सावध ताई सावध ग
करील कुणी अब्दुल पारध ग…

लव्ह जिहादला बळी पडलेल्या चिपळूणच्या दुर्दैवी निकिता कांबळेची करुण कहाणी…
महाराष्ट्र विधानसभेच्या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदनामध्ये “लव्ह जिहाद” (love jihad) या विषयावर साधकबाधक चर्चा झाली…
मात्र काही सन्माननीय सदस्यांनी “लव्ह जिहाद” ही काल्पनिक संकल्पना असून असा कोणताही जिहाद अस्तित्वात नसल्याचे आश्चर्यकारक तर्कट मांडले… सोशल मीडियावर तशा आशयाच्या पोस्ट देखील टाकल्या…
अर्थात लव्ह जिहादच्या व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्या कुटुंबात होईपर्यंत त्याची जीवघेणी तीव्रता हिंदू समाजाला जाणवत नाही…
अशाच सन्माननीय सदस्य तसेच पुरोगामी, लिब्रल्स, डावे आणि निवडक सेक्युलर पत्रकारांसाठी नुकतीच चिपळूण येथे घडलेली… निकिता अशोक कांबळे (२५ वर्षे) या दुर्दैवी हिंदू तरुणीची हृदय पिळवटून टाकणारी ही करुण कहाणी… “लव्ह जिहाद” च्या व्हायरसची लागण झालेल्या हिंदू तरुणींची ससेहोलपट करतो याचे अजून एकदा प्रत्यंतर देते…

नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या निकिता कांबळेचे मसूद या मुसलमान तरुणावर प्रेम जडले… परंतु लग्नानंतर आपल्याला आपला प्राणप्रिय हिंदू धर्म बदलून मुसलमान व्हावे लागेल या भीतीपोटी अनुसूचित जातीत (चर्मकार) जन्मलेल्या निकिता कांबळेने लग्नास नकार दिला…
आणि लव्ह जिहादच्या मोडस ऑपरेंडी (Modus Operandi) प्रमाणे आश्वासनाचे पहिले जाळे निकिता कांबळेवर फेकण्यात आले की… लग्नानंतर मुस्लिम रीतीरिवाज पाळण्यासाठी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करण्यात येणार नाही… मसूदच्या या आश्वासनाला बळी पडून निकिता कांबळे विवाहाला तयार झाली… मात्र झाला तो निकाह होता… वधू आणि वर दोघेही मुसलमान असतील तरच निकाह होऊ शकतो… कळत नकळत ३१ डिसेंबर २०१८ रोजी चि. सौं.का. निकिता कांबळे आता फलक मसूद शाह झाली… या निकाहने व्यथीत झालेल्या निकिता कांबळेच्या माहेरच्यांनी तिच्याशी सगळे संबंध तोडून टाकले होते… मात्र निकिता कांबळेचा “मेरा अब्दुल ऐसा नही है” या फसव्या सिद्धांतावर अपरंपार विश्वास होता आणि तिथेच घात झाला… सावज लव्ह जिहादच्या सापळ्यात पुरते अडकले होते…
मसुदने निकाह नंतर सगळ्यात आधी काय केले असेल तर ते म्हणजे… निकिता कांबळेचे पुढील शिक्षण बंद करून टाकले…

पुढे निकिता गरोदर राहिल्यानंतर तिचे आईशी बोलणे चालणे सुरू झाले… आता सावज अगतिक झाले होते… लव्ह जिहादच्या मोडस ऑपरेंडी प्रमाणे निकिता कांबळे सासरच्यांसाठी दुभती गाय झाली होती… माहेरशी संबंध सुधारल्यामुळे माहेरहून पैसे आणण्यासाठी निकिता कांबळेच्या मागे तगादा आणि मानसिक छळ सुरू झाला… तिला तिच्या माहेरच्या हिंदू धर्मातील जातीवरून अत्यंत अश्लील भाषेतील अपमानास्पद बोलणी खावी लागत होती… सासू आणि दोन जावा तिचे जगणे असहाय्य करत होत्या… कदाचित पैसे दिल्यास आपल्या मुलीचा छळ थांबेल या भाबड्या आशेपोटी निकिता कांबळेच्या आईने कर्ज काढून निकिताच्या सासरच्यांच्या उरावर १४ लाख रुपये घातले… मात्र लव्ह जिहादच्या षडयंत्राची सुतराम कल्पना नसलेल्या निकिता कांबळेच्या माहेरच्यांची आशा अपेक्षेप्रमाणे फोल ठरली…
बदल्यात मसूद निकिता कांबळेच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला… त्यावरून तिला बेदम मारहाण होऊ लागली…
आता निकिता कांबळेच्या सासरच्यांनी पुढील पैशासाठी मोर्चा निकिता कांबळेच्या आजीकडे वळवला… तुला तुझ्या हिंदू धर्मातील अनुसूचित जातीतून मुसलमान या “पाक” धर्मात घेतल्याची किंमत तुला चुकवावीच लागेल… असे सांगत पुढील पैशांची मागणी केली जात होती… त्यासाठी वारंवार निकिता कांबळेच्या हिंदू धर्मातील अनुसूचित जातीचा अर्वाच्च भाषेत उद्धार केला जात होता… “जय भिम जय मिम” च्या अत्यंत फसव्या घोषणेच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या जात होत्या…
लव्ह जिहादच्या सुनियोजित कार्यपद्धतीप्रमाणे आता निकिता कांबळे सासरच्या नराधमांसाठी ATM ठरली होती… निकिता कांबळेच्या आजीकडून या वीरप्पन गॅंगने १ लाख रुपये उकळले… पण त्यांचे समाधान होईल तर कसले… निकिता कांबळेच्या आजोबांकडून त्यांनी १ लाख रुपये कर्जाऊ म्हणून घेतले… अर्थात हे कर्ज परत न करण्यासाठीच होतं हे वेगळे सांगायलाच नको… दरम्यानच्या काळात निकिता कांबळेचा जातीवाचक शिवीगाळ करून प्रचंड अपमान आणि छळ करणे चालूच होते…
आता ATM मध्ये जवळपास खडखडाट झाला होता… मग काय… निकिता कांबळे नावाच्या भाकड गाईचा पती, सासू, दीर, जावा सगळ्यांनी मिळून अतोनात मानसिक छळ करायला सुरुवात केली… अगदी आजारी असलेल्या आईला भेटण्यासाठी पुण्यात जाण्यास देखील तिला मनाई करण्यात आली…
आणि शेवटी एक दिवस मसुदने आपल्याच… दोन अपत्य असलेल्या बेगमला… त्यांच्या दृष्टीने भाकड गाईला… फलक उर्फ निकिता कांबळेला काठीने बेदम मारहाण करून २३ डिसेंबर २०२२ रोजी घरातून एकटीला हाकलून दिली… त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे… प्रकरण सूटकेस ऐवजी काठीवरच निभावले… अजून एक आपली हिंदू भगिनी… श्रद्धा वालकर होता होता बचावली…
बी.ए. पर्यंत शिक्षण झालेल्या निकिता कांबळेने सासरच्या मंडळी विरुद्ध चिपळूण पोलीस स्थानकात लिखित फिर्याद गुदरली आहे…
भारताची न्यायव्यवस्था निकीता कांबळेला न्याय देईल तेव्हा देईल… मात्र…
“लव्ह जिहाद” ने निकिता कांबळेच्या आयुष्याची माती केली… तिचा टाहो “लव्ह जिहाद” अस्तित्वातच नाही म्हणून बेशरम तर्कट मांडणाऱ्या अवसान घातक्यांच्या आणि “मेरा अब्दुल ऐसा नहीं है” म्हणणाऱ्या हिंदू भगिनींच्या काळजाला जाऊन भिडावा हीच अपेक्षा…

