ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा… हिंदू मंदिराची विटंबना..
मेलबर्नमधील ऐतिहासिक शिव विष्णू मंदिरावर खलिस्तानी समर्थकांकडून हल्ला, आठवडाभरात हिंदू मंदिरांवर दुसरा हल्ला
मेलबर्नच्या( melbourne) उत्तरेकडील मिल पार्कमधील BAPS (Bochasanwasi Shri Akshar Purushottam Swaminarayan Sanstha ) स्वामीनारायण मंदिरावरील हल्ल्याच्या काही दिवसांनंतर, खलिस्तानी गुंडांनी आता शहरातील आणखी एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले आहे.
मंगळवारी, खलिस्तानी समर्थकांनी ऑस्ट्रेलियातील(australia) मेलबर्नमधीलआणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड केली. बदमाशांनी कॅरम डाउन्स येथील ऐतिहासिक श्री शिव विष्णू मंदिरावर (shiva vishnu temple) हल्ला चढवला आणि तोडफोडीच्या वेळी मंदिराजवळील भिंतींवर हिंदुविरोधी आणि भारतविरोधी घोषणा लिहिल्या.तोडफोडीच्या वेळी मंदिरांच्या भिंतींवर ‘टार्गेट मोदी’, ‘मोदी हिटलर’, ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या गेल्या.‘द ऑस्ट्रेलिया टुडे’ च्या वृत्तानुसार, मेलबर्नच्या मिल पार्कच्या उत्तरेकडील उपनगरातील BAPS स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तान समर्थकांनी कथित हल्ला आणि तोडफोड केल्याच्या घटनेच्या काही दिवसांनंतर हा हल्ला झाला आहे.
१६ जानेवारी रोजी जेव्हा भक्तगण दर्शन करण्यासाठी आणि तीन दिवसांच्या “थाई पोंगल” (मकर संक्रांति ) सणाच्या उत्सवासाठी मंदिरात आले होते, जो तमिळ बांधवांकडून साजरा केला जातो. हिंदू कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया चे अध्यक्ष मकरंद भागवत यांनी या घटनेचा निषेध केला आणि म्हटले, “खलिस्तानच्या प्रचारासाठी दुसऱ्या हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याचे पाहून मी किती व्यथित झालो हे मी सांगू शकत नाही. आम्ही हे प्रकरण व्हिक्टोरियन बहुसांस्कृतिक आयोग आणि व्हिक्टोरियाच्या बहुसांस्कृतिक मंत्री यांच्याकडे नक्कीच मांडू कारण हिंदूंना जीवे मारण्याची धमकी ही अत्यंत गंभीर बाब आहे.
ऑस्ट्रेलियातील विश्व हिंदू परिषदेनेही हल्ल्याचा निषेध करत हा हल्ला अचानक झालेला नसून एक नियोजनबद्ध व रणनीतीदृष्ट्या केलेला हल्ला असल्याचे सांगितले. हिंदू मंदिरांवरील हल्ल्याचा ज्यू कम्युनिटी कौन्सिल ऑफ व्हिक्टोरिया आणि गुरुद्वारा सिरी गुरू नानक दरबार, व्हिक्टोरियन कौन्सिल ऑफ चर्च आणि बुद्धिस्ट कौन्सिल ऑफ व्हिक्टोरिया यांनी निषेध केला आहे. कौन्सिलच्या मते, हिंदूंना जीवे मारण्याच्या धमक्या ही एक महत्त्वाची चिंतेची बाब आहे, कारण भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदाय आता अतिरेकी खलिस्तानच्या दहशतीत जगत आहे.
यापूर्वी 12 जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील BAPS स्वामीनारायण मंदिर या हिंदू मंदिराची खलिस्तान(khalisthan) समर्थकांनी कथितपणे तोडफोड केली होती आणि त्यावर भारतविरोधी भित्तिचित्रे रंगवून नुकसान केले होते. वृत्तानुसार, मिल पार्कच्या उत्तरेकडील उपनगरातील मेलबर्नच्या प्रतिष्ठित स्वामीनारायण(swami-narayan) मंदिराच्या भिंतींवर ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’ म्हणजे ‘डाउन विथ इंडिया’ अशा घोषणांनी स्प्रे पेंट करण्यात आले होते.
हल्लेखोरांनी हिंदू मंदिरांची तोडफोड करताना भिंद्रनवाले याला ‘संत’ म्हटले आणि त्यांना ‘शहीद’ म्हटले. तोडफोडीच्या वेळी मंदिराजवळील भिंतींवर “संत भिंद्रनवाले शहीद” लिहिलेल्या होत्या. आपणास माहिती आहेच की जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा खलिस्तानी दहशतवादी होता, जो २० हजारांहून अधिक हिंदू आणि शिखांच्या हत्येसाठी जबाबदार होता. परंतु, त्याचा फुटीरतावादी खलिस्तानी संत म्हणून गौरव करत असतात.
अलिकडच्या वर्षांत पाश्चिमात्य देशांत व्हर्च्युअल(online ) आणि भौतिक अशा दोन्ही पातळ्यांवर हिंदुफोबिया चिंताजनकपणे वाढला आहे हे उघड आहे. हा हिंदू-द्वेष हिंदुविरोधी धर्मांध इव्हँजेलिकल्स, इस्लामवादी आणि खलिस्तानी लोकांच्या एकत्रित युतीद्वारे चालविला जातो. पाश्चात्य शिक्षण व्यवस्था, मीडिया आणि राजकीय पक्षांच्या प्रभावशाली वर्गांनी, स्पष्टपणे किंवा अप्रत्यक्षपणे हिंदुफोबियाला पाठिंबा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर आणि पाश्चात्य सरकारांच्या हिंदुद्वेषी गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येची कबुली देण्यास आणि त्यास सामोरे जाण्याची अनिच्छा पाहता, मेलबर्नमधून आजच्या प्रकरणात काही अर्थपूर्ण कारवाई केली जाईल की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खलिस्तानी गट गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलिया आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये मुक्ततेने कार्यरत आहेत. पाश्चिमात्य देशांनी भारतासोबत खऱ्या अर्थाने भागीदारी करण्याबाबत गंभीर असल्यास आपल्या मातीतून कार्यरत असलेल्या या हिंदुद्वेषी घटकांविरुद्ध आता कारवाई करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
परदेशातील ‘हिंदू खतरे में’ आहेत. या अतिरेक्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी जगभरातील सज्जनांनी एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर पुढचा काळ परदेशातील हिंदूंसाठी अतिशय कठीण असू शकतो.
समस्थ हिंदू(hindu) समाजाने एकत्रितपणे हिन्दुफोबिया नामक आव्हानाला सामोरे जाण्याची नितांत आवश्यकता आहे..
श्री वेदव्यास म्हणतात ना :-