अर्बन नक्षल आणि १० मूलभूत प्रश्न
प्रश्न 1:-
शहरी भागात माओवादी आहेत का?
सशस्त्र माओवादी( maovadi) जंगल भागात काम करतात, सुरक्षा दल आणि निष्पाप सामान्य लोकांविरुद्धचा त्यांचा हिंसाचार सर्वांनाच ज्ञात आहे, पण माओवादी संघटनेचे दोन भाग आहेत, जंगलात आढळणारा सशस्त्र माओवादी आणि दुसरा शहरात आढळणारा अर्बन नक्षल (urban naxals) म्हणजे असे माओवादी जे शहरांमध्ये कार्यरत आहेत.
प्रश्न २ :-
अर्बन नक्षल / माओवादी अस्तित्वात आहेत असे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो?
माओवाद्यांच्या कागदपत्रांमध्ये शहरी माओवाद्यांबद्दल ( अर्बन नक्षल) सर्व काही स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यांनी त्यांच्या शहरी कामासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील तयार करण्याचा प्रयत्न फार पूर्वीपासून केला आहे. मुख्य दस्तऐवज त्यांचे परिपत्रक आहे, ‘शहर आणि शहरे: आमचा कार्यक्रम आणि संस्था’ हे परिपत्रक आंध्र प्रदेश राज्य समितीने १९७३ मध्ये प्रथम प्रकाशित केले होते. या परिपत्रकाचे नंतर पुनरावलोकन करण्यात आले, ‘आमच्या दस्तऐवजाचे पुनरावलोकन ‘शहरांमध्ये काम करण्याची पद्धत’ हे पुनरावलोकन पीपल्स वॉर ग्रुप (people’s war group) द्वारे १९९५ मध्ये प्रकाशित केले गेले. भारतीय क्रांतीचा ‘शहरी भागात काम’ या शीर्षकाखाली एक संपूर्ण स्वतंत्र प्रकरण आहे. सीपीआय (cpi) ने एक वेगळा दस्तऐवज ‘शहरी दृष्टीकोन’ तयार केला आहे ज्यात शहरी माओवाद्यांच्या कार्याबद्दल तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत.
शहरी माओवाद्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहेत..
प्रश्न ३:-
माओवाद्यांना नेमके काय साध्य करायचे आहे?
माओवादी दस्तऐवज ‘द स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्होल्यूशन’ मध्ये त्यांची उद्दिष्टे आणि कर्तव्ये अतिशय स्पष्टपणे नमूद आहेत.
“सशस्त्र बळाद्वारे राजकीय सत्ता ताब्यात घेणे, युद्धाद्वारे प्रत्येक समस्येवर तोडगा काढणे हे माओवाद्यांचे मुख्य कार्य आहे” :- माओ त्से तुंग.
” भारतीय लष्कर, पोलीस यांचा विध्वंस करून माओवादी राज्ययंत्रणेची स्थापना करून संपूर्ण नोकरशाहीआपल्या ताब्यात घेणे, हे माओवाद्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे
माओवाद्यांना संपूर्ण लोकशाही व्यवस्था नष्ट करायची आहे आणि हिंसक मार्गाने राजकीय सत्ता काबीज करायची आहे आणि त्यासाठी त्यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारलेले आहे.
निदान आता तरी माओवाद्यांना नेमके काय साध्य करायचे आहे याबाबत आता शंका नसावी.
प्रश्न ४ :-
शहरी माओवाद्यांचे (अर्बन नक्षल) नेमके काम काय?
‘अर्बन पर्स्पेक्टिव्ह’ या माओवादी दस्तऐवजात शहरी माओवाद्यांचे कार्य स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्या प्रमाणे “क्रांतीचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे शहरे,शत्रूंचे मुख्य सैन्य तळ आपल्या ताब्यात घेणे हे उद्दिष्ट शहरांमध्ये काम केल्याशिवाय साध्य होऊ शकत नाही”.
अर्बन नक्षलींना जनसंघटना तसेच प्रचंड आंदोलने निर्माण करण्याचे काम दिले जाते. जंगलातील सशस्त्र माओवाद्यांना केडर, नेते, शस्त्रे, दारुगोळा, औषधे, विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सर्व प्रकारची लॉजिस्टिक सहाय्य प्रदान करणे हे अर्बन नक्षलींचे प्रमुख कर्तव्य आहे.यामध्ये सशस्त्र माओवादी (People’s Liberation Guerrilla Army:PLGA) प्रमुख भूमिका निभावतात आणि शहरी माओवादी PLGA ला सहाय्यक भूमिका बजावतात.
प्रश्न ५ :-
शहरी माओवादी (अर्बन नक्षल) प्रत्यक्षात कसे काम करतात?
अर्बन नक्षल त्यांची माओवादी अशी ओळख लपवतात. ते बुद्धिजीवी, कार्यकर्ते इत्यादी म्हणून काम करत राहतात, शहरी दृष्टीकोन दस्तऐवजात असे म्हटले आहे की, “विविध संघटनांमधील कॉम्रेडची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे म्हणूनच भूमिगत संघटनेशी संपर्क कमीत कमी राखला पाहिजे.”
जनतेशी संवाद करून त्यांना संघटित करणे हे शहरी माओवाद्यांचे काम आहे. ते स्वतःच्या संघटना तयार करतात किंवा इतर संघटनांमध्ये घुसखोरी करतात.
प्रश्न 6:–
शहरी माओवादी कोणत्या सामाजिक क्षेत्रात काम करतात?
अर्बन नक्षल समाजाच्या जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये काम करतात. ते कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला, मध्यमवर्गीय कर्मचारी, विचारवंत, वंचित, वनवासी, धार्मिक अल्पसंख्याक इत्यादींना सोबत घेऊन काम करतात.
हे शहरी माओवादी नेहमीच पोलिस, निमलष्करी दल आणि सशस्त्र दलांमध्ये स्वतःचे नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करतात. शहरी माओवाद्यांचे अंतिम उद्दिष्ट त्यांच्या प्रभावक्षेत्रातील सर्व सामाजिक विभागांवर आपले अधिपत्य स्थापन करणे हे आहे.
प्रश्न ७ :-
शहरी माओवादी संघटनांचे विविध प्रकार कोणते आहेत?
हे शहरी माओवादी विविध प्रकारांद्वारे कार्य करतात त्यांचे राजकीय आणि संघटना यांचे संचालन तीन प्रकारच्या संस्था करतात:-
1) गुप्त क्रांतिकारी जनसंघटना
२) खुली क्रांतिकारी जनसंघटना
3) खुली कायदेशीर जनसंघटना जी पक्षाशी थेट जोडलेली नसते.
या तिसर्या प्रकारची जनसंघटना पुढे 3 मोठ्या श्रेणींमध्ये विभागली गेल्या आहेत.
अ) फ्रॅक्शनल वर्क
b) बचावात्मक संघटना
c) कायदेशीर लोकशाही संघटना.
प्रश्न 8 :-
फ्रॅक्शनल वर्क म्हणजे नक्की काय?
फ्रॅक्शनल वर्क म्हणजे माओवादी पक्ष शहरी भागातील इतर असंख्य गैर-माओवादी संघटनांद्वारे काम करतो. पक्ष आपल्या सदस्यांमार्फत अशा गैर-माओवादी संघटनांमध्ये घुसखोरी करतो. एकदा त्यांनी एखाद्या संघटनेत प्रवेश केला की, ते त्यात आघाडीचे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ते माओवादी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्या संघटनेवर आपले नियंत्रण ठेवू शकतील किंवा मार्गदर्शन करू शकतील. शहरी दृष्टीकोन दस्तऐवजात स्पष्टपणे नमूद केले आहे की, “आयोजित करण्याची ही पद्धत, योग्यरित्या आयोजित केल्यास, दीर्घ कालावधीसाठी कव्हर कामासाठी सर्वोत्तम संधी देते. अशी संधी सर्व शहरी भागात वापरली जावी आणि आम्ही पक्षाशी संबंध उघड न केल्यास आम्ही राज्य सैन्याकडून कोणत्याही दडपशाहीचा सामना न करता कार्य करू शकतो.”
वाचकांनी हे समजून घेतले पाहिजे की माओवादी फ्रॅक्शनल वर्क हे शहरी माओवादी केडरद्वारे केले जाणारे सर्वात धोकादायक प्रकारचे काम आहे. शहरी माओवादी ओळखणे, उघड करणे आणि त्यांच्यावर खटला चालवणे अत्यंत अवघड आहे.
प्रश्न ९ :-
शहरी माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा यंत्रणा काय करत आहेत?
सुरक्षा एजन्सी माओवाद्यांच्या नागरी केडरच्या कामांवर सतत लक्ष ठेवून असतात. ते त्यांच्याबद्दलचा डेटा संकलित करत असतात, त्यांचे शहरी नेटवर्क आणि जंगलातील सशस्त्र माओवाद्यांशी त्यांचे संबंध यावर करडी नजर ठेवून असते. शहरी माओवादी त्यांची खरी माओवादी ओळख उघड न करता अतिशय गुप्त पद्धतीने काम करतात. त्यांना अटक करणे आणि न्यायालयीन खटल्यांमध्ये त्यांचे दोषी सिद्ध करणे अत्यंत कठीण आहे. असे असतानाही, महाराष्ट्र पोलिसांना 4 सर्वोच्च शहरी माओवादी केडरना दोषी ठरवण्यात यश आले आहे आणि सुमारे डझनभर शहरी माओवादी केडर खटला प्रलंबित असल्याने अजूनही तुरुंगात आहेत.
शहरी माओवाद्यांच्या धोकादायक कारवायांना आळा घालण्यासाठी नवीन कडक कायदे तयार करणे आवश्यक आहे.
प्रश्न 10: —
शहरी माओवाद्यांच्या विरोधात सामान्य माणूस काय करू शकतो?
सामान्य नागरिकांनी प्रथम शहरी माओवाद्यांचा धोका समजून घेतला पाहिजे आणि माओवाद्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सुरक्षा दलांशी सहकार्य केले पाहिजे. सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी या विषयाचा अभ्यास करून जनमानसात प्रबोधन केले पाहिजे. माओवादी पक्षासह सर्व दहशतवादी संघटनांची मुळे समाजात आहेत, ज्या क्षणी संपूर्ण समाज माओवाद्यांच्या विरोधात जाईल, त्या क्षणी त्यांचा अंत होईल.
सामान्य माणसाने त्यांच्या सामाजिक संघटनांमार्फत जनसंवेदना कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात माओवादविरोधी जागृती मोहिमा सुरू केल्या पाहिजेत. एकदा असे झाले की माओवादी-दहशतवादी संघटनेचे अस्तित्व संपुष्टात येईल.
लेखक :- मिलिंद महाजन.