शास्त्रज्ञ १
‘मेटासायन्स’चा निर्माता अल्लादि रामकृष्णन
२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
भारताची राज्यघटना साकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वडिलांचा वारसा गणिताच्या क्षेत्रात चालविणारा अलौकिक बुद्धिमत्तेचा धनी शास्त्रज्ञ (scientist )म्हणजे अल्लादि रामकृष्णन. होमी भाभांच्या प्रेरणेने आणि त्यांच्याच हाताखाली भौतिकशास्त्रात संशोधन केल्यानंतरही गणितातील प्रज्ञा ओळखून त्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले.
वकिली सोडून शाखज्ञ बनलेले अल्लादि रामकृष्णन (Alladi Ramakrishnan) हे भारतातील एक अव्वल दर्जाचे भौतिकशास्त्र आणि गणिती होते, ज्यांनी १९६२ मध्ये चेन्नई येथील प्रसिद्ध इन्स्टिटयूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसची स्थापना केली. त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले.
विज्ञानाच्या (science) क्षेत्रात आपली कारकीर्द घडवावी, असे रामकृष्णन यांना १९४३ साली वाटले. तत्कालीन मद्रासमधल्या प्रसिद्ध प्रेसिडन्सी कॉलेजात रॉयल सोसायटीचा सर्वात तरुण फेलोचा सन्मान प्राप्त करून इंग्लडडून(london) नुकत्याच परतलेल्या डॉ. होमी भाभा यांचे मेसान अबद्दलचे एक व्याख्यान त्या वर्षी रामकृष्णन यांनी ऐकले. भाभांच्या त्या व्याख्यानाचा रामकृष्णन यांच्यावर इतका परिणाम झाला की वकिलीच्या क्षेत्रातील आश्वासक व्यावसायिक यशाचा मार्ग सोडून त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात कारकिर्द घडवण्याचा निर्णय घेतला.
रामकृष्णन यांचा जन्म ९ ऑगस्ट १९२३ रोजी झाला आणि त्यांचे शालेय शिक्षण चैन्नईच्या पेन्नतूर सुब्रह्मण्यम हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील अल्लादि कृष्णस्वामी हे एक नाणावलेले वकील होते, ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिण्यातही महत्त्वाची भूमिका बजावलेली होती.
शालेय स्तरापासूनच गणित आणि भौतिकशास्त्र, या दोन्ही विषयांत रामकृष्णन यांच्या स्वतंत्र बद्धिमत्तेची चमक दिसून आली होती. नंतर लॉयला कॉलेजमधून उच्च शिक्षण घेताना (अभिजात भूमिती) क्लासिकल जॉमेट्री हा त्यांच्या आवडीचा विषय होता.
रामकृष्णन यांच्यावर त्यांच्या वडिलांचा मोठा प्रभाव होता. त्या प्रभावामुळेच त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला, त्यात उत्तम गुणांनी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि हिंदू कायदा या विषयात त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केला.
विज्ञानाच्या क्षेत्रात कारकिर्द करण्याचे निश्चित केल्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च (TIFR) मध्ये डॉ. भाभा (BHABHA) यांच्यासोबतच काम करण्यास सुरुवात करणात्या अगदी पहिल्या फळीतील शाखांमध्ये रामकृष्णन यांचा समावेश झाला. भाभांनी त्यांना कास्केड सिद्धांत आणि वैश्विक किरणांमधील चढ-उतारांच्या समस्येचा परिचय करून दिला. रामकृष्णन यांनी या सिद्धांतावर काम करताना त्यांनी कोरिलेशन डेन्सिटीज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संकल्पनेला प्रॉडक्ट कार्यरत राहिले. डेन्सिटी असे नवे नाव दिले. याच विषयात १९४९ च्या ऑगस्टमध्ये प्रा. एमएस ब्रेटलेट यांच्या हाताखाली काम करीत त्यांनी मँचेस्टर विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळवली. प्रॉडक्ट डेन्सिटीबाबतचे त्यांचे संशोधन १९५० मध्ये केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. प्रख्यात भारतीय खगोलभौतिकीतज्ज्ञ सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांच्स आकाशगंगेवरील अभ्यासात दिसून आलेल्या पलक्च्युएशन डेन्सिटी फिल्ड समस्येवरही रामकृष्णन यांनी याच वर्षात काम केले.
याच विषयाशी संबंधित ‘स्टॉकॅस्टिक प्रक्रियेतील व्यस्त संभाव्यता’ या विषयावर पुढे त्यांनी १९५६ मध्ये इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस (Indian academy of sciences) मध्ये एक शोधनिबंध सादर केला. १९५७-५८ दरम्यान अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ हायर स्टडी या संस्थेच्या संचालकांच्या निमंत्रणावरून रामकृष्णन यांनी त्या संस्थेचा दौरा केला. या भेटीने ते खूपच प्रभावित आणि उत्साहित झाले होते. त्यानंतर १९६० मध्ये भारतभेटीवर आलेले नोबेल विजेते प्रा. निल्स बोहर रामकृष्णन यांचा उत्साह पाहून प्रभावित झाले आणि त्यांनी रामकृष्णन यांच्या नावाची शिफारस पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे केली. त्यातूनच पुढे १९६२ मध्ये ‘मेटासायन्स’ अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस या संस्थेचा जन्म झाला. निवृत्तीपर्यंत म्हणजे १९८३ पर्यंत २१ वर्षे रामकृष्णन या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते.
१९५८ ते ८३ या पावशतकाच्या काळात रामकृष्णन यांनी जवळपास ३० विद्याथ्र्यांना पीएचडी संशोधनासाठी मार्गदर्शन केलं आणि जवळपास सर्वांनाच परदेशी जागतिक परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून दिली. निवृत्तीनंतरही नव्या संशोधकांना मार्गदर्शन करणे त्यांनी थांबवले नव्हते. अगदी ८ जून २००८ रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे अल्लादी कृष्णस्वामी या आपल्या मुलाच्या घरी शेवटचा श्वास घेईपर्यंत त्यांचे ज्ञानदानाचे कार्य सुरूच होते.
लेखक :- डॉ. नकुल पराशर
(डॉ. नकुल पराशर विज्ञान प्रसारचे संचालक असून एक सिद्धहस्त विज्ञान संपादक व लेखक आहेत )
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)