शास्त्रज्ञ १६
आण्विक भौतिकशास्त्रात लीन एस एन घोषाल
२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
भौतिकशास्त्राचे अध्यापन आणि शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन या दोन्ही भूमिका अगदी चोखपणे बजावणारे समरेंद्रनाथ घोषाल यांनी भौतिकशास्त्राच्या विविध अंगांची माहिती देणारी विविध स्तरांवरील अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यामुळे एसएन घोषाल हे नाव भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सहसा अपरिचित नसते.
भौतिकशास्त्राच्या अनेक विद्याथ्र्यांसाठी, अगदी पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठीही, प्रा. समरेंद्रनाथ घोषाल, हे नाव अगदी सुपरिचित असते. एसएन घोषाल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भौतिकशास्त्रज्ञाने आण्विक भौतिकी, केंद्रकीय भौतिकी, क्वान्टम मेकॅनिक्स, आदीसह भौतिकशास्त्रातील अनेक विषयांवर पुस्तके, पाठ्यपुस्तके लिहिलेली आहेत. त्यामुळे त्यांचे नाव माहीत नसणे हे त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतांवरच प्रश्नचिन्ह उभे करणारे असते. उच्च बुद्धिमत्तेचे वरदान लाभलेल्या प्रा. घोषाल यांनी भौतिकशास्त्राचे अध्यापन आणि शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन या दोन्ही भूमिका आपल्या कार्यकाळात अगदी चोखपणे बजावल्या.
समरेंद्रनाथ घोषाल(samarendra nath ghoshal ) यांचा जन्म १९२३ मध्ये कोलकात्यात झाला. कोलकाता विद्यापीठात एमएससी पूर्ण करून ते पीएचडीसाठी अमेरिकेला बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात गेले.
तिथे प्रा. एमिलो सेगर यांच्या हाताखाली प्रायोगिक आण्विक भौतिकशास्त्र या विषयात त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. हे क्षेत्र त्या काळी अत्यंत घडामोडींनी भरलेले क्षेत्र होते. इथेच १९५० मध्ये तरुण समरेंद्रनाथांनी निल्स बोहर यांनी मांडलेली संयुक्त अणुकेंद्रकांची हेच दिसून येते. संकल्पना पडताळून पाहण्यासाठी प्रयोग करण्याचे ठरवले. त्यात त्यांनी दोन वेगवेगळ्या अणुकेंद्रकांवर दोन वेगवेगळ्या अवअणु कणांचा मारा करून संयुक्त अणुकेंद्रक तयार होते का हे पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. अनेक आण्विक प्रक्रियांचा अभ्यास करून बोहर यांच्या संकल्पनेला प्रायोगिक आधार पुरविण्यात ते यशस्वी झाले. योगायोगाने या प्रयोगाच्या वेळी त्यांचे मार्गदर्शक हजर नव्हते. तरीही सर्व प्रयोग नियोजित पद्धतीने पार पाडून घोषाल यांनी तो यशस्वी केला. त्यामुळे १९५० मध्ये या प्रयोगाची माहिती देणाऱ्या शोधनिबंधावर त्यांचे एकट्याचे नाव होते. सेगर यांना ऑटप्रोटॉनच्या शोधासाठी १९५९ चा भौतिकशाखाचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला, हे लक्षात घेता एका नोबेल पुरस्कार मिळवण्यास सक्षम व्यक्तीच्या हाताखाली काम करीत असतानाही स्वतंत्र बुद्धीमत्तेने विचार करण्याची क्षमता घोषाल यांनी गमावली नव्हती,
भारतात परतल्यावर प्रा. घोषाल यांनी लखनौ विद्यापीठ, साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स, प्रेसिडेन्सी कॉलेज आणि कोलकाता विद्यापीठ आदी ठिकाणी भौतिक- शाखाच्या अध्यापनाचे कार्य केले. ते प्रेसिडेन्सी महाविद्यालयात शिकवत होते तो काळ या महाविद्यालयाचा व तेथील भौतिकशास्त्र विभागाचा सुवर्णकाळ मानला जातो. ते स्वतः एक उत्तम शिक्षक होते. त्यासोबतच प्रा. ए के रायचौधरींसारखे सहकारी त्यांना लाभले होते. पुढे घोषाल प्रेसिडन्सी कॉलेजचे प्राचार्य बनले आणि शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनात अधिक रस घेऊ लागले. माहिती संचालनालयासारख्या काही. जवाबदान्याही त्यांनी ओढावून घेतल्या होत्या. मात्र, भौतिकशाखाचे अध्यापन हा त्यांचा ध्यास होता. याच ध्यासातून त्यांनी केवळ इंग्रजीच नव्हे तर बांग्ला भाषेतही पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासासाठीची पुस्तके लिहिली. २००७ मध्ये थोड्या आजारपणानंतर त्यांचे निधन झाले.
लेखक :- डॉ. भूपती चक्रवर्ती
(डॉ. भूपती चक्रवर्ती कोलकात्याच्या सिटी कॉलेजचे सेवानिवृत्त भौतिकशास्त्र प्राध्यापक व शिक्षक संघटनेचे सरचिटणीस होते.)
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)