“माओवाद्यांची उलटी गिनती सुरु झाली आहे”.. हे खुद्द माओवाद्यांनीच कबुल केले आहे..
प्रतिबंधित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) (Communist Party of India (Maoist)) ने, आपल्या नव्या दस्तऐवजात, तांत्रिक आणि मानवी बुद्धीच्या(human intelligence) जोरावर भारत सरकार वरचढ ठरल्यामुळे मोठ्या उलथापालथांना तोंड द्यावे लागले आहे तसेच वरिष्ठ नेते गमावल्याचे माओवाद्यांनी मान्य केले आहे.अप्रत्यक्षरित्या “माओवाद्यांची उलटी गिनती सुरु झाली आहे”.. हे माओवाद्यांनीच कबुल केले आहे.
त्याच वेळी, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी संघटनेने आपल्या कार्यकर्त्यांना विकेंद्रित (decentralised) आणि मोबाइल युद्धात( mobile warfare) सहभागी होण्यास सांगितले आहे. गेल्या महिन्यात जारी केलेल्या या दस्तऐवजात, माओवाद्यांनी भारत सरकारच्या( government of india) ‘सूरजकुंड स्ट्रॅटेजिक प्लॅन’चा( surajkund strategic plan) उल्लेख केला आहे. २७ आणि २८ ऑक्टोबर २०२२ रोजी हरियाणातील सूरजकुंड येथे झालेल्या राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या “चिंतन शिबिराचा” हा स्पष्ट निर्धार आहे.
‘चिंतन शिबिरा’ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवाद मुळापासून उखडून टाकण्याचे आवाहन केले होते. नक्षलवाद्यांना देशातील तरुणांची दिशाभूल करण्यापासून रोखण्यासाठी ‘बंदुका असो की पेन असो’ समूळ नष्ट झाले पाहिजेत.माओवाद्यांच्या नव्या दस्तऐवजात, माओवाद्यांनी( maovadi) एक प्रकारे सरकारच्या कृतींचे यश मान्य केले आहे. माओवाद्यांच्या प्रदेशात, त्यांनी त्यांचे ९७ ‘कॉम्रेड’ गमावले आहेत. यामध्ये दंडकारण्यामध्ये (दंडकारण्य म्हणजे :- महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशामधील काही भागात पसरलेला प्रदेश) विविध कारवायांमध्ये सर्वाधिक ५८, बिहार-झारखंड एकत्रित प्रत्येकी ९आणि तेलंगणा आणि ओडिशा, महाराष्ट्र-मध्य प्रदेशातील ५,छत्तीसगड विशेष क्षेत्र,आंध्र-ओडिशा सीमेवर ३,आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी १. यापैकी २८ महिला असल्याचा दावा माओवाद्यांनीच केला आहे.
गेल्या एका वर्षात माओवाद्यांनी गमावलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये कटकम सुदर्शन उर्फ आनंद उर्फ दुला उर्फ परमेश्वर यांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. तो सीपीआय (माओवादी) च्या केंद्रीय समितीचे पॉलिटब्युरो(politburo) सदस्य होता. याशिवाय, आंध्र प्रदेशातील एलएसएन मूर्ती, बिहार-झारखंडमधील गौतम पासवान आणि चार्ली (अजित उराव) हे क्षेत्रीय समितीचे ३ सदस्य या माओवाद्यांनी गमावले आहेत. एलएसएन मूर्ती यांनी यापूर्वी ‘क्रांती’, ‘प्रभात’ आणि ‘पीपल्स मार्च’ या नक्षलवादी/माओवादी नियतकालिकांचे संपादक म्हणून काम केले आहे. पश्चिम बंगालमधील आणखी एक दिग्गज नेते चंडी सरकार उर्फ चंडी दा यांनी माओवादी कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया आणि पीपल्स वॉरचे विलीनीकरण करून सीपीआय (माओवादी) च्या घटनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती ते देखील मारले गेले आहेत. ‘चेतना नाट्य मंच’ या सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक शंकर राव गमावल्याने माओवाद्यांनाही जबर धक्का बसला आहे.
माहिती देणाऱ्यांचे नेटवर्क,कार्पेट सिक्युरिटी प्लॅन(carpet security plan) अंतर्गत पोलिस बेस कॅम्पचा विस्तार, प्रभावी तंत्रज्ञान आणि मानवी बुद्धिमत्ता (human intelligence) , विविध उपकरणांद्वारे माओवादी नेत्यांचा मागोवा घेणे याद्वारे सरकारच्या ठोस प्रयत्नांमुळे माओवादी चळवळीला( naxalwadi) जबर धक्का बसल्याचे माओवाद्यांनी कबूल केले आहे. तसेच, डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांचा रसद पुरवठा साखळी (supply chain) विस्कळीत करण्यात सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या यशामुळे माओवादी मोठ्याप्रमाणावर अस्वस्थ झाले आहेत.
सरकारच्या कठोर कारवाईमुळे माओवादी कार्यकर्त्यांच्या नैराश्यावर मात करण्यासाठी, माओवाद्यांनी त्यांच्या मृत नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अभिवादन करण्यासाठी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत देशभरात ‘शहीद स्मृती सप्ताह’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्देशासाठी, ते विविध शहरे आणि विद्यापीठांमध्ये कटकम सुदर्शन उर्फ आनंद यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखत आहेत. बहुधा पहिल्यांदाच, त्यांनी मृत नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना आपल्या बेकायदेशीर संघटनेत न ओढता त्यांच्याशी संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने अशा स्मरणार्थ कार्यक्रमांना आमंत्रित केल्याचा उल्लेखही केला आहे.आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर भाष्य करताना, सीपीआय (माओवादी) ने आपल्या नव्या दस्तऐवजात असेही निदर्शनास आणले आहे की हे नुकसान ‘बेस न बदलणे आणि दीर्घकाळ पद्धत न बदलल्यामुळे’ झाले आहे.
“हे नुकसान टाळता आले असते. आपण केलेल्या चुकांचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे आणि योग्य धडे घेणे आवश्यक आहे,” असे ते पुढे म्हणाले. खरं तर, तज्ञांच्या मते, त्यांनी आधीच काही शहरी भागात त्यांच्या कामाची पुनर्रचना केली आहे परंतु त्यांचे प्रमुख चेहरे पोलिस आणि गुप्तचरांचे लक्ष चुकवण्यासाठी जाणूनबुजून लो प्रोफाइल राहतात.
काही भागात, माओवाद्यांनी त्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (people’s liberation guerrilla army- PLGA) मध्ये तरुणांची भरती केली जात आहे. तसेच नवीन पोलीस छावण्या, रस्ते प्रकल्प, पूल बांधणी, नवीन प्रकल्पांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ‘गैर-लष्करी (नागरी) मानसिकतेतून बाहेर पडण्यास’ आणि उपक्रमांसाठी नवीन गावे/क्षेत्रे शोधण्यास सांगितले आहे. त्याच वेळी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)( indian communist party)ने आपल्या कार्यकर्त्यांना ‘अनावश्यक प्रक्षोभक कृती’ टाळण्याची चेतावणी दिली आहे, वरवर पाहता सुरक्षा एजन्सीच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नये. त्याऐवजी, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ‘विकेंद्रित’ आणि ‘मोबाइल’ युद्धाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय माओवाद्यांनी दंडकारण्य, बिहार-झारखंड(bihar and jharkhand), पूर्व बिहार-ईशान्य झारखंड हे ‘सपोर्ट बेस’ म्हणून ‘विकसित’ करण्याची त्यांची योजना पूर्णपणे मोडकळीस आल्याचे देखील मान्य केले आहे.
लेखक :- कार्तिक लोखंडे
साभार :- thehitavada.com
https://www.thehitavada.com/Encyc/2023/7/12/Maoists-admit-to-facing-major-reverses.html