोबाड गांधीला दिल्ली पोलिसांनी २००९ साली अटक केली होती.
 
१९७० च्या दशकात इंग्लंडमध्ये विद्यार्थी दशेत असताना तो क्रांतिकारी राजकारणात सामील झाला. त्याने भारतातील नागरी हक्क चळवळीचे संघटक म्हणून काम केले. ते लोकशाही हक्क संरक्षण समितीचा संस्थापकही सदस्य तो होता. २००९ मध्ये माओवादी चळवळीचा पॉलिटब्युरो सदस्य असल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती. २०१९ मध्ये जवळपास १० वर्ष तुरुंगात होता.
 
कोबाड गांधीचा जन्म नर्गिस आणि आदी यांच्या पोटी झाला. आदी ग्लॅक्सोमध्ये वरिष्ठ वित्त कार्यकारी होते. इंग्लड मध्ये शिकताना क्रांतिकारी विचारसरणीने प्रभावित होऊन अभ्यासक्रम पूर्ण न करता भारतात परतले. १९८१ मध्ये गांधी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) पीपल्स वॉरच्या केंद्रीय समितीचे सदस्य बनला. २००४ मध्ये जेव्हा CPI(Maoist) ची स्थापना झाली तेव्हा ते नवीन विलीन झालेल्या पक्षाचे केंद्रीय समिती सदस्यही होते.

त्यानंतर २००५ मध्ये दिल्लीतील नेपाळी माओवादी नेतृत्वासह किशनजी, प्रचंड आणि बाबुराम भट्टराई यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गांधींचा सहभाग होता. २००७ मध्ये CPI(M) केंद्रीय समितीच्या जनसंघटनांच्या उपसमितीचे प्रभारी म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम : ए प्रिझन मेमोयर’ या पुस्तकातील त्यांच्या पक्षविरोधी विधानासाठी डिसेंबर २०२१ मध्ये त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
 
१७ सप्टेंबर २००९ रोजी दक्षिण दिल्ली मध्ये त्यांना अटक करण्यात आली.विशाखापट्टणम मध्यवर्ती कारागृहात १० वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर २०१९ मध्ये त्यांची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली.कोबाड यांनी १९७७ मध्ये अनुराधा शानबाग यांच्याशी विवाह केला. त्या सुद्धा CPI(Maoist) च्या केंद्रीय समिती सदस्या होत्या. मध्य भारतातील दंडकारण्य जंगलात एप्रिल २००८ साली मलेरियामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.२०१२ साली चक्रव्यूह चित्रपटातील गोविंद सूर्यवंशी हे पात्र ओम पुरी यांनी साकारले होते. असे म्हंटले जाते की हे कोबाड गांधीच्या चरित्रावर आधारित होते.

अध्यक्ष असलेल्या सदानंद मोरेंनी या विकृत मानसिकतेला भीक घातली नाही.त्यांनी राजीनामा देण्यास साफ नकार दिला आहे,सरकारला पुरस्कार रद्द करण्याचा अधिकार आहे आणि आपण सरकारविरोधात बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं मोरेंनी म्हटलं आहे.

फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकात काय लिहिले आहे ?

फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकात कोबाड गांधी यांनी २००१ मधील संसद हल्ल्यातील मुख्य आरोपी अफजल गुरुला खलनायक ठरवण्यात आल्याचं म्हटलं आहे. अफजलला दिलेली फाशी ही अत्यंत स्वातंत्र्यविरोधी कृती होती’, असं कोबाड गांधींनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.याशिवाय फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकात झारखंडमधील लढे, तुरुंगात भेटलेले डॉन किशन पहलवान, मुन्ना बजरंगी, फजलू रहमान आणि बृजेश सिंग यांचं उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.थोडक्यात काय तर सर्वसामान्य भारतीयांच्या पचनी न पडणारी हि विकृत मांडणी आहे

कोणतीच सिस्टिम परिपूर्ण नसते, आपल्या संविधानात देखील आज पर्यंत कालानुरूप १०८ घटना दुरुस्त्या झाल्या आहेत. भारतीय परंपरेत सुधारणेला नेहमीच वाव असतो.

जी कम्युनिस्ट व्यवस्था परिपूर्ण आहे असा डंका १९४० ते १९८० पर्यंत पिटणाऱ्या कम्युनिस्ट लाल माकडांना १०९२-९३ साली आपल्या विचारधारेचा अमृतमहोत्सव साजरा करण्याऐवजी त्याचा मृतमहोत्सव साजरा करावा लागला ,तो देखील त्याच्या जन्म भूमीत म्हणजेच रशियात . याचाच अर्थ communisam totally fractured सिस्टीम आहे. असल्या भंपक व पोकळ विचारधारेबद्दल कबाड गांधी अवाक्षर देखील काढत नाही.

याचाच अर्थ भारतीय लोकशाही ने दिलेल्या स्वातंत्र्याचा उघड उघड गैर-फायदा फ्रॅक्चर्ड फ्रीडम लिहून कबाड गांधीनी घेतला आहे.

“One of the basic rules of the universe is that nothing is perfect. Perfection simply doesn’t exist…..Without imperfection, neither you nor I would exist” ― Stephen Hawking

मुळातच नक्षलवादी हे नेहमीच लोकशाही विरोधीच असतात.लोकशाहीला विरोध हा नक्सलवादांच्या रक्तातच आहे आणि ते आजचे नाही तर त्यांच्या उत्पत्तीपासून लोकशाही विरोधी, राष्ट्र विरोधी आहेत.

आमच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक केले. त्याचे पुरावे मागताना माओवाद्यांना जराशीही लाज कशी काय वाटली नाही? दहशतवादी आणि नक्षल्यांजवळून जप्त केलेली शस्त्रे ही चिनी बनावटीची असल्याचे आढळून आले आहे. विरोधक आणि स्वत:ला सेक्युलर, मानवतावादी, एनजीओ म्हणविणारा एकही माईचा लाल या घटनांचा साधा निषेधदेखील करत नाही.

आपल्याला या भारत राष्ट्राला विश्वगुरू पदापर्यंत घेऊन जायचे आहे, आपल्याला या नव्या संकटाची, धोक्यांची आणि आव्हानांचीसुद्धा एका प्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे. नक्षल आपल्याला माहीत होते. मात्र, ‘अर्बन नक्षल’ एक नवा प्रकार सुरू झाला. जिहाद आपल्याला माहीत होता. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ अशा प्रकारचे शब्द कानावर यायला लागले आहेत आणि त्यांचा आवाका दिवसेंदिवस वाढतच आहे. हे प्रश्न सोडायचे असतील तर समाजाचे प्रबोधन करणे आणि समाजमध्ये समरसता,सर्वांगीण विकास निर्माण करणे हाच सोपा उपाय आहे.

आज देशातल्या लोकशाहीला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र भारतात आणि जगात कम्युनिजम कुठेही दिसत नाही असे का ?

तुमच्या बुडात दम असल्यास ” totally fractured communism” असे पुस्तक लिहून लेनिन,स्टालिनला उपकृत करावे हि नम्र विनंती …

Back to top button