कोल्हेंची खुलेआम निर्घृणपणे हत्या करुन देशभरात दहशत माजविण्याचे कारस्थान उघडकीस आणण्यात NIA ला यश
अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांची २१ जूनच्या रात्री गळा चिरुन खुलेआम निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती . अशीच हत्या आठवडाभरानंतरच राजस्थानच्या उदयपूर मधील टेलर कन्हैयालाल यांची करण्यात आली होती. दोन्ही हत्याकांडांमध्ये एक साम्य होते, या दोघांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ व्हॉट्सॲप वर पोस्ट केली होती. कन्हैयालालच्या मुलाने पोस्ट केली होती.
दोनच दिवसापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने ११ जणांवर उमेश कोल्हे हत्याकांडासाठी चार्जशीट दाखल केली आहे . सर्वच्या सर्व आरोपी हे तबलीगी जमातशी संबंधित आहेत.
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ उमेश कोल्हे यांनी ब्लॅक फ्रिडम या व्हॉट्सअप ग्रुप वर पोस्ट केली होती. ही पोस्ट या समूहातील पशुवैद्यकीय डॉक्टर युसुफ खान याने इतर मुस्लिम समाजातील व्हॉट्स ॲप गृपवर व्हायरल केली होती. तसेच मीटिंग ओन्ली या व्हाट्सअप ग्रुप वर अधिकाधिक मुस्लिम तरुणांना भडकवून या हत्येचा कट रचण्यात आला होता. इरफान खान आणि या हत्याकांडाचा मास्टरमाईंड मुसाफिक अहमद जो मौलानाही आहे .यांनी गौसिया हॉल येथे शाहरुख पठाण उर्फ बादशाह , अब्दुल तौफिक शेख उर्फ नानू , शोएब खान उर्फ भुरिया , अतीब रशीद , अब्दुल अरबाज , शेख शकील , मुद्दसीर अहमद आणि शहीम अहमद तसेच डॉक्टर युसुफ खान यांच्यासह बैठक घेऊन या हत्याकांडाचा कट रचला होता.
२० जून रोजीही यांनी उमेश कोल्हे यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता .परंतु त्या दिवशी शक्य झाले नाही.मात्र २१ जूनच्या रात्री त्यांनी बाईक आडवी घालत , उमेश कोल्हे यांना गळा चिरुन मागून येणाऱ्या त्यांचा मुलगा व सून यांच्यासमोर खुलेआम सर्व समाजात दहशत माजावी अशाप्रकारे निर्घृण हत्या केली. यासाठी त्यांनी सर्व प्रकारची रेकी करुन ठेवलेली होती. तसेच गळा चिरुन हत्या करण्याची ही प्रॅक्टिसही केलेली होती. हल्ल्याच्या वेळी पाच इंच इतकी खोल जखम केल्यामुळे कोल्हे यांच्या मेंदूची नस कापली गेली आणि त्यांचा मृत्यू झाला . एक आरोपी रुग्णालयातही पुढील घटना आपल्या टीमला सांगण्यासाठी हजर होता. तसेच योजनेनुसार सर्वांना वेगवेगळ्या भागात पाठवण्यासाठी गाड्यांच्या ही बंदोबस्त करण्यात आला होता.अतिशय काटेकोरपणे नियोजन या हत्याकांडासाठी करण्यात आले होते. एकूणच या हत्येतून दहशत माजावी ,असाच हेतू या आरोपींचा होता . हे NIAच्या तपासात स्पष्ट होत आहे.
NIA ने जुलैमध्ये यातील सात आरोपींना पकडले होते व त्यातूनच या हत्याकांडामागे फार मोठे कारस्थान असावे , याचा त्यांना संशय आलेला होता. हत्याकांडानंतर या आरोपींनी बिर्याणी पार्टी केल्याचे उघड झाले होते , असे पाच ऑगस्ट रोजी NIA ने सांगितले होते. मात्र एक मुख्य आरोपी शहीम अहमद हा फरार असल्याने, काही गोष्टींचा शोध पूर्ण व्हायचा होता. NIA ने त्याला पकडण्यासाठी रोख दोन लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. १७७ साक्षीदार तपासले आणि १३७ पानी चार्जशीट दाखल करण्यात आली.
बारकाईने या घटनेकडे लक्ष दिल्यास , हा आंतरराष्ट्रीय कट असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण एकूणच या प्रकरणाची सुरुवात ही अल- जझिरा या कतार स्थित वाहिनीने दिलेल्या व सातत्याने पसरवलेल्या नुपूर शर्मा यांच्या विरोधातल्या विखारी बातम्यांमुळे झाली. तिच्या समर्थनार्थ भारतात योजनाबध्द पद्धतीने व्हाट्सअप वर फिरणाऱ्या मेसेजच्या माध्यमातून , अशा नुपूर शर्माच्या समर्थकाला खुलेआम संपवून हिंदूंमध्ये आणि देशातच दहशत माजवण्याचा , हा एक कुटील डाव असावा . त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उमेश कोल्हे असो , कन्हैयालाल असो , श्रद्धा असो( ३५ तुकडे) की रुबिका( ५० तुकडे ) ज्या क्रुरतेने यांची हत्यारं शरीरावर चालतात. त्यातून यांच्या मनात काफिरांबद्दल किती विष कालवले आहे , याची जाणीव होते. व्हाट्सअप ग्रुप वर व प्रत्यक्षात आपल्याबरोबर असणारा मुस्लिम डायरेक्ट नसला तरी इनडायरेक्ट इस्लामच्या प्रभावामुळे काफिराला संपविण्यात सहभाग देतोच. मग ते पोस्ट पसरवून का असेना .आपण शाहिन बाग मध्ये घरावर हत्यारांचे जथ्येच्या जथ्ये जमा केलेले वा अगदी मोठी बेचकी( गलोल) बांधली गेलेली , हे सर्व बातम्यांमध्ये पाहिले . हे का त्यांना दिसून येत नाही .
उमेश कोल्हे हे फक्त निमित्तमात्र होते. एक नामचीन व्यक्ती चुकीचे वक्तव्य करणार आणि त्याचा प्रपोगंडा करुन , त्यावर प्रतिक्रिया देणा-या व्यक्तीला सर्वांसमक्ष क्रुरपणे मारुन,हिंदूंवर म्हणजेच देशात दहशत निर्माण करायची . असा हा कट रचण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही . NIA च्या तपासात हे लवकर उघड होईलच.
पण आता हिंदू जागृत होत आहे, संघटित होत आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्याकांडाचा त्रीव निषेध करुन आणि श्रद्धा वालकर प्रकरणातही सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती निर्माण होत आहे, गावोगावी झालेल्या निषेध सभा याचेच द्योतक आहेत.