
ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास..
ब्रिटनची सद्यस्थिती
लंडन, बर्मिंगहम, ब्रॅडफर्ड, ग्लास्गो(glasgow), मँचेस्टर, रॉशडेल, ड्यूसबरी या आणि अशा अनेक शहरांमधली हजारो मुस्लिम कुटुंबं बँका ते हॉस्पिटल आणि किराणासामान ते टॅक्सी अशा रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा या मूळ ब्रिटिश (britain) लोकांशी महिनोंमहिने कुठल्याही प्रकारचा संबंध न ठेवताही सहजपणे उपभोगू शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण मुस्लिमांची हलाल पासून ते बँकिंग, किंवा डेटिंग अप्स पर्यंत अशी स्वतंत्र आणि समांतर अशी अर्थव्यवस्था त्यांनी उभी केली आहे. इजिप्त, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये कदाचित नसेल इतकं मदरश्यांचं पेव ब्रिटनमध्ये फोफावतंय! शाळा, उपाहारगृह, बँका, अन्नपदार्थ, टीव्ही वाहिन्या या सगळ्या सगळ्या अधिकाधिक ‘इस्लामी‘ बनण्याचा प्रयत्न करतायत. मदरसे, मशिदींना अधिकाधिक आर्थिक मदती केल्या जातायत, त्यांना अजून जास्त करसवलती दिल्या जातायत.

लंडनच्या (london) शाळाशाळांमध्ये इस्लामचं अंधप्रेम आणि अन्यधर्मीय (काफर) विद्यार्थ्यांविषयी कमालीच्या द्वेषाने भरलेलं वातावरण असतं. मुस्लिम पालक आपल्या पाल्यांना शाळेतल्या नाताळाच्या कार्यक्रमात भाग घेऊ देत नाहीत. अक्षरशः पाच वर्षांच्या मुलींना सक्तीने हिजाब बांधून शाळेत पाठवलं जातं. त्यांना त्यांच्या हिंदू मित्र-मैत्रिणींशी खेळायला मज्जाव केला जातो कारण इस्लामच्या मते हिंदू वाईट/अस्वच्छ असतात. पोहणे किंवा अन्य कुठल्याही मैदानी खेळांमध्ये मुस्लिम मुलींनी भाग घेण्यास पालकांचा सक्त विरोध असतो.

नाताळच्या वेळी म्हणण्यात येणाऱ्या गाण्यांच्या कार्यक्रमात मुस्लिम विद्यार्थ्यांनी भाग घेऊ नये अशा सक्त सूचना तर त्यांचे पालक करतातच पण चुकूनही ती गाणी कानांवर पडू नयेत म्हणून गाणी चालू असताना दोन्ही कानांमध्ये बोटं घालून बसण्याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते. यातल्या कुठल्याही प्रकाराला शिक्षक आक्षेप घेत नाहीत किंवा घेऊ शकत नाही. कारण तसं केल्यास त्यांना जातीयवादी किंवा इस्लामविरोधक (Islam) ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळे हे प्रकार शांतपणे बघत बसण्याव्यतिरिक्त त्यांना काहीही करता येत नाही.
या असल्या प्रकारच्या वातावरणात ब्रिटनची पुढची पिढी वाढते आहे. अर्थात ती ही आत्ताच्या पिढीएवढीच किंबहुना अधिकच कट्टर आणि कडवी होणार हे नक्की. सन २०२० मध्ये ब्रिटिश सुरक्षा यंत्रणेने घोषित केलं की ते किमान त्रेचाळीस हजार संशयित अतिरेक्यांवर नजर ठेवून आहेत आणि त्यातले ९०% हे मुस्लिम आहेत.

भविष्य
एकूण चित्र फार विदारक आहे. सुरुवातीच्या काही शतकांमध्ये तलवारींच्या जोरावर रक्तपात करत जगभर पसरलेल्या इस्लामला रक्तविहीन क्रांती करण्याचा, संपूर्ण जगाचं रूपांतर ‘दार उल इस्लाम’ अर्थात इस्लामची भूमी म्हणून करण्याचा एक अतिशय सोपा आणि तितकाच प्रभावी असा मार्ग सापडला आहे. ते त्यांच्या मार्गाने अविरतपणे चालतायत. प्रश्न हा आहे की जग डोळे उघडणार आहे का? या अक्राळविक्राळ जागतिक समस्येवर उपाय शोधणं ही तर पुढची बाब झाली पण आधी ही समस्या अस्तित्वात आहे हे तरी आपण मान्य करणार आहोत का? आपल्या उत्तरावर आपला आणि आपल्या पुढच्या पिढीचा भविष्यकाळ अवलंबून आहे हे नक्की!
लेखक :- हेरंब ओक
(समाप्त )