खलिस्तान नावाचा कॅन्सर :- भाग ५

कोरोनारूपी व्हायरसवर यशस्वी विजय मिळवल्यानंतर आता या खलिस्तान रुपी कॅन्सरला आपल्याला धीरोदत्तपणे सामोरे जावे लागणार आहे. या ५ भागांच्या लेखमालेत आम्ही खलिस्तानच्या (khalistan) मानसिकतेचा आणि भिंद्रनवाले, अमृतपाल सिंह यांच्या इतिहासाचे पदर उलगडून सांगणार आहोत..
पंजाब मध्ये धर्मांतर( conversion) जोरात
ख्रिश्चन मिशनर्यांवर( christian missionaries ) दीर्घकाळापासून देशात धर्मांतराचे आरोप होत आहेत. पूर्वी देशातील दुर्गम आणि आदिवासीबहुल राज्यात धर्मांतराच्या बातम्या येत होत्या, आता पंजाबसारख्या समृद्ध राज्यात शीखांच्या धर्मांतराच्या बातम्या येत आहेत. अकाल तख्तने आरोप केला आहे की, मिशनरी सीमावर्ती गावांमध्ये शीखांना ख्रिश्चन बनवत आहेत. अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग म्हणतात की ख्रिश्चन मिशनरी सीमावर्ती गावांमध्ये शीख कुटुंबांचे जबरदस्तीने धर्मांतर करत आहेत. शीख समुदायातील अनेकांना पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप जथेदारांनी केला आहे.

पंजाबमध्ये( Punjab) शीख धर्म जाती आणि उच्च-नीच न मानण्याबद्दल बोलतो. परंतु धार्मिक शीख आणि वाल्मिकी हिंदू समुदायातील अनेक दलितांनी सन्माननीय जीवन आणि चांगल्या शिक्षणाच्या आशेने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. याचे कारण जाट शिखांचा छळ असल्याचे मानले जाते. जाट शीख धर्मीय शिखांना आपल्या बरोबरीचे मानत नाहीत. त्यामुळे धार्मिक शीख आणि वाल्मिकी हिंदू ख्रिश्चन धर्माकडे वाढत आहेत. १९८० आणि १९९० च्या दशकात तमिळनाडूसारख्या राज्यांमध्ये जे घडले होते त्याचप्रमाणे पंजाबमध्ये ख्रिस्ती धर्म वाढत आहे. गुरुदासपूरमधील अनेक गावांच्या छतावर छोटी चर्च उभारली जात आहेत.

युनायटेड ख्रिश्चन फ्रंटच्या( United Christian Front ) म्हणण्यानुसार पंजाबमधील १२००० गावांपैकी ८००० गावांमध्ये ख्रिश्चन समित्या आहेत. अमृतसर आणि गुरुदासपूर जिल्ह्यात चार ख्रिश्चन समुदायांची ६००-८०० चर्च आहेत. त्यापैकी ६०-७० टक्के गेल्या पाच वर्षांत अस्तित्वात आले आहेत.
कोणत्याही शीख व्यक्तीला पाहून तुम्ही अंदाज लावू शकत नाही की त्याने शीख धर्म सोडला आहे. कारण ख्रिश्चन धर्माने पगडीपासून अनेक सांस्कृतिक चिन्हे स्वीकारली आहेत. तुम्हाला YouTube वर पंजाबीमध्ये ख्रिश्चन गिद्धा (लोकनृत्य), टप्पे (संगीताचा एक प्रकार) आणि बोलियां (दोहे गाणे) आणि येशूची प्रार्थना गाणी सहज सापडतील. ग्रामीण पंजाबी गेटअपमध्ये अनेक स्त्री-पुरुष गाताना,नाचताना दिसतील.
शीख धर्म स्वीकारल्यानंतरही काही लोक आपली पगडी सोडत नाहीत. ते म्हणतात, ‘कपडे कोणाचा धर्म ठरवत नाहीत. मी लहानपणापासून पगडी घालतो. मी ख्रिश्चन आहे हे आता का काढून टाकावे? हा माझ्या ओळखीचा एक भाग आहे.’ राज्यातील बहुसंख्य ख्रिश्चन मंडळी ‘मसीह‘ हे आडनाव वापरतात, परंतु अनेकांनी त्यांची आडनावे बदललेली नाहीत.
नाव न बदलण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे दलितांना उपलब्ध असलेल्या आरक्षणाचा फायदा घेणे, जे धर्मांतराच्या बाबतीत त्यांना मिळू शकत नाही. हेच कारण आहे की पंजाबमधील बहुसंख्य ख्रिश्चन लोकसंख्या जनगणनेतील आकडेवारीच्या बाहेर राहते, ज्यामुळे या लोकसंख्येला राज्याच्या राजकारणात पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही.

ख्रिश्चन मिशनरी शीख कुटुंबातील आणि अनुसूचित जातीतील शीखांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी अनेक मोठे कार्यक्रम राबवत आहेत. पंजाबच्या सीमावर्ती भागात हा कार्यक्रम राबवला जात आहे. शीख कुटुंबांना ख्रिश्चन होण्यासाठी दबाव आणण्यासाठी मिशनरी पैसा आणि इतर सर्व हातखंडे वापरत आहेत.
निरपराध शीखांचे बळजबरीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करणे हा शीख समुदायाच्या अंतर्गत बाबींवर थेट हल्ला आहे आणि हे खपवून घेतले जाणार नाही, असा आरोप अकाल तख्तच्या जथेदारांनी केला. याप्रकरणी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडे (Shiromani Gurdwara Parbandhak Committee.) अनेक तक्रारीही आल्या आहेत. एसजीपीसीने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आहे.
‘शीख अस्मिता’
पंजाबमधील दहशतवाद शीख धर्माच्या अस्मितेसाठी होता आणि आता त्याला पुन्हा पेटवले गेले आहे. शीखांचे वेगळे राष्ट्र हवे, कारण भारतात शीख सुरक्षित नाहीत, अशी भावना तीव्र होती. शीख आणि हिंदू वेगळे आहेत, हे वारंवार पटवून देण्यात आले. त्यासाठी शिखांनी आपल्या धार्मिक चिन्हांचा, प्रतीकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. ‘शीख अस्मिता’ ही देशापेक्षा वरचढ ठरवली गेली.
यासारखी कारणे पाहता हा धार्मिक दहशतवाद होता यात शंका नाही. शिवाय त्याला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची मदत होती. भारतापासून जितके घटक फुटून वेगळे होतील, तितके ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला स्वतःचे यश वाटते. कारण, ‘अखंड हिंदुस्थान’ तयार होऊ न देणे हेच त्याचे ध्येय आहे.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा झाला. त्यासाठी भारताने मदत दिली होती. याचा प्रतिशोध,बदला घेण्याची एकही संधी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान अजूनही सोडत नाही. खलिस्तानच्या रुपात ही मोठी संधी त्याला सातत्याने खुणावत असते. ‘नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी’ (NIA ) ने गुज्जरसिंग निज्जारला डिसेंबर २०२० मध्ये अटक केली. खलिस्तानवादी संघटनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तो सोशल मीडियावर सक्रिय झाला होता.
खलिस्तानची मागणी करणे म्हणजेच मुळात देशाच्या सुरक्षेला बाधा आणणे आहे. केवळ धार्मिक तेढ वाढवून आणि स्वतंत्र धार्मिक अस्मिता भडकावून देशाचे तुकडे करणारे घटक यात सक्रिय आहेत. याला सामान्य जनतेचा पाठिंबा कधीच नव्हता. पंजाबचे भू-राजकीय स्थान देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासाठी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला तेथे अस्थैर्य असणे हिताचे आहे म्हणून खलिस्तानचे मृगजळ दाखवून शीख जनतेला फसवले जाते.
समृद्ध पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या आहारी जाणारी तरुण पिढी हे फार मोठे आव्हान आहे. अफगाणिस्तान-इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला अमली पदार्थांचे मार्केट, पैसा आणि भारताचे तुकडे पडणे यात स्वारस्य आहे.परदेशात शीख तरुणांना यात फसवून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान भारताला पोखरतो आहे.

आपल्या धर्मासाठी बलिदान देणारा शिखांचा इतिहास जगाला ठाऊक आहे, मी काय वेगळे सांगणार. ज्या इस्लामी शासकांनी हालहाल करून शिखांच्या धर्मगुरूंना ठार केले होते, त्यांचेच वंशज जणू आधुनिक काळात वावरत आहेत. दुर्दैवाने शीख समाजातील काही तरुणांना त्याचा विसर पडलेला दिसतो. राष्ट्रासाठी बलिदान देणारे, धर्मासाठी त्याग करणारे शीख अशी ओळख पुसून स्वतंत्र खलिस्तानसाठी दहशतवादी बनलेले शीख असा प्रवास इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमार्गे चालू आहे. विशेष म्हणजे, या नव्या खलिस्तानच्या नकाशात कर्तारपूरचा, नानकाना साहिब ( गुरु नानक यांचा जन्म झाला ते ठिकाण ) समावेश नाही. कारण, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला अखंड ठेवून भारताचे तुकडे करू पाहणारी ‘आयएसआय’(ISI) यामागे आहे.
मुळात हा अमृतपाल आहे कोण, त्याला कोण मदत करतो, त्याला कोणाचा पाठिंबा आहे, त्याला कसे रोखायचे याची धोरणे भारताच्या धोरणकर्त्यांनी राबविली पाहिजेत. राजकीय आणि धार्मिक संघटनांनी मात्र संयम ठेवला पाहिजे. नाही, तर प्रत्यक्षात अजूनही वास्तवात येण्याची शक्यता नसलेल्या खलिस्तान या फुटिरतावादी चळवळीचे भूत आपल्या मानगुटीवर पुन्हा बसेल आणि त्याची किंमत संपूर्ण राष्ट्राला मोजावी लागेल,यात शंका नाही..
( समाप्त )
संदर्भ :-
https://www.mahamtb.com/Encyc/2022/1/1/Article-on-The-return-of-Khalistani-terrorism-to-Punjab.html
https://bolbhidu.com/kps-gill-was-supercop-who-dealt-with-khalistan-movement/
https://www.tarunbharat.net/Encyc/2023/2/24/Who-is-Amritpal-Singh.html#
https://www.thehindu.com/news/national/amritpal-singh-a-radical-preacher/article66553973.ece