मुंबईत घाटकोपर येथे असल्फा गावात कनव्हर्जनचा जोर

भोळ्याभाबड्या मराठी आणि हिंदी भाषिकांचे कनव्हर्जन(CONVERSION) करणाऱ्या रॅकेटची सामाजिक कार्यकर्ते नितीन कांबळे यांनी पुराव्यानिशी रितसर तक्रार पोलिसांत केली आहे. तसेच कनव्हर्जन करण्यासाठी अवैध सभागृह बांधण्यात आले आहे, त्याचीही एल वॉर्ड मुंबई महानगरपालिका(BMC) येथे पुराव्यानिशी तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी(POLICE) तपास कार्य सुरु आहे तसेच सहायक मनपा आयुक्त महादेव शिंदे एल वॉर्ड यांनीही नवभारत टाइम्सच्या(NBT) वार्ताहराला तपास करुन कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.


जागृत सामाजिक कार्यकर्ते नितीन कांबळे यांनी सांगितले की, घाटकोपर(GHATKOPAR) पश्चिम अस्लफा गाव येथील हिमाचल सोसायटी स्थित वाल्मिकी नगर मधे चंदन विश्वकर्मा रहातो , जो स्वतःला पास्टर म्हणवतो. ज्याने आपल्या डोंगराला खेटून असलेल्या १० फूट बाय १०फूट घरावर तीन मजले चढवले आणि डोंगर फोडून अवैधरित्या ५० फूट बाय ५० फुटांचे सभागृह ( प्रार्थना घर)बनवले आहे .


न्यू होप कम्युनिटी चर्च(NEW HOPE COMMUNITY CHURCH) चंदन विश्वकर्मा चालवतो . फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवून लोकांना आजार दूर करण्यासाठी, खाण्यापिण्याची सोय आणि पैशाची लालूच दाखवून कनव्हर्जन केले जाते. फेसबुक आणि सोशल मीडियावर आत्मा आणि परमात्मा बरोबर गाठ घालून देण्यासाठी ७ दिवसांचा कोर्सच्या बहाण्याने हा हरामखोर या भोळ्या भाबड्यांच्या श्रद्धेशी खेळ मांडतो . लोकांना देव पुजने बंद करण्यास सांगून हळूहळू त्यांचे ब्रेन वॉश करतो. येशू हाच एकमेव जिवंत देव आहे हे त्यांच्या मनावर बिंबवले जाते. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला होणा-या या ७ दिवसांच्या वर्गात बायबल शिकवली जाते.
आजार ठिक करण्याचा बहाणा करून त्यांना ख्रिस्ती बनविण्यासाठी चंदन विश्वकर्मा कार्यरत आहे. ५० बाय ५० फुटांच्या या सभागृहात शिबीर भरवले जाते . प्रत्येक ९ तारखेला पवित्र आत्मा संमेलन आणि ७ दिवसांचे जीवन परिवर्तन शिबीर या सभागृहात आयोजित करण्यात येते. मोठ्या प्रमाणात यात मराठी आणि हिंदी भाषिकांचे कनव्हर्जन सुरु आहे.
https://drive.google.com/file/d/1cYli_9NLU-TF2snxuFx7juoiObyjmz5o/view?usp=sharing
मागच्या वर्षी ९ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर असे शिबीर आयोजित करण्यात आले होते , त्याप्रसंगी जागृत सामाजिक कार्यकर्ते नितीन कांबळे यांनी १४ नोव्हेंबर रोजी महानगरपालिका, १८ नोव्हेंबर रोजी घाटकोपर पोलिस स्टेशन आणि २४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार पुराव्यानिशी सादर केली आहे.
जवळपास दिड महिना लोटला आहे, परंतु अजूनही तपास चालू आहे हे गुळगुळीत झालेले वाक्य ऐकवण्यात येते . मंगळवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांचीही भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे , असे नितीन कांबळे यांनी सांगितले.