हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूह (Nuh-mewat) हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. मेवात दंगलीबाबत ( mewat violence) तपासातून आता एक एक पुरावे बाहेर येऊ लागले आहेत. यातून हा कसा पूर्वनियोजित कट होता, हे दिसून येते. हिंदू समाजाचे खच्चीकरण करणे, त्यांच्या श्रद्धास्थानांना धोका निर्माण करणे, इथे कार्यरत असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांना पद्धतशीरपणे बदनाम करणे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणे सुरू असते. पण हिंदूंना(hindu) दंगलीचे खलनायक ठरविण्यासाठी बृ्रज मंडल जलाभिषेक यात्रा व गोरक्षक मोनू मानेसर याचे निमित्त पुढे केले जात आहे. यामध्ये डावे, मीडिया आणि तथाकथित विचारवंत आघाडीवर आहेत.
हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूह (मेवात)मध्ये मोठ्या प्रमाणात भडकलेला हिंसाचार आता नियंत्रणात आला असला, तरी परत त्याचा कधी स्फोट होईल हे सांगता येणे कठीण आहे.
निमित्त जलाभिषेक यात्रेचे..
गुरुग्रामजवळील नूह परिसरात विश्व हिंदू परिषदेद्वारे (vishva hindu parishad) बृज मंडल जलाभिषेक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा गुरुग्राम-अलवर इथल्या राष्ट्रीय महामार्गावर आली, तेव्हा धर्मांध, जिहादी मुस्लीम तरुणांच्या टोळक्याने त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या हिंसाचाराने इतके रौद्र रूप धारण केले की, धर्मांध, जिहादी मुस्लीम (jihadi muslim )जमावाने शासकीय आणि खाजगी वाहनांना लक्ष्य करत जाळपोळ सुरू केली. या दंगलीत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून तेे पाचही जण हिंदू आहेत. त्यातील दोन जण गणवेषधारी होमगार्ड होते. 130पेक्षा अधिक हिंदू जबर जखमी झाले आहेत.
मोनू मानेसर – सोशल मीडिया ट्रायल (monu manesar & social media trial)
मोनू मानेसर हा बजरंग दलाचा कार्यकर्ता असून गोरक्षक म्हणून संपूर्ण हरियाणात त्याचा नावलौकिक आहे. त्याने आपण यात्रेनिमित्त नूहला येत आहोत असा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत नूहला येऊ देणार नाही, असे तेथील धर्मांध, जिहादी मुस्लीम समाजाने अगदी सोशल मीडियावरदेखील आव्हान देण्यास सुरुवात केली होती. मात्र मोनू मानेसरचा तो व्हिडिओ हे दंगलीसाठी केवळ निमित्त होते, खरे तर मेवात जाळलेच जाणार होते. मेवातमध्ये शोभायात्रा रोखून हिंदूंच्या श्रद्धेला ठेचून टाकायचे व उर्वरित हिंदू समाजाला मेवातमधून कसे पळवून लावावे, याची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होती. मोनू मानेसरचा व्हिडिओ ही एक भाकडकथा रचून धर्मांध जिहादी स्वत:ला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
धर्मांध, जिहादी दंगेखोरांकडे शस्त्रे आली कुठून?
या यात्रेच्या आधी नूह पोलीस, जिल्हा प्रशासन, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व जमियत उलेमा-इ-हिंदच्या प्रतिनिधींची एक सविस्तर बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये यात्रेत कोणत्याही प्रकारची शस्त्रे आणली जाणार नाहीत, या आश्वासनानंतरच यात्रेला परवानगी देण्यात आली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत पनवर यांनी दिली आहे. धार्मिक यात्रेला आमचा विरोध नसून फक्त यात्रेकरूंच्या शस्त्र बाळगण्याला आहे, अशी जमियत उलेमा-इ-हिंदचे सदस्य मौलाना याहिया करीमी यांनी उर्मट प्रतिक्रिया दिली होती.
हिंदूंकडे असून असून शस्त्रे असलीच तर जास्तीत जास्त बाबा भोलेनाथचे त्रिशूल असू शकले असते, मात्र पोलिसांनी घातलेल्या अटीमुळे तेही नव्हते. असे असताना यात्रेवर हल्ला करणार्या धर्मांध जिहादी मुस्लीम दंगलखोरांकडे आयत्या वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आली कुठून? लाठ्या, लोखंडी रॉड, हातोडे, देशी कट्टे, मोठ्या प्रमाणात दगडांचा साठा, गॅस सिलेंडर, गाड्या व पोलीस स्टेशन पेटवून देण्यासाठी वापरलेले आग लावण्याचे सर्व साहित्य (यात पेट्रोल बाँबही असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे), काचेच्या बाटल्या या हत्यारांचा अनेक लिंकमध्ये मिळून उल्लेख आहे. म्हणूनच हे अचानक घडलेले नसून पूर्वनियोजित हल्ला असल्याचा निष्कर्ष आहे.
मेवातची दंगल हे पूर्वनियोजित षडयंत्रच..
ही घडवून आणलेली दंगल पूर्वनियोजितच होती, याचे पुरावे अनेक आहेत. त्यापैकी काही असे –
-तथाकथित व्हिडिओवरून विधानसभेत काँग्रेस आमदार मम्मन खान ( mamman khan) धमकी देताना म्हणाला होता की, “मोनू मानेसार की प्याज सी फोड देंगे।”
विडियो लिंक – https://www.youtube.com/watch?v=WNwS1q6PsIU
-जबीर घट्मिका यांनी 25 जुलै रोजी एका व्हिडिओ संदेशात हरियाणा पोलिसांनी मेवातमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील अशी सरळ धमकी दिली.
विडियो लिंक – https://www.youtube.com/watch?v=uukEsDZWsIo
इतकेच काय, तर नरसंहाराच्या आदल्या रात्री रस्त्यावर भरलेल्या गॅस सिलेंडरने घेराव घालून रस्ते बंद करण्यात आले.
- मोनू मानेसर मेवातला आलाच नाही, तरीही दंगल झाली. याचा अर्थ धर्मांध मुस्लीम जिहादींना दंगल करायचीच होती. आणि बर्याच आधीपासून त्याची पूर्वतयारीही करण्यात आली होती.
- हिंसाचारानंतर अनेक आरोपी राजस्थानमधील मेवात, जयपूर आणि उदयपूर आणि उत्तर प्रदेशातील मेरठ, आग्रा आणि अलीगडमध्ये लपल्याची माहिती अटकेतील तरुणांनी दिली. म्हणजेच दंगलीनंतर आपली लपण्याची ठिकाणेदेखील ठरवण्यात आली होती.
- मानसिक संतुलन ढळलेल्या RPF जवानाने, घटनेच्या दोन दिवस आधी रेल्वेत केलेला गोळीबार हा जणू काही मुस्लीम प्रवाशांना लक्ष्य करूनच केला होता, असे अनेक जिहादी, धर्मांध हँडलकडून विकृत पद्धतीने दाखवण्यात आले.
- गुरुग्राम( gurugram) आणि आजूबाजूच्या भागातील धर्मांध, जिहादी मुस्लीम समाजाला बोलावून अशांतता निर्माण करण्यासाठी एक साधन म्हणून सोशल मीडियाचा वापर केला गेला.
- या दंगलीदरम्यान धर्मांध जिहादी दंगलखोरांकडून सुमारे 1 हजार राउंड फायरिंग करण्यात आले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हे आणि असे अनेक पुरावे, धर्मांध जिहादींची तयारी अतिशय सुनियोजित होती, हेच अधोरेखित करतात.
नूह, मेवात आणि धर्मांधता
नूह या जिल्ह्याचे आधीचे नाव ‘मेवात’ असे होते. ते खट्टर सरकारने बदलले. मेवात हा भौगोलिक प्रदेश 4 राज्यांमध्ये विखुरलेला आहे – हरियाणा, पश्चिमी उत्तर प्रदेश, राजस्थान व दिल्ली.
नूह जिल्ह्यात जवळपास 80% लोकवस्ती मुस्लीम, तर उरलेले केवळ 20% हिंदू आहेत. आज तिथे उफाळलेल्या हिंसाचाराची कारणे वरवर तात्कालिक वाटली, तरी बर्याच काळापासून जातीय तेढ वाढत चालली आहे. कारण ज्या प्रदेशात मुसलमानांची लोकसंख्या 30%वर जाते, तिथे संविधान झुगारून शरिया रेटण्याचा प्रयत्न होतो, असे निरीक्षण आहे. या भागात तर 80%हून अधिक मुसलमान आहेत, तेव्हा धार्मिक तेढ वाढण्यात याचे पर्यवसान होणे स्वाभाविक आहे.
नूह जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून बृज मंडल जलाभिषेक यात्रा दर वर्षी निघते. गेली 4 वर्षे ही यात्रा निघत आहे. हिंदू श्रद्धेच्या पवित्र स्थानांना पुनर्जीवित करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने ही यात्रा आयोजित केलेली आहे. येथे महाभारतातील पांडवकालीन तीन शिवलिंगे असल्याचे सांगितले जाते. तसेच कृष्ण त्याच्या गाई चरण्यासाठी याच ठिकाणी आणत असल्याचीही कथा या भागात प्रसिद्ध आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, हिंदूंसाठी महत्त्वाच्या असणार्या या धार्मिक स्थळांवर या क्षेत्रातील अन्यधर्मीय लोकांकडून अतिक्रमण होण्याचा धोका असल्याने संभाव्य लँड जिहाद (land jihad ) रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने ही यात्रा सुरू केली आहे.
यंदाच्या अधिक श्रावण मासामुळे यंदाची यात्रा सकल हिंदू समाजासाठी पर्वणीच होती. अरवली पर्वतराजीमधील प्राचीन नलहार शिवमंदिरातून (nalhar mahadev mandir) ही यात्रा निघाली. या यात्रेत सुमारे 5 हजार हिंदू भाविक सहभागी झाले. एकूण 45 किलोमीटरचा हा प्रवास आहे. मात्र, यात्रा एक-दोन किलोमीटर जाते ना जाते, तोच धर्मांध, जिहादी मुस्लिमांचा पूर्वनियोजित क्रूर हिंसाचार सुरू झाला.
त्यामुळे यात्रेतील भेदरलेल्या हिंदू महिला व मुलांनी नलहार मंदिरात आश्रय घेतला. या सर्व हिंदू महिलांना व मुलांना धर्मांध जिहादी मुस्लिमांनी सर्व बाजूंनी घेरले होते. पोलीस (police)आणि निमलष्करी दलाचे जवान वेळेवर पोहोचले नसते, तर या हिंदुबहुल स्वतंत्र भारतात 16 ऑगस्ट 1946च्या कायदे आझम महम्मद अली जीनांच्या Direct Action Day ची पुनरावृत्ती झाली असती. ही कल्पनाही जिवाचा थरकाप उडवणारी आहे.
हा सगळा परिसर राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश ही राज्ये आणि दिल्ली हे केंद्रशासित राज्य या चार राज्य प्रशासनांना गेल्या काही वर्षांपासून आव्हान ठरतो आहे. त्याला आता धर्मांध गडद हिरवा जिहादी रंग आल्याने हे आव्हान अधिकाधिक अवघड होत चालले आहे. गुन्हा करायचा आणि इतर राज्यांमध्ये लपून बसायचे, अशी या धर्मांध, जिहादी गुन्हेगारांची पद्धत आहे.
सायबर गुन्ह्यांचा मोठा अड्डा
गेल्या काही वर्षांत गुरुग्रामला लागून असणारा हा नूह जिल्हा सायबर गुन्ह्यांचा (cyber crime) देशातील सर्वांत मोठा अड्डा बनला आहे. अलीकडेच 27 एप्रिल रोजी तेथील 14 गावांमध्ये 5 हजार पोलिसांनी व सुरक्षा दलाच्या जवानांनी छापे टाकून 100हून अधिक सायबर गुन्हेगारांना पकडले. पकडले गेलेले हे बहुतांश सारे मुस्लीम समाजातील होते. हे छापे पडल्यानंतर देशातील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी एकदम 26 टक्क्यांनी घटल्या होत्या. इथल्या सायबर गुन्ह्यांना आवर घालण्यासाठी हरियाणा पोलिसांनी तेथे एक स्पेशल सायबर क्राइम कार्यालयदेखील सुरू केले आहे.
पूर्वनियोजित दंगलीत धर्मांध जिहादी मुस्लीम दंगेखोरांनी हे स्पेशल सायबर क्राइम कार्यालय पद्धतशीरपणे जाळून त्याची अक्षरश: राखरांगोळी केली. फिरोजपूर येथे जाणारी सरकारी बस दादागिरीने ताब्यात घेऊन सायबर क्राइम कार्यालयाच्या 2 पोलीस गाड्यांना ठोकर मारून उडवून दिले. तसेच ती बस कार्यालयाच्या भिंतीवर आपटून फोडली. आगीतून बचावलेली सायबर क्राइम पुराव्यांची कागदपत्रे घेऊन पोबारा केला. अशा प्रकारे सायबर गुन्ह्यांमधील सर्व पुरावे सुनियोजितरित्या नष्ट करण्यात आले आहेत.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानशी (islamic republic of pakistan) जोडले गेलेले हिंसाचाराचे धागेदोरे..
हरियाणाच्या नूहमध्ये झालेल्या धार्मिक हिंसाचाराशी पाकिस्तानचे असलेले कनेक्शन समोर आले आहे. पाकिस्तानमधील अहसान मेवाती नावाच्या यूट्यूबरने नूहच्या हिंसाचाराशी संबंधित चिथावणीखोर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असल्याचे तपासात समजले आहे. या व्हिडिओमध्ये तो नूह हिंसाचाराच्या वेळी उघडपणे हिंदूंना उद्देशून अपशब्द वापरत होता. लोकांना हिंसाचारासाठी भडकवतानाही दिसत होता. अहसान मेवाती याने मोनू मनेसार यांना मारण्यासाठी आणि हिंसाचार भडकण्यास साहाय्यभूत ठरेल अशी अनेक विधाने केली होती. याशिवाय त्यांनी मुस्लिमांची एकजूट आणि हिंदूंविरुद्ध जिहाद आणि द्वेषमूलक अपशब्दही वापरले होते. पोलीस अशा प्रकारच्या आणखी भडकाऊ सोशल मीडिया पोस्टचा तपास करत आहेत.
रोहिंग्याही (rohingya) सामील?
नूहच्या घुसखोर मुस्लीम रोहिंग्यांच्या वस्तीपर्यंत या हिंसेचे धागेदोरे पोहोचले आहेत. स्थानिकांच्या जोडीने म्यानमारमधून घुसखोरी करून आलेले हे रोहिंग्या हिंसाचारात सहभागी होतात, हे हिंदू समाजाचे डोळे उघडणारे वास्तव आहे. याबाबतचा तपशील FIRमध्ये नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या दंगलीचा तपास सुरू करताना अवैध अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी नूहच्या जवळच असलेल्या तावडू रोहिंग्या आणि अवैध अतिक्रमण करणार्या इतर 200 झोपड्या जमीनदोस्त केल्या आहेत. या ठिकाणी अवैध पद्धतीने वास्तव्य करणार्या लोकांचा या दंगलीमध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.
या रोहिंग्या लोकांनी हरियाणा सरकारच्या शहरी विकास प्राधिकरणाच्या जमिनीवर कब्जा करून झोपड्या बांधल्याचे सांगितले जात आहे. नूहमध्ये झालेल्या हिंसाचारात इथल्या लोकांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी बुलडोझर लावले आणि सर्व अवैध झोपड्या उद्ध्वस्त केल्या. या झोपड्यांमध्ये बांगला देशी लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे.
होमगार्डचा मृत्यू..
दंगलखोरांच्या दगडफेक व मारहाणीत, कर्तव्यावर गणवेशात असलेल्या गुरसेवक सिंह या होमगार्डचा( gursewak singh homeguard) मृत्यू झाला. हिंसाचारात हुतात्मा झालेले होमगार्ड जवान गुरसेवक सिंह हे फतेहाबादच्या टोहाना ब्लॉकमधील फतेहपुरी गावचे रहिवासी होते. 32 वर्षीय गुरसेवक 10 वर्षांपूर्वी होमगार्ड म्हणून रुजू झाले होते. 7 जुलै रोजीच गुरुग्राम येथे त्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. गुरसेवक सिंह हे खेरकी दौला पोलीस ठाण्यात तैनात होते आणि ते पोलीस पथकासह मेवातकडे जात असताना दंगलखोरांनी वाहनांवर दगडफेक आणि गोळीबार केला. या घटनेत 2 होमगार्ड जवानांना आपला जीव गमवावा लागला, त्यापैकी एक गुरसेवक होते.
अभिषेक हा त्या यात्रेत सहभागी असलेला बजरंग दलाचा सक्रिय कार्यकर्ता. नलहार मंदिरात आश्रय घेतलेल्या हिंदू महिलांच्या व मुलांच्या संरक्षणासाठी सशस्त्र धर्मांध, जिहादी हल्लेखोरांना नि:शस्त्र असूनही भिडला. परिणाम व्हायचा तोच झाला – अभिषेक धारातीर्थी पडला, मात्र तोपर्यंत पोलीस व निमलष्करी दलांची कुमक पोहोचली आणि अनर्थ टळला. यावरून जिहादी धर्मांध, मुस्लीम समुदायाची पूर्वतयारी लक्षात यावी.
आतापर्यंत समोर आलेली आणि येत असलेली वस्तुस्थिती म्हणजे या परिसरातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. हिंदू समाजाचे खच्चीकरण करणे, त्यांच्या श्रद्धास्थानांना धोका निर्माण करणे, इथे कार्यरत असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांना पद्धतशीरपणे बदनाम करणे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून हिंदूंना जगणे नकोसे करणे यासाठी ही यात्रा म्हणजेे शोधलेले एक निमित्त आहे.
साभार :- साप्ताहिक विवेक
https://www.evivek.com/Encyc/2023/8/11/Riots-in-MewaA-premeditated-plot.html