MOSSAD च्या मार्गावर RAW ?

ज्याप्रकारे १० दहशतवाद्यांच्या लीलया हत्या करण्यात आल्या… त्या पाहिल्या की आपल्याला MOSSAD च्या सफाईदार कारवायांची आठवण होते.
इजरायलच्या गुप्तचर संघटना MOSSAD च्या पावलावर पाऊल ठेवून भारतीय गुप्तचर संघटना RAW ने देखील कठोर नीती अवलंबत विदेशी धरतीवर राहून भारत विरोधी फुटीरतावादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना विदेशात जाऊन धडा शिकवणे आजमितीला अत्यंत आवश्यक आहे… समस्त १४० कोटी भारतीयांची ती आंतरिक इच्छा आहे…
भारतातील आणि भारताबाहेरील खलिस्तानवाद्यांची तसेच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान पुरस्कृत धर्मांध जिहादी आतंकवाद्यांची नांगी ठेचल्यास उर्वरित घरभेद्यांना एक निर्णायक संदेश जाईल… भारत त्याच्या शत्रूंवर कधीही आणि कुठेही कारवाई करू शकतो, याची एकदा का जरब बसली, तर भारतविरोधी कारवाया, वक्तव्ये करण्यास धर्मांध, जिहादी आतंकवादी १०० वेळा विचार करतील हे नक्की…
आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षभरात विदेशी धरतीवर भारत विरोधी व फुटीरतावादी कारवाया करणाऱ्या १० देशद्रोह्यांना अज्ञात हल्लेखोरांनी यमसदनी धाडले आहे… यातील एकही हल्लेखोर आज तागायत पकडला गेलेला नाही… आता हा योगायोग म्हणावा की या दहशतवाद्यांमधील आपसातील वैमनस्य की RAW ने धारण केलेला MOSSAD चा अवतार?… जे काही असेल ते पण ते निश्चितच स्वागतार्ह आहे…

अज्ञात हल्लेखोरांनी यमसदनी धाडलेल्या त्या १० आतंकवाद्यांची यादी पुढीलप्रमाणे…
-जहूर मिस्त्री – 1999 IC-814 विमानाचा अपहरणकर्ता (1 मार्च 2022 रोजी कराचीमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून ठार केले)
-रिपुदमन सिंग मलिक – 1985 एअर इंडिया बॉम्बस्फोट (14 जुलै 2022 रोजी सरे येथे गोळ्या घालून ठार)
-हरविंदरसिंग संधू – 2021 पंजाब पोलिस मुख्यालयावर RPG हल्ला (पाकमधील रुग्णालयात ड्रग ओव्हरडोजमुळे मृत्यू – नोव्हेंबर’22)
-बशीर अहमद पीर – एचएम कमांडर (20 फेब्रुवारी 2023 रोजी रावळपिंडी येथे गोळ्या घालून ठार)
-सय्यद खालिद रझा – अल बद्र कमांडर (27 फेब्रुवारी 2023 रोजी कराचीमध्ये त्याच्या घराबाहेर गोळ्या घालून ठार)
-परमजीत सिंग पंजवार – खलिस्तानी दहशतवादी, खलिस्तानी कमांडो फोर्सचा प्रमुख (6 मे 2023 रोजी जोहर, पाकिस्तानमध्ये गोळ्या घालून ठार)
https://www.newsdrum.in/tags/paramjit-singh-panjwar
-सय्यद नूर शालोबर – अतिरेकी कमांडर (5 मार्च 2023 रोजी बारा, केपीके येथे गोळ्या घालून ठार)
-अवतार सिंग खांडा – खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख आणि बॉम्ब तज्ञ, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्यासाठी जबाबदार, दीप सिद्धू आणि अमृतपाल सिंग यांचाही हँडलर (16 जून 2023 रोजी बर्मिंगहॅम, यूके येथील रुग्णालयात संशयास्पद परिस्थितीत विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला)
-मोहम्मद लाल- ISI ऑपरेटर (19 सप्टेंबर 2022 रोजी नेपाळमध्ये गोळ्या घालून ठार)
-हरदीप सिंग निज्जर – प्रतिबंधित खलिस्तान टायगर फोर्स (KTF) चे कॅनडा-आधारित प्रमुख – 19 जून’23 रोजी कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया येथील गुरुद्वाराबाहेर गोळ्या घालून ठार केले.

अमेरिकेत राहून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या जोरावर खलिस्तानी फुटीरतावादी “सिख फॉर जस्टीस” संघटना चालवणारा गुरपतवंत सिंग पन्नू जो कधी काळी भारताला खुलेआम धमकी देत असे तो आज मात्र जिवाच्या भीतीने फरार झाला आहे.
काल-परवा पोलिसांना न घाबरणारे खलिस्तानवादी आता अटकेच्या भीतीमुळे पसार झाले आहेत, लोकांना पोलिसांपासून वाचवण्याची भाषा करत आहेत, हे चांगले लक्षण आहे. प्रभावीपणे मोहीम राबवून खलिस्तानी चळवळ समूळ नेस्तनाबूत करावी’, अशी संबंध भारतीयांची इच्छा आहे.