
आझमगड तुरुंगात महिलांना गांजा पुरवताना पकडले…
उत्तरप्रदेश पोलिसांनी शबनम, मदिना, शहनाज आणि शबाना या ४ महिलांना आझमगड तुरुंगात गांजा (Marijuana) पुरवल्याबद्दल अटक केली आहे. कारागृहात बंद असलेल्या नातेवाईकांना भेटण्याच्या बहाण्याने त्या बुरख्यामध्ये(burkha) अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन जात असत. त्यांच्या बुरख्यामध्ये तब्बल ४ किलो गांजा लपवून ठेवलेला आढळून आला. इम्रान आणि इस्माईल या तुरुंगातील दोन कैद्यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग आहे. त्यांच्यावर अंमली पदार्थ( Narcotic) आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985 ) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतरांची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

https://hindupost.in/crime/burqa-crimes-women-caught-supplying-ganja-in-azamgarh-jail/
आता ही दुसरी मुंबई मधील बातमी बघा :-
बुरखा परिधान करुन ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; प्रभादेवी येथे दिवसाढवळ्या ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घातल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रभादेवी येथील स्वर्णदीप ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीसह एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
आता ही तिसरी पुण्यातील बातमी बघा :-
वृद्धेवर वार करून दागिने पळविले
घरात एकटी असलेल्या ८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर एका बुरखाधारी व्यक्तीने वार करून तिचे दागिने पळवून नेण्याचा प्रकार भवानी पेठेत सोमवारी घडला. मात्र, चोरटा त्याच कॉलनीतील असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/crime/articleshow/46750878.cms

वरील बातम्यांवरून आपल्या या चोऱ्यांची भयावहता लक्षात आलीच असेल. बुरख्यामुळे एखाद्या व्यक्तीची ओळख पटवणे अक्षरशः अशक्य होते आणि अशा इस्लामिक परिवेषतेचा आधार घेत आपली ओळख लपवून चोरी, दरोडा, तस्करी अशा अवैध धंद्यांसाठी सर्रास केला जातो.
गुन्हेगारी जगतासाठी बुरखा हे जणू वरदान ठरत आहे.
बुरखा..


परपुरूष आपल्याकडे आकर्षित होऊ नये यासाठी बुरखा घातला जातो. थोडा अधिक सखोल विचार केल्यास, बुरखा हा प्रकार पुरुषांच्या विकृत मानसिकतेतून आलेला आहे असे लक्षात येते. स्री माझी प्रॉपर्टी आहे आणि माझ्या प्रॉपर्टीला इतरांनी पाहू नये अशी ती खरी भावना आहे.

बुरखा आणि हिजाब हे दोन इस्लामी परंपरेचा भाग मानले जातात. पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हिजाब(hijab) हा फक्त डोक्यावरचे केस झाकण्यासाठी बांधला जातो. जसा स्कार्फ बांधतात. पुरुष स्त्रीच्या केसांकडे अधिक आकर्षित होतो म्हणे. ते आकर्षण टाळण्यासाठी मुस्लिम (islam) महिला हिजाब वापरतात. मात्र हिजाबमध्ये चेहरा उघडा राहत असल्यामुळे त्या स्त्रीची सहज ओळख पटू शकते.

बुरखा म्हणजे डोळे सोडून संपूर्ण शरीर झाकून टाकणारा नखशिखांत झगा, डोळ्यासमोर देखील जाळीदार चौकट असते. मुस्लिम सुन्नी पंथीयांमध्ये काळा बुरखा वापरण्यात येतो. तर शिया पंथीय बोहरी समाजातील महिला काळा सोडून रंगीबेरंगी बुरखा वापरतात. बहुतांशी तो बुरखा सॅटिनचा असतो. मात्र बुरखाधारी बोहरी महिला आपला चेहरा कधीच झाकत नाही. त्यामुळे त्यांची ओळख सहज पटू शकते.

मुस्लिम महिलांना एका अर्थाने दुय्यम वागणूक देणं आणि इस्लामी पुरुषप्रधान मानसिकतेचं वर्चस्व राखणं यातून सुरू झालेली ही निव्वळ ढोंगी परंपरा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (babasaheb ambedkar) हिजाब वा बुरखा हे अप्रगत समाजाचं लक्षण आहे तसेच मुस्लिम समाजात सुधारणा होण्याची अत्यंत गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. Thoughts on Pakistan मधलं त्यांचं हे विधान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं म्हणायचं आणि सर्वोच्च न्यायालयाने शाळेत हिजाब वापरू नये असा निकाल दिला तर तो मानणार नाही म्हणायचं. वाह रे मियां..

एका बाजूला संविधाना (constitution) चा जप करायचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा (supreme court) निकाल कचऱ्याच्या टोपलीत फेकून द्यायचा, हे म्हणजे अत्यंत धर्मांध आणि कालबाह्य व्यवस्थेचे अवशेष जपण्याचा केविलवाणा, दुर्दैवी अट्टाहास आहे..

बुरख्याचा उपयोग चोऱ्यामाऱ्या, तस्करी आणि दरोड्यात आपली ओळख लपवण्यासाठी केला जातो हे एक वेळ समजू शकते परंतु त्याचा वापर जेव्हा आतंकवादी हल्ल्यांमध्ये स्फोटके लपून आणण्यासाठी आत्मघातकी हल्लेखोराकडून केला जातो तेव्हा या कालबाह्य रूढीचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे असे म्हणावे लागते.
आत्मघातकी हल्यांमध्ये बुरखा घातलेल्या धर्मांध अतिरेक्यांना पोलिसांनी,लष्कराने लांबून ओळखायचे तरी कसे ??
बुरखाधारी व्यक्ती ही महिला असावी हे गृहीत धरून पुरुष पोलीस (police) त्या व्यक्तीच्या तपासणी पासून दूर रहातात. तिथे उपस्थित एखाद दुसरी महिला पोलिस जर नीट तपासणी करत असेल तर ठीक, अन्यथा अनर्थ अटळ..


इराणमधल्या हिजाबविरोधी आंदोलनाला भारतातील सुन्नी (sunni) मुसलमान पाठिंबा देतात कारण आग शिया इराणमध्ये लागली आहे म्हणून ?? यापेक्षा मोठा धार्मिक दुटप्पीपणा अजून काय असू शकतो ???
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बुरख्यावर बंदी घालणं श्रेयस्कर ठरेल.
https://drive.google.com/file/d/1TerSbM7uL8N_gTlOh35pA7AQf3t0GZsU/view?usp=sharing