खलिस्तान नावाचा कॅन्सर :- भाग ४
कोरोनारूपी व्हायरसवर यशस्वी विजय मिळवल्यानंतर आता या खलिस्तान रुपी कॅन्सरला आपल्याला धीरोदत्तपणे सामोरे जावे लागणार आहे. या ५ भागांच्या लेखमालेत आम्ही खलिस्तानच्या (khalistan) मानसिकतेचा आणि भिंद्रनवाले, अमृतपाल सिंह यांच्या इतिहासाचे पदर उलगडून सांगणार आहोत..
खलिस्तानच्या निर्मितीसाठी सक्रिय संघटना
१ भिंद्रनवाले/खलिस्तान टायगर फोर्स
‘भिंद्रनवाले टायगर फोर्स’( Bhindranwale Tiger Force) ही १९८४ ला स्थापन झालेली संघटना खलिस्तानच्या निर्मितीसाठी १९८७ ते १९९७ दरम्यान सक्रिय होती. त्यांनी १९९१ मध्ये लुधियानामध्ये भारत सरकारशी शांततेच्या वाटाघाटी केल्या होत्या. त्यावेळी चंद्रशेखर हे पंतप्रधान होते. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी ‘आयएसआय’च्या मदतीने या वाटाघाटी उधळून लावायचा प्रयत्न केला होता.
२. बब्बर खालसा
बब्बर खालसा (Babbar Khalsa) या संघटनेवर भारतात बंदी आहे. दि. २३ जून, १९८५ ला कॅनडाच्या मोंट्रेयलहून दिल्लीला येणार्या ‘एअर इंडिया फ्लाईट १८२’ ला या संघटनेने बॉम्बने उडवले. त्याच दिवशी न्यू टोकियो नारिता इंटरनॅशनल एअरपोर्टवर एका बॅगेमध्ये बॉम्बस्फोट घडवला, तर २००७ रोजी लुधियाना तेथे सिंगार सिनेमा कॉम्प्लेक्स त्यांनी उडवले.विशेष म्हणजे, त्यासाठी पाकिस्तानात तीर्थयात्रेसाठी जाऊन शस्त्रे आणि प्रशिक्षण मिळवून बिकानेरहून सीमा ओलांडून आले होते.
पंजाबमध्ये अमृतपाल सिंग यांच्यावर कारवाईचा निषेध म्हणून लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर तिरंग्याचा अवमान करणारा खलिस्तानी समर्थक अवतार सिंग खांडा याला अटक करण्यात आली आहे. खांडा हा प्रतिबंधित गट बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) चा सदस्य आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये सुरू असलेल्या तपासात खांडा हा दुसरा कोणी नसून अमृतपालचा हस्तक असल्याचेही समोर येत आहे.
३. खलिस्तान कमांडो फोर्स (khalistan commando force)
स्वतंत्र खलिस्तानचे ध्येय बाळगणार्या या संघटनेने पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियंतसिंग यांची हत्या केली. म्हणून या संघटनेवरभारत सरकारने बंदी घातली आहे. तसेच ‘खलिस्तान कमांडो फोर्स’नेच पुण्यामध्ये जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या घडवून आणली होती.
४. खलिस्तान लिबरेशन फोर्स
स्वतंत्र खलिस्तानसाठी सशस्त्र कारवायांसाठी १९८६ साली या संघटनेची स्थापन करण्यात आली. काश्मीरच्या दहशतवाद्यांसह हातमिळवणी करून भारतातील लष्करी ठिकाणांवर या संघटनेने हल्ले केले होते.त्याच्याशी संलग्न असणार्या ‘खलिस्तान लिबरेशन आर्मी’ यांनी दि. १२ डिसेंबर, १९८७ रोजी नऊ पंजाब पोलिसांना ठार केले. जुलै १९९० मध्ये चंदिगढला पोलीस स्टेशनचा भाग यांनी स्फोटात उडवून लावला, पंजाब सरकारमधील मंत्री बलवंत सिंग यांची १९९० मध्ये हत्या केली, आठ रेल्वे पोलिसांचीही हत्या केला आणि ‘डेरा सच्चा सौदा’च्या प्रमुखांवर २००८ मध्ये हल्ला घडवून आणला. पंजाबच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख रुल्डा सिंग यांचीही हत्या केली. तसेच १९८४च्या शीखविरोधी दंगलीतील मुख्य आरोपी डॉ. बुध प्रकाश कश्यप यांची हत्या अशा विविध हिंसक कारवाया घडवून आणल्या. तसेच पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स’ने ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’च्या हरमिंदर सिंग मिंटोची मदत घेतली होती. गृहमंत्रालयानुसार ही ४०वी खलिस्तानी संघटना आहे, ज्यावर बंदी घातली गेली.
५. सिख्स फॉर जस्टीस ( Sikhs for Justice (SFJ))
अमेरिकास्थित हा गट भारतातून पंजाबने स्वतंत्र व्हावे आणि खलिस्तानची निर्मिती व्हावी, यासाठी २००७ लागुरपतवंत सिंग पन्नू यांनी ‘एनजीओ’ बिगर सरकारी संस्था म्हणून स्थापन केली. त्याला जुलै २०२० ला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित केले आहे. त्यांनी २०१९ मध्ये त्यांनी स्वतंत्र पंजाबसाठी सार्वमत घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले, म्हणून त्यांच्यावर बंदी घातली गेली. यांना पाकिस्तानच्या ‘आयएसआय’द्वारे पैसा पुरवला जातो. ‘कर्तारपूर कॉरिडोर’चा वापर ‘रेफरेंडम २०२०’साठी करून घेतला होता. भारतीय लष्करातील शीख सैनिकांनी उठाव करण्यासाठी त्यांना भडकावणे आणि काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे देशविरोधी उद्योगही या संघटनेने वेळोवेळी केले.
भारताच्या ‘एनआयए’ने या संघटनेवर खटला दाखल केलेला होता. तसेच २०२०च्याशेतकरी आंदोलनातसुद्धा त्यांचा सहभाग होता. खलिस्तान समर्थक ४० संकेतस्थळांवर जुलै २०२० मध्ये भारताने बंदी घातली. त्यांच्या विरोधात ‘इंटरपोल’ने ‘रेड कॉर्नर नोटीस’ बजावली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये या संस्थेची सदस्य महिला मलेशियात ‘आयएसआय’च्या काही सदस्यांसह स्थानिक राजकीय नेत्याच्या हत्येच्या कट प्रकरणी पकडली गेली.‘सिख्स फॉर जस्टीस’ने नवा खलिस्तानचा नकाशा ऑक्टोबर २०२१ प्रसिद्धदेखील केला होता. त्यात केवळ पंजाबच नाही, तर हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थानचे काही जिल्हे आणि उत्तर प्रदेशचा काही भाग समाविष्ट केल्याचे दिसून येते. त्यावर नेटीझन्सनी बरीच टीका केली होती.
६. खलिस्तान जिंदाबाद फोर्स (khalistan zindabad force)
शिखांसाठी स्वतंत्र खलिस्तानसाठी निर्माण करण्यासाठी सक्रिय असणार्या या दहशतवादी संघटनेवर २०१८पासून बंदी आहे. २००९ मध्ये ऑस्ट्रियातील व्हिएन्नातील गुरुद्वारा रविदासवर हल्ला केला होता. ज्यात ‘डेरा साच खंड’चे प्रमुख रामा नंद ठार झाले होते.
https://www.lokmat.com/national/khalistan-commandos-arrested-terrorists/