News

मायारामांची माया

जहाँ तहजीब बिकती हैं, जहाँ फरमान बिकते है, जरा तुम दाम तो बोलो यहाँ ईमान भी बिकते हैं…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या(pakistan) ISI ( Inter-Services Intelligence ) ला पाठबळ पुरवणाऱ्या अश्या भ्रष्ट,देशद्रोही,देशविघातकी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना तसेच पडद्याआडून काम करणाऱ्या सगळ्या उच्चपदस्थांना देशद्रोहाच्या आरोपाखाली कठोर शासन झालेच पाहिजे.

सीबीआयच्या (CBI )केंद्रीय पथकाने देशाचे माजी अर्थ सचिव अरविंद मायाराम (arvind mayaram)यांच्या ठाण्यावर मोठी कारवाई केली आहे.सीबीआयने मायारामच्या जयपूर आणि दिल्लीच्या ठिकाणी छापे टाकले आहेत.अरविंद मायाराम हे मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारच्या कार्यकाळात वित्त सचिव होते.सध्या ते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सल्लागार आहेत. केंद्रीय वित्त सचिव असताना अरविंद मायाराम यांच्यावर नोटा छपाईच्या निविदा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.त्यांच्यावर १६८८ कोटी रुपयांच्या चलन छपाई घोटाळ्याचा आरोप आहे.आता गुरुवारी, १२ जानेवारी रोजी सीबीआयच्या केंद्रीय पथकाने जयपूर आणि दिल्लीतील ठिकाणांवर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली.

सीबीआयकडून माजी वित्त सचिव अरविंद मायाराम यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर “दे ला रू” (de la rue ) प्रकरण साधेसुधे नाही हे लक्षात येते.मायाराम यांच्या पाठीशी असलेले अदृश्य परंतु मजबूत हात कोणाचे, हे या क्षणापर्यंत तरी स्पष्ट झालेले नाही.परंतु काही निखळलेल्या क़ड्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे,असे ठामपणे वाटते.यूपीए काळात तीन वर्षे अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळणाऱे ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणब मुखर्जी यांच्या कार्यालयात झालेल्या हेरगिरी प्रकरणही मायाराम प्रकरणाचा एक भाग होता,असा सवाल निर्माण झाला आहे.

CBI ने आरोप केला आहे की मायाराम यांनी २०१३ मध्ये ब्रिटीश-फर्म दे ला रू ला भारतीय बँक नोटांसाठी विशेष कलर शिफ्ट/धागा (सेफ्टी थ्रेड) पुरवठा करण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी बेकायदेशीर मुदतवाढ दिली. ब्रिटीश फर्मला दिलेल्या या अवाजवी मुदतवाढीमुळे भारतीय तिजोरीचे प्रचंड नुकसान झाले, असा आरोप यात करण्यात आला आहे. दरम्यान चलन छपाईसाठी देण्यात आलेल्या निविदेतील अनियमिततेत त्यांचा सहभाग असल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.

१० जानेवारी रोजी दाखल केलेल्या सीबीआय रिपोर्टमध्ये ब्रिटीश फर्म, मायाराम, वित्त मंत्रालयाचे अज्ञात अधिकारी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी यांच्यामध्ये गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.सीबीआय चौकशीत असे आढळून आले की मायाराम यांनी गृह मंत्रालय आणि अर्थमंत्र्यांची सुरक्षा मंजुरी नाकारून कालबाह्य झालेले कराराची मुदत ब्रिटीश फर्मला वाढवून दिली. सरकारने २००४ मध्ये DeLaRue इंटरनॅशनलशी करार केला होता. त्यानंतर हा करार डिसेंबर २०१५पर्यंत चार वेळा वाढवण्यात आला.

मायाराम यांच्यासोबत अर्थ मंत्रालय आणि आरबीआयच्या काही अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. अरविंद मायाराम यांनी २०१२-१४ दरम्यान भारताचे वित्त सचिव म्हणून काम केले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये पी चिदंबरम हे अर्थमंत्री असताना मयाराम यांची ग्रामीण विकास मंत्रालयात बदली करण्यात आली होती.

आहेत तरी कोण अरविंद मायाराम

१९७८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या मायाराम यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही काम केले आहे. मायाराम यांच्याकडे वित्त विषयात पीएचडी आहे आणि त्यांनी भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणून जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि आफ्रिकन विकास बँकेच्या बोर्डावर काम केले आहे.

अरविंद मायाराम हे राजकीय घराण्यातील आहेत

निवृत्त आयएएस अरविंद मायाराम हे राजकीय घराण्यातील आहेत. त्यांची आई इंदिरा मायाराम १९९८ ते २००२ या काळात काँग्रेसच्या आमदार होत्या. सांगानेर विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. अशोक गेहलोत यांच्या पहिल्या कार्यकाळात त्या मंत्रीही होत्या. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. अरविंद मायाराम हे काँग्रेस हायकमांडच्याही जवळचे राहिले आहेत. केंद्रातील यूपीए सरकारमध्ये ते केंद्रीय अर्थसचिव होते. याआधी, आयएएस असताना, ते राजस्थान सरकारच्या पर्यटन, नियोजन आणि उद्योग खात्यात सचिव होते आणि अलवर आणि बुंदीमध्ये जिल्हाधिकारीही होते.

अरविंद मायाराम भारत जोडो यात्रेत दिसले होते

६७ वर्षीय अरविंद मायाराम निवृत्तीनंतर काही काळासाठी राजस्थानमध्ये आले होते. त्यांची काँग्रेस पार्श्वभूमी आणि हायकमांडशी असलेली जवळीक यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांना आपले सल्लागार बनवले. मागच्याच दिवसात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा राजस्थानातून पुढे गेली. त्यानंतर अरविंद मायाराम यांनीही यात्रेत सहभाग घेतला. २२ डिसेंबरला अलवरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत अरविंद मायारामही उपस्थित होते.

या प्रकरणातून अनेक प्रश्न उपस्थित होतात ते पुढीलप्रमाणे :-

-मायारामांच्या मागे अदृश्य हात कोणाचा ?

-इतके गंभीर आरोप असूनही मायाराम राजस्थान सरकारचे सल्लागार कसे होतात ?

-RBI ने या प्रकरणात आपली भूमिका का स्पष्ट केली नाही ?

-“दे ला रू” कंपनीला सक्षम (without patent) नसताना कंत्राट कसे दिले गेले ?

भारतासारख्या देशाला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर प्रथम गरज आहे ती भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्याची. जरी हे कार्य खूप कठीण आहे परंतु ते पूर्णपणे आवश्यक आहे. भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्रात आहे आणि तो आपल्या भारत राष्ट्राचा नाश करत आहे.आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे आणि देशहितासाठी जागरुक होऊन सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, तरच आपला भारत विकसित आणि भ्रष्टाचारमुक्त भारत होऊ शकेल.

अरविंद मायारामांनी सदैव ध्यानी ठेवावे कि :-

उड़ने दो धूल को आखिर कहाँ तक उडेंगी,

हवाओं ने जब साथ छोड़ा तो जमीन पर ही गिरेंगी…

https://www.thehindubusinessline.com/news/cbi-searches-residences-of-former-finance-secretary-arvind-mayaram/article66370005.ece

https://swarajyamag.com/politics/in-the-spotlight-a-look-into-arvind-mayaram-former-finance-secretary-under-cbi-lens

https://hindupost.in/politics/cbi-raids-house-of-finance-secretary-mayaram/

Back to top button