CultureHinduismNewsScience and Technology

हिंदू कालगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ठय…जाणून घ्या आणि अभिमान बाळगा

hindu calendar

यंदा श्रावण अधिक आहे. हिंदू कालगणनेचे( hindu calendar)सर्वात भारी वैशिष्ठय म्हणजे अधिक मास(adhik maas)!

दर तीन वर्षांनी चौथ्या वर्षी अधिक मास येतो. त्या संवत्सरात १३ महिने असतात. यालाच आपल्याकडे धोंड्याचा महिना म्हणतात.

खगोल शास्त्राच्या दृष्टीने सोप्या भाषेत सांगायचे तर दररोज चंद्रोदय साधारणपणे ५० मिनिटे उशिरा होतो. सूर्योदय मात्र वर्षाला अर्धा तास पुढे मागे होतो. याचा अर्थ पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करायला लागणारा वेळ आणि चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करायला लागणार वेळ यात साधारण पाऊण तासाचा फरक दिवसाला पडतो. हा काळ साचत जाऊन तीन वर्षांनंतर एक महिन्याच्या इतका होतो. म्हणूनच या महिन्याला मल मास असे पण म्हणतात.

म्हणून आपल्या ऋषींनी दर तीन वर्षांनी अधिक मास म्हणजे एक वाढीव महिना आपल्या कालमापन पद्धतीत घातला आहे. अधिक मास हा चैत्र ते कार्तिक या पहिल्या आठ महिन्यांनाच येतो. मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हा कधीही अधिक नसतो. कारण हे महिने उत्तरायणात येतात.

आपण हिंदू असून आपली वैज्ञानिक अधिष्ठान असलेली कालमापन पद्धती अजिबात समजून घेत नाही हा मोठा दोष आहे.

ख्रिश्चनांना त्यांचे कॅलेंडर आजवर दोनदा बदलावे लागले पण हजारो वर्षे झाली आपल्याला एक सेकंद पण आपले कॅलेंडर बदलावे लागले नाही याचे कारण अधिक मास! आपले सगळे सण त्या त्या ऋतूंत येतात याचे कारण अधिक मास! रमजान ईद दरवर्षी वेगवेगळ्या ऋतूंत येते कारण त्यांचे कॅलेंडर सदोष आहे. पण आपली संक्रांत नेहमी थंडीत येते तर अक्षयतृतीया उन्हाळ्यात. त्या त्या सणाला त्या त्या ऋतूंतील फळे, धान्य याचे महत्व आहे ते त्यामुळेच!

विज्ञानाच्या नावाखाली सर्वात खोटी गोष्ट शिकवली जाते ती म्हणजे प्रत्येक दिवस 24 तासांचा असतो. दिवस अजिबात 24 तासांचा नसतो. आपण कालनिर्णय जरी बारकाईने पाहिले तर त्यात लिहिलेले असते पौर्णिमा प्रारंभ दुपारी अमुक वाजून अमुक मिनिटे आणि अमुक सेकंदानी आणि पौर्णिमा समाप्ती अमुक वाजून अमुक मिनिटे आणि अमुक सेकंदानी…त्यातला फरक बघा तंतोतंत २४ तास कधीच नसतो. पण इंग्रजांना याची जाण नसल्याने त्यांनी ठरवले की दिवस रात्री बाराला सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी रात्री बाराला संपतो. ही सर्वात मोठी वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे.

हिंदू समाज स्वत्व आणि सार्वभौमत्व या बाबतीत अजून बाल्यावस्थेत आहे. शिवाजी महाराज समजतील तेव्हाच तो प्रौढ अवस्थेत येईल.

आपली कालमापन पद्धती सर्वाना समजावी म्हणून संभाजी महाराजांनी समयनय नावाचा ग्रंथ गागाभट्ट यांच्याकडून लिहून घेतला. त्याचा अनुवाद सोलापूरचे धुंडिराज दाते यांनी केलाय.

त्यात अधिक मास, आपली संवत्सरे, तिथीनिर्णय यावर भारी लिहिले आहे. पूर्ण शास्त्रीय माहिती आहे आणि आजही लागू आहे. अधिक महिन्यात मनुष्य गेला तर श्राद्धादि विधी कसे करावे यावर पण मार्गदर्शन केलंय.

याचा परिणाम पुढील महिन्यांवर नाही होत कारण हा महिना भूतकाळात साचत आलेला जास्तीचा काळ ऍडजस्ट करतो.

साधं बघा मागच्या वर्षी भक्ती शक्ती 22 जून ला होता आणि या वर्षी 12 जून ला. याचा अर्थ वर्ष ३६५ दिवसांचे नव्हते. दर वर्षी साधारण 10 दिवसांचा फरक असाच साचत जातो. तीन वर्षांनी 30 दिवसाचा फरक पडतो. त्याला अधिक महिना ऍडजस्ट करतो.

पुढील वर्षी भक्ती शक्ती संगम जून अखेर अथवा जुलै पहिल्या आठवड्यात येईल बघा…मग पुन्हा दर वर्षी साधारण 8-10 दिवस मागे जात राहील…मग पुन्हा अधिक येईल…2027 ला…त्यावेळी श्रावण नाही तर भाद्रपद अधिक असेल…

अधिकस्य अधिकं फलं।

अधिकात पण लोक मांसाहार करत नाहीत. अनेक जण कटिंग दाढी पण करत नाहीत. दान धर्म करतात. विशेष करून अन्नदान करतात. आपल्या धर्मात मुलीला लक्ष्मी आणि जावयाला विष्णू मानतात. म्हणून मुलीला आणि जावयाला वाण देतात. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात कारण हा विष्णूची उपासना करण्याचा महिना मानतात.

अधिकात दानधर्म, तीर्थयात्रा, धर्मग्रंथाचे वाचन केल्यास नेहमीपेक्षा अधिक फळ मिळते.

सहस्रचंद्रदर्शन आणि अधिक मास

आपल्या धर्मात वयाची ८१ वर्षे पूर्ण केली की सहस्रचंद्रदर्शन सोहळा केला जातो त्या वृद्ध व्यक्तीचा. सहस्रचंद्रदर्शन म्हणजे त्या माणसाने आयुष्यात एक हजार पौर्णिमा बघितल्या. याचा हिशेब पण अधिक महिन्याशी संबंधित आहे. ८१ वर्षे म्हणजे १२x८१=९७२ पौर्णिमा… पण ८१/३ म्हणजे २७ अधिक महिने…म्हणजे २७ त्या पौर्णिमा… एकूण ९७२+२७=९९९…याचा अर्थ ८२व्या वर्षात पदार्पण करतानाची पहिली पौर्णिमा म्हणजे त्या माणसाच्या जीवनातील १०००वी पौर्णिमा… त्या दिवशी ८१ दिव्यांनी ओवाळून त्या व्यक्तीच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळा केला जातो…

स्वभाषा ,स्वदेशा,स्वधर्मास्तवे जे ।
स्वभागे इथे जन्मिलो मानीती जे।।
असा जन्महेतू जयांचे ऊरात ।
अशांची शिवाजी असे जन्मजात।।

https://hindi.news18.com/photogallery/nation/pm-modi-gift-to-president-joe-biden-and-jill-biden-sahasra-chandra-darshan-chandan-us-visit-6611445.html

Back to top button