HinduismNews

हिंदू भाव प्रकट करण्यासाठी व त्या माध्यमातून राष्ट्रहित साधण्यासाठी, हिंदू बंजारा कुंभ.

अखिल भारतीय हिंदू (hindu) गोर बंजारा (gor banjara )व लबाना-नायकडा समाज कुंभाची (bnjara kumbh )तयारी जोरात सुरू आहे. समाजात उत्साहाचे वातावरण आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचे कुंभाकडे लक्ष वेधले गेले आहे. जेवढा मोठ्या प्रमाणावर समाज अजून एकत्र आलेला नाही, तेवढा 25 ते 30 जानेवारी दरम्यान समाज एकत्र येईल असे चित्र आहे. सर्व समाज बांधव तांड्यात कुंभाची माहिती देणाऱ्या कार्यकर्त्यांचे आनंदात आणि उत्स्फूर्तपणे स्वागत करत आहे. कुंभात महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे.

आजवर अनेक संघटना बंजारा समाजात तयार झाल्या, त्यांनी समाज संघटित करण्याची भाषा केली. काही संघटनांनी(सर्वच नाही) समाज संघटित करण्याच्या नावाखाली द्वेषपूर्ण विचार पसरवला, काही संघटनांनी तर समाजाला अध्यात्मापासून दूर नेण्याचे कारस्थान केले, अर्थात श्रीराम, श्रीकृष्ण, जगदंबा देवी पासून वेगळे करण्याचे प्रयत्न केले. भारतातील कोणताही समाज मूळ सनातन हिंदू धर्मापासून आणि अध्यात्मापासून दूर जाऊ शकत नाही, हे ते विसरले, ही त्यांची सर्वात मोठी चूक होती. प्रत्येक भारतीयाच्या अंतर आत्म्यात श्रीराम वास करतात, अध्यात्म हेच राष्ट्राचे प्राण आहे, हे ही मंडळी विसरली. भारतातील कोणताही समाज श्रीराम किंवा अध्यात्मापासून दूर राहू शकत नाही, बंजारा व्यक्ती दिवसाची सुरुवात रामाचे नाव घेऊन करतो शुभ कार्यात रामाचे नाव घेतो, पाहुण्यांना भेटताना राम राम म्हणतात.

अध्यात्म ही भारताची ओळख आहे, ती प्रत्येक भारतीयात दिसून येते. बंजारा समाजाला आध्यात्मचे अधिष्ठान लाभले आहे. आदिशक्ती जगदंबा, श्रीराम, श्रीकृष्ण, शिव, हनुमान, भवानी तथा आदी देवतांचा पूजक बंजारा समाज आहे. सनातन हिंदू धर्मात सूर्य, चंद्र, अग्नी, नदीची ही पूजा केली जाते बंजारा समाजही यांची पूजा करतो. संत हाथीराम बाबा, संत सेवालाल महाराज, दगाजी बापू, लक्ष्मण चैतन्य बापू, संत डॉ रामराव महाराज, संत ईश्वरसिंग महाराज ही संतांची महान परंपरा बंजारा समाजाला लाभली आहे, सर्वच संतांनी बंजारा समाजाला सनातन हिंदू धर्माची शिकवण दिली आहे. हिंदू धर्म रक्षणासाठी अनेक वीरांनी बंजारा समाजातून बलिदान दिले आहे. राष्ट्र रक्षण असो किंवा धर्म रक्षण बंजारा समाज नेहमी पुढे राहिला आहे, बाबा लखी शाह बंजारा यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आजही बंजारा समाज धर्म आणि राष्ट्र कार्यात पुढे असतो. त्यामागे प्रेरणा हीच आहे.

काहीजण म्हणतात बंजारा समाजाचे कपडे वेगळे आहेत म्हणून बंजारा वेगळे आहेत, मुळात हे म्हणणे हास्यास्पद आहे, कारण कपडे हे धर्मानुसार नसतात तर भौगोलिक परिस्थिती नुसार असतात. भारताची ओळख विविधता मध्ये एकता आहे. भौगोलिक परिस्थिती नुसार राहणीमान वेगळी असले तरी प्रत्येक भारतीयांच्या मनात राम आणि जीवनात अध्यात आहे. काश्मीर मधील आणि केरळ मधील हिंदूंमध्ये राहणीमान मध्ये फरक असतो पण त्याच्या मनात राम बद्दल एकच भाव असतो. असेच बंजारा समाजाचे व भारतातील प्रत्येक समाजाचे आहे. आपल्याला मनातील भाव बघायचा आहे, हाच भाव देशाला जोडतो, हाच भाव आपल्याला प्राचीन पूर्वजांशी एकरूप करतो, आपण सर्व एकाच मातृभूमीचे पुत्र आहे हा भाव सांगतो. हा भाव प्रेम आणि बंधुभाव वाढवतो आणि हाच भाव जपायचा आहे. या भावला हिंदू भाव म्हणतात.

गोद्री येथे होणाऱ्या कुंभाच्या माध्यमातून बंजारा समाजाला त्याच्या मूळ मार्गावर आणले जात आहे, आजवर जेवढ्या मोठ्याप्रमाणात समाज एकत्र आला नाही तेवढ्या मोठ्याप्रमाणात समाज एकत्र आणल्या जात आहे, बंजारा समाजाचा मूळ हिंदू भाव प्रकट केला जात आहे. भारतातील कोणत्याही व्यक्तीचा हिंदू भाव प्रकट झाल्याने तो राष्ट्रहितच साधतो. बंजारा समाजाचा हिंदू भाव प्रकट झाल्याने राष्ट्रहित तर साधल्या जाईल त्यासोबत धर्मांतरण बद्दल जनजागृती होईल, संतांचे मार्गदर्शन प्राप्त होईल. संतांच्या मार्गदर्शन मिळाल्या मुळे, निरामय व आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. बंजारा समाजाच्या इतिहासाचा जागर होईल, त्यामुळे स्वत्वाची जाणीव होईल. राष्ट्र समोर असलेल्या गंभीर समस्याची माहिती मिळेल.

दिपक तुकाराम राठोड,
संभाजीनगर.

Back to top button