“हलदी घाट असो वा गलवान, भारत कधीच झुकला नाही”;- संरक्षण मंत्री
गलवान चकमकीची तीन वर्षं
गलवान व्हॅलीमध्ये (galwan valley) ४ नव्हे, तर चीनचे ३८ सैनिक मरण पावले, पुष्कळ नदीत वाहून गेले: ऑस्ट्रेलियन अहवालात खुलासा
२०२० मध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये (indian army) झालेल्या चकमकीत ३८ चीनी सैनिक मारले गेले. ऑस्ट्रेलियाच्या ‘द क्लॅक्सन’ या वृत्तसंस्थेने आपल्या तपास अहवालात हा धक्कादायक खुलासा केला आहे. विशेष म्हणजे गलवानमध्ये झालेल्या चकमकीत चीन आपल्या बाजूचे फक्त ४ सैनिक मारले गेल्याचे जगाला धाय मोकलून सांगत आहे. पण आता या विदेशी अहवालांनी चीनचा पर्दाफाश केला आहे.
याआधी, चीनच्या सोशल मीडिया (chinese social media) साइट वीबोवरही त्या रात्री ३८ चिनी सैनिक मारल्या गेल्याची माहिती समोर आली होती. पण त्यावर चीनचे नियंत्रण होते आणि त्यांनी त्या पोस्ट Weibo वरून काढून टाकल्या. मात्र, आता द क्लॅक्सनचे संपादक अँटोइन क्लेन यांनी माहिती दिली आहे की त्यांनी स्वतंत्र सोशल मीडिया संशोधकांची एक टीम तयार केली होती, ज्यांनी या संपूर्ण प्रकरणावर सुमारे दीड वर्षे संशोधन केले आणि निकालात असे आढळून आले की चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे अनेक सैनिक १५ – १६ जून रोजी गलवान नदीच्या जोरदार प्रवाहात अक्षरशः वाहून गेले.
चिनी सैनिक बर्फाळ नदीत बुडाले: अहवालाचा निष्कर्ष
अहवालात असे म्हटले आहे की, चीनने गलवान चकमकीची वास्तविकता लपवण्यासाठी दोन वेगवेगळ्या घटनांचे मिश्रण केले आणि आपल्या मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या कोणालाही कळू दिली नाही.या चकमकीनंतर लगेचच भारतात २० सैनिकांना वीरगती मिळाल्याची बातमी आली पण त्या रात्री त्यांचे किती सैनिक मरण पावले हे चीनने कधीच सांगितले नाही. अंदाजानुसार, कधी अहवालात ही संख्या ४३ तर कधी ३८ इतकी सांगितली जाते. आता त्याच क्रमाने द क्लॅक्सनने चीनच्या खोट्या गोष्टींचा पर्दाफाश केला आणि चीनच्या रचलेल्या कथा कशा खोट्या होत्या हे सांगितले.या अहवालात नेटवरून हटवण्यात आलेल्या कागदपत्राचाही उल्लेख आहे. या दस्तऐवजात चिनी सैनिक त्या रात्री बर्फाळ नदीतून कसे पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते आणि एकामागून एक कसे बुडत होते याचा सुस्पष्ट उल्लेख आहे.
वास्तविक आकड्यांवरून लक्ष हटवण्याचा चीनचा प्रयत्न,
हे लक्षात घेण्यासारखे आहे की एकीकडे, चीन (china) आपल्या शहीद सैनिकांची अचूक आकडेवारी संपूर्ण जगासमोर सुमारे दीड वर्षांपासून लपवत होता, परंतु जेव्हा ते परदेशी अहवालांमध्ये उघड होऊ लागले तेव्हा बेअब्रू टाळण्यासाठी चीनने गलवान चकमकीमध्ये सामील असलेल्या एका चिनी सैनिकाला बीजिंग हिवाळी ऑलिंपिकच्या पारंपारिक टॉर्च रिलेचा एक भाग बनवले जेणेकरून आम्ही किती शौर्यवान हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
“कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच” ही म्हण चीनबाबत चपखल लागू पडते.जगावर अधिराज्य गाजवण्याच्या इर्ष्णेने दादागिरी, दंडेली करणाऱ्या चीनला आपल्यासमोरील सर्वात मोठा अडथळा वाटतो तो भारताचा. कारण, भारत साधनसंपत्ती, मनुष्यबळ, तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण संशोधनात चीनच्या तोडीसतोड आहे.
भारत (bharat) आपले वर्चस्व तर मान्य करणार नाहीच, पण सभोवतालच्या व जगभरातल्या छोट्या-मोठ्या देशांनाही चिनी जाळ्याविरोधात एकवटवू शकतो, याची जाणीव चीनला आहे. त्याचमुळे चीन सतत भारताविरोधात हालचाली करत असतो, कधी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला हाताशी धरून तर कधी नेपाळमध्ये घुसखोरी करून तर कधी बांगलादेश-श्रीलंकेला आर्थिक मदतीच्या सापळ्यात अडकवून.
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी (atal bihari vajpayee), “शेजारी कधी बदलता येत नसतात”, असे विधान केले होते. ते सार्वकालिक सत्य आहे हेच खरे..
साभार :- ऑप इंडिया (हिंदी)