१५ जून १९४७… आजच्याच दिवशी…
आज १५ जून… १९४७ साली आजच्याच दिवशी आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे धर्माच्या आधारावर विभाजन करण्याचा प्रस्ताव काँग्रेस ने स्वीकारला. “खून दिया हें मगर नहीं दी कभी देश की माटी हें..” ही आमची अनादी काळापासून चालत आलेली भीष्म प्रतिज्ञा पहिल्यांदा मोडली गेली. या देशावर झालेली हूण,कुशाण ,शक आणि यवनांची आक्रमणे परतवून लावून येथेच राहिलेल्या आक्रमकांना आपल्या समाज जीवनात समरस करणारा सर्वसमावेशक हिंदू समाज द्विराष्ट्र सिद्धांतापुढे( two nation theory) शरणागत झाला.
हिंदुस्तानचे(hindustan) विभाजन (Partition ) खऱ्या अर्थाने जर कोणी केले असेल तर ते हिंदू समाजाच्या उदासीनतेने व असंघटितपणामुळे ब्रिटिशांनी(british) हिंदू समाजाच्या उदासीनतेचा पुरेपूर फायदा उचलत, कायदे आझम महम्मद अली जीनांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे धर्माच्या आधारावर विभाजन केले. काँग्रेस ने(congress) हिंदू समाजाचे आपण प्रतिनिधित्व करत असलयाचे भासवत हिंदू समाजाचा विश्वासघात केला.
धर्माच्या आधारावर विभाजन होणे ही आमच्या इतिहासातील पहिल्यांदाच घडलेली कल्पनातीत दुर्दैवी घटना होती.
१५ जून… १९४७ रोजी इस्लामिक रिपब्लिक पाकिस्तानच्या निर्मितीवर कोणतीही पूर्वतयारी नसताना व हिंदू समाजाला विश्वासात न घेता काँग्रेस कडून शिक्का मोर्तब करण्यात आले.
आज ७५ वर्षांनंतर देखील मातृभूमीची फाळणी ही हिंदू समाजाच्या हृदयावरची भळभळती जखम आहे… अगदी अश्वत्थाम्याच्या माथ्यावरच्या भळभळत्या जखमे सारखी…
आमच्या मातृभूमीच्या विभाजनामुळे…
-ज्या सिंधू नदीवरून आम्हाला हिंदू ही ओळख मिळाली ती सिंधू नदी आमच्या हातातून निसटली…
-ज्या कोट लखपत तुरुंगात भगत सिंह, राजगुरू, सुखदेव (bhagat singh sukhdev rajguru)यानां फाशी देण्यात आले ते लाहोर आमच्या सीमे पलीकडे राहिले..
-जुळी मुंबई म्हणून ओळखले जाणारे कराची इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची राजधानी झाले…
-शीख संप्रदायाचे संस्थापक गुरुनानक जी यांचे जन्मस्थान ननकाना साहिब आमच्यासाठी परके झाले…
-१९०५ साली ज्या बंगालच्या फाळणी विरुद्ध संबंध हिंदुस्तान पेटून उठला होता तो आमचा ‘सोनार बांग्ला'( sonar bangla) दोन तुकड्यात वाटला गेला…
–“धर्माच्या आधारावर रक्तपात केल्यास वेगळी भूमी मिळते” या समजुती पोटी पुढच्या काळात खलिस्तान सारख्या फुटीरतावादी चळवळी डोके वर काढू शकल्या…
-सुमारे ८ लाख हिंदूंचे नृशंस हत्याकांड, हजारो हिंदू माताभगिनींवर झालेले बलात्कार आणि सुमारे १ कोटी २० लाख हिंदूंच्या आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या जपलेल्या आपल्या जमिनी व स्थावर जंगम मालमत्ता सोडून कराव्या लागलेल्या पलायनावर उभ्या राहिलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमुळे हिंदू समाजाच्या मनात मुसलमान समाजाबद्दल कायमचा संशय निर्माण झाला…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या रूपाने एक शत्रूराष्ट्र भारताच्या शेजारी स्थानापन्न झाले…
उपासना पंथ वेगवेगळे असले तरी सांस्कृतिक दृष्ट्या आपण एकच आहोत हे मुसलमान समाजाला पटवून देण्यात हिंदू समाज अपयशी ठरला. जर सांस्कृतिक दृष्ट्या आपण एकच आहोत, काही पिढ्यांपूर्वी अपरिहार्य परिस्थितीमुळे तुमच्या पूर्वजांनी उपासना पंथ बदलला आणि ते मुसलमान झाले; मात्र आपले पूर्वज एकच आहेत हे हिंदू(hindu) समाजाने ठणकावून सांगितले असते तर फाळणी निश्चितपणे टळली असती.
बलशाली सुसंघटित हिंदू समाज हेच या सर्व दुखण्यावरचा रामबाण उपाय आहे..आणि अखंड भारताची(akhand bharat) पुनर्स्थापना करणे हीच जालीम मात्रा आहे..
वीरा घे धनुबाण वीरा घे धनुबाण
जातीयतेला जरी यश आले भंगाया बंगाल
करावया पंजाब द्विखंडित हाय रक्तबंबाळ
ग्रहण अमंगल हे सदैव राहील का
अमर तुझा आत्मा खंडित होईल का
सूर्य उगवता तेज पसरता ना तारा नच चांद
वीरा घे धनुबाण वीरा घे धनुबाण